Top Post Ad

KokanRail प्रलंबीत मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे १५ ऑगस्ट रोजी, बेलापुर येथे उपोषण

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई, या प्रवासी संघटनेच्या वतीने, कोकण रेल्वेच्या अनेक प्रलंबीत मागण्यांसाठी संघटणेचे अध्यक्ष शेखर बागवे यांचे मार्गदर्शना खाली, शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वा. बेलापुर नवी मुंबई येथे उपोषण करणार असुन सर्व कोकणातील प्रवाशांनी सहभागी व्हावे असे संघटणेच्या वतीने सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी जाहीर केले आहे.     महाराष्ट्रातुन गोवा, कर्नाटक, केरळ राज्यात जाणारी ही कोकण रेल्वे कोकणातील जनतेने केलेल्या त्यागामुळे जाते. कोकणकरांनी आपली शेती, घरे, जंगल व जमिनी यांचा त्याग करुन देशाच्या विकासाचे स्वप्न पहात जमिनी दिल्या. परंतु एवढा त्याग करुनही कोकणी माणसाला या रेल्वेचा उपयोग होत नाही. यासाठी ही संघटणा गेली अनेक वर्ष संघर्ष करत आहे. सर्व मागण्या अपुर्‍याच राहिल्याने रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे उपोषण करत आहेत.

प्रमुख मागण्या :
१) कोकण रेल्वेचे दुहेरीकरण, 
२)रखडलेले सावंतवाडी टर्मिनस, 
३) वसई सावंतवाडी पॅसेंजर, 
४) कल्याण सावंतवाडी पॅसेंजर, 
५) मुंबई रत्नागिरी इंटरसिटी, 
६) दादर चिपळूण मेमू, 
७) दादर रत्नागिरी पॅसेंजर,
 ८) कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण 
९) कोकणाच्या डोक्यावर लादलेल्या सुपरफास्ट रेल्वे 
१०) प्रत्येक स्टेशनवर जादा मागणी केलेले हॉल्ट 
११) सर्व स्टेशनवर छप्पर आदी मागण्या आहेत.

कोकण रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक २२% गुंतवणूक करूनही त्याच्या वाटयाला फक्त तिनच रेल्वे. फक्त नांव कोकण रेल्वे व फायदा दक्षिणेतील राज्यांना, कोकण रेल्वेचा प्रकल्प उभा करण्यासाठी कोकणी माणसाने वाडया / वस्त्या उठवून जमिनी दिल्या. कारण भविष्यात कोकण ते मुंबई प्रवास जलद व सुखकर होईल पण त्यांची ती उपेक्षाच राहीली. मागील २५ वर्षात कोकण रेल्वेवरील प्रवासी संख्येत प्रचंड वाढ झाली आहे मात्र प्रवाशांच्या तुलनेत रेल्वे गाड्या वाढलेल्या नाहीत. वसई, कल्याण, मुंबई, दादर व पुणे येथून कोकणासाठी रेल्वे सोडाव्यात. तर उत्तरेतील पंजाब, दिल्ली, हरयाना ते दक्षिणेतील कर्नाटक केरळ दरम्यान धावणाऱ्या सर्व मेल एक्सप्रेस पुणे मिरज मार्गे वळवाव्यात किंवा ते शक्य नसेल तर यांना कोकणातील प्रत्येक तालुक्याच्या स्टेशनला अल्टरनेट हॉल्ट दयावेत. 

कोकण रेल्वे मार्गावर गुढीपाडवा, मे महिना, गणपती, होळी, दसरा सणांना रेल्वेचे तिकीट कोकणी माणसाला मिळतच नसल्याने, गेल्या १० वर्षापासून प्रवासी संघटनेच्या मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशी नाराज आहेत. शिवाय प्रलंबीत मागण्यांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. याचा उद्रेक म्हणुन कोकणवासीय मोठ्या संख्येने, नवी मुंबईतील बेलापूर कोकण रेल्वे मुख्यालयाच्या प्रांगणात १५ ऑगष्ट २०२६ रोजी सकाळी ८ वा. पासुन लाक्षणिक उपोषणाला बसत आहेत. यासाठी कोकणातील सर्वांनी सहकार्य करावे असे संघटणेच्या वतीने सेक्रेटरी जडीयार यांनी आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com