Top Post Ad

राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत 'दीपावली' सर्वोत्कृष्ट


मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २५ व्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेत एक लाख रुपये रकमेचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार 'दीपावली' अंकास जाहीर झाला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी प्रतिष्ठेचे हे निकाल आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथे जाहीर केले.  तसेच यापुढे डिजीटल अंकांचाही या स्पर्धेत अंतर्भाव होणार असल्याची घोषणा प्रशांत ठाकूर यांनी केली. डिजीटल दिवाळी अंकाकरीता स्वतंत्र असे तीन पारितोषिक यावेळी जाहिर करण्यात आले.

राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेसाठी श्रीमती विणा सानेकर, रेखा देशपांडे आणि सुप्रसिद्ध सुलेखनकार सुनील धोपावकर यांनी परीक्षक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. स्पर्धेचे मुख्य समन्वयक म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के यांनी तर रायगड जिल्ह्यातील दिवाळी अंक स्पर्धेचे समन्वयक म्हणून संघाचे ज्येष्ठ सदस्य दीपक म्हात्रे यांनी काम पाहिले. 

. दिवाळी अंकांच्या बदलत्या माध्यमांचा वेध घेत २०२६ च्या स्पर्धेत डिजिटल दिवाळी अंकांनाही प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन पुरस्कार देण्यात येतील, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी जाहीर केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मराठीच्या साहित्य सेवेत आपला खारीचा वाटा उचलत असते, असा विनम्र भाव त्यांनी व्यक्त केला.  

मराठी साहित्य प्रवाहातील एक वैभवशाली परंपरा असलेल्या दिवाळी अंकांना त्यांच्या योग्यतेनुसार अनुदान मिळावे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात मुंबई मराठी पत्रकार संघाने लवकरच दिवाळी अंकांच्या संपादकांसमवेत एका बैठकीचे आयोजन करावे असे त्यांनी सांगितले. या बैठकीतील चर्चेनुसार आपण या मागणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार व संबंधितांकडे पाठपुरावा करू. आपल्या दिवाळी अंकांसाठी हे व्हायलाच हवे, अशी भावना आमदार ठाकूर यांनी व्यक्त केली

  • राज्यस्तरीय निकाल पुढीलप्रमाणे :
  • सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक दीपावली (प्रथम पारितोषिक, एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह)
  • मुक्त संवाद (द्वितीय पारितोषिक, पन्नास हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
  • वसा / अक्षरलिपी (विभागून) (तृतीय पारितोषिक, तीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
  • सर्वोत्कृष्ट विशेषांक नवभारत (१५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
  • लक्षवेधी उत्कृष्ट अंक बाईमाणूस संपादक श्री. प्रशांत पवार (१५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
  • मुलांसाठी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक मुलांचे मासिक (७५०० रुपये आणि सन्मान चिन्ह), उत्तेजनार्थ धमाल मस्ती
  • उत्कृष्ट कथा आवाज, लेखक मनस्विनी लता रवींद्र, धनंजय दिवाळी अंक
  • उत्कृष्ट कविता - त्याने तिरंगा पाहिला कवी सतीश लोथे, युगांतर दिवाळी अंक
  • (५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
  • उत्कृष्ट लेख टॉलस्टॉयची सायकल, लेखक नंदू मुलमुले, ललित दिवाळी अंक
  • लक्षवेधी परिसंवाद - युद्धकांड, अक्षर दिवाळी अंक (५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
  • उत्कृष्ट मुलाखत - आसाराम लोमटे, मुलाखतकार
  • मनीषा उगले, शब्दांगण दिवाळी अंक
  • उत्कृष्ट मुखपृष्ठ - साप्ताहिक विवेक (चित्रकार विनायक खरात) (५ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
  • सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार ज्ञानेश बेलेकर (५ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
  • जिल्हास्तरीय दिवाळी अंक निकाल :
  • प्रथम क्रमांक इंद्रधनु (४० हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
  • द्वितीय क्रमांक
  • आगरी दर्पण (२० हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
  • तृतीय क्रमांक
  • शब्द संवाद (१० हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
  • उत्तेजनार्थ १ उत्तेजनार्थ २
  • रसायनी, टाइम्स (५ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
  • उत्कृष्ट कथा
  • पनवेल टाइम्स (५ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
  • गॉयटर, लेखक किरण येले, आगरी दर्पण दिवाळी अंक (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
  • उत्कृष्ट लेख ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा, लेखक अरविंद पाशिलकर, श्री समर्थ विचार दिवाळी अंक
  • (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
  • उत्कृष्ट कविता चाळ, कवी दिलीपराव झुंजारराव, म्हसळा टाइम्स दिवाळी अंक
  • (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com