Top Post Ad

NSKFDC ची प्रलंबित कर्ज प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याची मागणी

सन २०२२ मधील NSKFDC (National Scheduled Castes Finance and Development Corporation) योजनेअंतर्गत प्रलंबित कर्ज प्रकरणांबाबत बाबासाहेब पठारे यांनी नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक रुचेश जयवंशी यांना सविस्तर निवेदन सादर केले. महाराष्ट्रातील हजारो पात्र लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून विविध स्तरांवर प्रलंबित असून त्यामुळे युवक, महिला व होतकरू उद्योजकांना स्वावलंबनापासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.


महात्मा फुले आर्थिक मागासवर्गीय विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय लोक मोर्चा पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब संभाजी पठारे यांनी आज पदभार स्वीकारलेले नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. रुचेश जयवंशी यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. आणि दिलेल्या निवेदनात सर्व पात्र कर्ज प्रस्तावांची तातडीने छाननी करून मंजुरी देणे, मंजूर प्रकरणांचे त्वरित कर्ज वितरण (Disbursement) करणे, अनावश्यक विलंबाची चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करणे तसेच निश्चित कालमर्यादेत सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची ठोस मागणी केली.

यावर मा. श्री. रुचेश जयवंशी यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत संबंधित प्रकरणांचा आढावा घेऊन नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रीय लोक मोर्चा पार्टीने मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा, रोजगारनिर्मितीला चालना मिळावी आणि शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा यासाठी पुढेही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com