Top Post Ad

Sambhaji Bhagat विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनचे अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत यांचा जाहीर सत्कार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक राजकारणाचा महत्वाचा भाग हा संघाचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आधार हा हिटलरवादी आहे. हिटलरप्रमाणेच संघाला या देशात विरोधी पक्ष नकोत, संघाचा मनापासून संविधानाने विरोध आहे, संविधान जाळणारी आणि संविधान  जाळल्यावर खुश होणारी ही लोक आहेत. यामुळेच संघाच्या हिटलरवादी सांस्कृतिक राष्ट्रवादाविरोधात पर्यायी सांस्कृतिक राष्ट्रवाद उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लोकशाहीर संभाजी भगत यांनी येथे केले.  १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन, साताराचे अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत यांचा जाहीर सत्कार समारंभ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या३७ व्या वर्धापन दिनानिमित्त, महा अंनिस ठाणे शहर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळेस लोकशाहीर संभाजी भगत हे बोलत होते.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत सुबोध मोरे, महा अंनिस ठाणे जिल्हा, कार्याध्यक्ष डाॅ सुषमा बसवंत, महा अंनिस प्रकाशन विभागाचे कार्यवाह व समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे, महा अंनिस केंद्रीय सदस्य व महा अंनिस ठाणे शहर, कार्याध्यक्ष अनिल ठाणेकर, प्रधान सचिव अशोक मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशीला मुंडे यांनी केले  

शहीद डाॅ नरेंद्र दाभोलकर हे समाजवादी, गोविंद पानसरे हे साम्यवादी, कलबुर्गी व.गौरी लंकेश हे सेक्युलरवादी होते तरीही भेदाभेद न करता त्यांचा खून करण्यात आला. मग आपणही समाजवादी, साम्यवादी, आंबेडकरवादी, सेक्युलरवादी असा भेदभाव न करता संघाच्या हिटलरवादी सांस्कृतिक राष्ट्रवादाविरोधात उभे राहून पर्यायी सांस्कृतिक राष्ट्रवाद उभारुया, असे आवाहन लोकशाहीर संभाजी भगत यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी म्हटले की, हिटलरने आर्यवंश श्रेष्ठत्वाचा दाखला देत ६० लाख ज्युंना ठार.मारले तेव्हापासून संघात आदर्श असल्या हिटलर यांच्यात वैचारिक संवाद सुरु आहे. 

कार्यक्रमाच्या  सुरुवातीला चळवळीची गीते अंनिस सांस्कृतिक विभागाच्या वतीने सादर करण्यात आली. याप्रसंगी अशोक मोहिते, किशोर भोईर, प्राचार्य मच्छिंद्र तिगोटे, विजय गडलिंग, छाया ठाणेकर, दर्शना ढोले, प्रमोद तामसे या महा अंनिस ठाणे शहर शाखेतील सहकाऱ्यांचा, त्यांनी संविधान प्रचार-प्रसारासाठी केलेल्या कार्याचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com