Top Post Ad

backlog शासकिय व निमशासकिय नोकर भरती व रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी

शासकिय व निमशासकिय नोकर भरती व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी तसेच आदिवासी व बिगर आदिवासी यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराकडे  महाराष्ट्र राज्य सरकारचे लक्ष वेधण्याकरीता दि. १८ ऑगस्ट रोजी एकदिवसीय धरणे धरण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते  सहदेवराव तायडे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथे प्रसिद्धी माध्यमांना दिली. यावेळी विलास भोर, पंढरी वाघे, गणेश वाघे, भानूदास काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 राज्यातील महसुल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालय तसेच महसुल सहाय्यकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून एका महसूल सहाय्यकाकडे २ ते ३ संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे कर्मचारी प्रचंड तणावात असून महसुल भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील भरती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. याकरीता महाराष्ट्र शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.  तसेच यापूर्वी पोलिसांपासून ते महसूल विभाग व वने विभाग, सिडको, एम.आय.डी.सी., महानगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, होमगार्डस् आदि कार्यालयांच्या समस्याकडे अनेकवेळा लेखी पत्रव्यवहार करून देखील याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच आदिवासी व बिगर आदिवासी धारकांच्या समस्याबाबत जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर, बांद्रा व ठाणे जिल्हाधिकारी ठाणे आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे पाठपुरावा करून देखील त्यावर कोणतीही कारवाई होत नाही, केली जात नाही. यासर्व गोष्टींकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधावे म्हणून हे एकदिवसीय धरणे आंदोलन करीत असल्याचे तायडे म्हणाले, 

 देश सर्वांगीण विकसित मार्गे कसा जावा याकरिता, प्रशासक व विविध क्षेत्रातील अन्याय पिडित यांची ऐक्तीची सांगड असावी कारण की, देश स्वतंत्राचा ७५ वर्ष अमृत महोत्सव साजरा करीत असतांना सुध्दा वस्त्र, निवास, रोजगारासाठी मतदारांना झगडावे लागते, याचा अर्थ प्रजासत्ताक देश म्हणजे काय, याचा जवळपास सर्वच राजकीय पक्षांना विसर पडत चाललाय यावर मा. राष्ट्रपती व मा. पंतप्रधानचे संदेश हवेत. कारण की, निवडणूक प्रक्रिया ही जवळपास दीड दोन महिने चालते. राजकीय पक्षांना प्रचारासाठी भरपूर कालावधी दिला जातो. परंतु राष्ट्रीय मतदारांचे आभार व्यक्त करण्याकरीता केवळ एक दिवसाचा राष्ट्रीय मतदार दिवस ठेवला जातो. हेदेखील अत्यंत अयोग्य ठरते. किमान आठवडाभर हा राष्ट्रीय मतदार सप्ताह साजरा झाला पाहिजे. तरच या सर्वात मोठया लोकशाहीवादी देशात मतदारचा सन्मान झाल्यासारखे होईल. असे स्पष्ट मत तायडे यांनी यावेळी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com