सरकार त्याच्या विरोधातील उठणारा प्रत्येक आवाज दाबण्यासाठी सज्ज आहे.यासाठी ते वेगवेगळ्या आघाड्यावर पूर्वीपासूनच कार्यरत असतात.शिक्षण रोजगार महागाई तसेच देशातील अनागोंदी, अराजकता व कमालीची धर्मांधता, जगण्या मरण्यातील वाढलेली भीषणता या विरोधी जर कोणी आवाज उठवला तर तुम्ही देशद्रोही ठरवले जाता, धर्मद्रोही ठरवले जाता आणि आतंकवादी देखिल ठरवले जाता. रस्त्यावर उतरलात तर पोलिस बाळाचा वापर केला जातो तुमच्या आंदोलनात घुसून तुमच आंदोलन बदनाम करून मोडीत काढल जाते आणि तुमच्यावरच गुन्हे दाखल केले जातात _कोर्टात गेलात तर न्यायालयात तुमची केस फेटाळली जाते स्वीकारली तर दिरंगाई केली जाते आणि न्याय नाकारला जातो__बिकाऊ मीडियाकडून तुमचं आंदोलनच चुकीच कसे आहे हे बिंबवलं जातं, भ्रम निर्माण केला जातो खोट्या बातम्या दिल्या जातात आणि आंदोलकांच्या हेतूवर मोठा प्रश्न निर्माण केला जातो. _त्यामुळे जनमानसात या आंदोलनाबद्दल आपुलकी ऐवजी तिरस्कार निर्माण केला जातो.सत्ता आणि पैशापायी इमान विकलेल्या तुमच्याच दलाल नेत्यांना आंदोलनावर तोंड सुख घेण्यासाठी पुढे केले जाते. प्रचंड ताकतीचे निर्माण झालेले आंदोलने मोडीत काढण्यासाठी सर्व बाळाचा वापर केला जातो आणि त्याच काळात मोठा दुसरा विषय पुढे आणला जातो आणि त्यावरून लोकांचं लक्ष डायव्हर्ट केलं जातं.
हे आजवर चालत आलेल आहे ते हे करू शकतात कारण _तुम्ही संघटित नाहीत,तुम्ही वैचारिक मुद्द्यावर एकत्र येत नाहीत, तुमच्यातीलच काही लोकं नंतर वैयक्तिक स्वार्थासाठी गद्दारी करून विकले जातात. तुमच्यात टोकाचे मतभेद निर्माण होतात तसेच तुमच्याकडे रस्त्यावरील व कागदावरील आंदोलनाचे ठाम नियोजन नसते. _याशिवाय ते राजकीय दृष्ट्या सक्षम आहेत कारण त्यांच्याकडे ईव्हीएम आहे. जनता जरी त्यांच्या विरोधात वोट देत असली तरी ईव्हीएम मध्ये जनतेचे मत गायब करून मतांची फेरफार करून तेच निवडून येत आहेत.ते धार्मिकदृष्ट्या सक्षम आहेत कारण त्यांच्याकडे देशभर लोकांना वेडे करण्यासाठी रात्रंदिवस प्रचार प्रसार करणारे मंहत साधू साधवी यांची मोठी फौज आहे. तसेच लोकांच्या डोळ्यात धुळफेक करून खोटे मुद्दे चर्चेला आणून मूळ मुद्दे गायब करणारी बिकाऊ मीडिया त्यांच्याजवळ आहे._ _जर तुम्हाला ह्या तगड्या दुश्मनांचा सामना करायचा असेल तर तुमच्याकडे पुढील अस्त्र सक्षमरित्या असली पाहिजेत_
सामाजिक इमानदारी, अचूक रणनीती, देशव्यापी संघटित शक्ती, सातत्यपूर्ण निरंतर प्रयत्न व दोस्त आणि दुश्मनाची ओळख
0 टिप्पण्या