Top Post Ad

CockrochJanataParty अभिजीत दिपके यांच्यासोबत मुंबईतील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

दिनांक ७ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक मा. अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.  बैठकीदरम्यान मा. अभिजीत दिपके यांनी मुंबईकर कॉक्रोचेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत मागील दोन महिन्यांत करण्यात आलेल्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. मुंबईमध्ये सुरू असलेला संघर्ष, जनजागृती आणि संघटनात्मक कार्य याच जोमाने पुढे सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी कॉक्रोच जनता पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक मा. आदित्य शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. संघटन विस्तार, कार्यपद्धती, जनआंदोलनांची दिशा तसेच कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

बैठकीत मा. अभिजीत दिपके यांनी लडाखमधील पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांच्यासोबत लेह-लडाख येथील पर्यावरण संरक्षण चळवळीत झालेल्या सहभागाबाबत माहिती घेऊन चर्चा केली. तसेच १६ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंदोलनाच्या नियोजनासाठी आणि धोरणात्मक निर्णय घेऊन मुंबई टीमला सातत्याने मार्गदर्शन करणारे इंद्रजीत मोहिते यांच्या प्रयत्नांची विशेष दखल घेण्यात आली.सोबतच प्रणय आहिरे आणि अमोल आसुलकर यांनी दिल्ली व इतर ठिकाणी जाऊन आंदोलनांना दिलेल्या योगदानाची नोंद घेण्यात आली. मुंबई आंदोलनाच्या माध्यमातून युवक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई भेटीचे निमंत्रण मा. अभिजीत दिपके यांनी स्वीकारले असून, मुंबईतील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारीही सोपविण्यात आली. आगामी आंदोलनांची दिशा, संघटन विस्तार, जनहिताचे विविध प्रश्न आणि पुढील कृती आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीमुळे संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा आणि स्पष्ट दिशा मिळाली असून, मुंबईकर कॉक्रोचेस अधिक जोमाने कार्यरत राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. इंद्रजीत मोहिते, प्रणय आहिरे, अमोल आसुलकर, कुणाल कामेरकर, विजय पडळे, विवेक मोहिते, रोहन पालकर आदी मान्यवर बैठकीस उपस्थित होते.   पत्रकार परिषद व कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कृपया ९३२४४ ४२१२६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन इंद्रजीत मोहिते ( मो. +91 93244 42126) यांनी केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com