बोईसर येथील 29 वर्षीय विवाहित महिलेने ठाण्यातील एका पत्रकारावर गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून विश्वास संपादन केला आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा महिलेने तक्रारीत केला आहे तक्रारीनुसार,या पत्रकाराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याशी जवळचे संबंध असल्याचा दावा केल्याचे आरोप आहेत. तसेच पत्रकार कोट्यातून घर मिळवून देण्याचे आश्वासन देत ₹५ लाख रुपये उकळले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. काशिमीरा पोलीस ठाण्यात BNS कलम 74, 316(2) आणि 318(4) अंतर्गत FIR दाखल झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात विनयभंग/लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, फसवणूक आणि विश्वासघाताशी संबंधित आरोप करण्यात आले आहेत. या तथाकथित पत्रकाराचे नाव संजय पितळे असल्याचे समजते
FIR मधील तक्रारीनुसार, पत्रकार कोट्यातून घर मिळवून देण्याचे आश्वासन देऊन तक्रारदाराकडून ₹5 लाख घेतल्याचा आरोप आहे. तसेच Facebookच्या माध्यमातून संपर्क झाल्यानंतर तक्रारदाराचा मोबाईल फोन घेतला, तिला काशिमीरा येथे बोलावले आणि त्यानंतर गोरेगाव/गोराई बीच येथे नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. तेथे लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, या तथाकथित पत्रकाराने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यांच्या प्रोफाइलवर उपमुख्यमंत्र्यांचा फोटो असल्याने महिलेने रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. उपमुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याची विनंती वारंवार केली होती आणि त्यांनी भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले.21 मे 2026 रोजी काशिमीरा परिसरात हा पत्रकार महिलेला भेटला. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या समोरील एका रेस्टॉरंटमध्ये चहा घेतल्यानंतर महिलेला मोटारसायकलवरून गोराई बीच परिसरात घेऊन गेला. बाहेर उकाडा असल्याचे सांगून, तसेच उपमुख्यमंत्री मीरा-भाईंदर परिसरात येणार असल्याचे सांगत एका हॉटेलमध्ये नेल्याचा आरोप महिलेने केला आहे. तेथे तिला लाल रंगाचे शीतपेय देण्यात आले. ते प्यायल्यानंतर गुंगी येऊ लागली आणि अर्धबेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला असल्याचा आरोप महिलेने केला आहे. याबाबत जाब विचारला असता त्याने राजकीय व पोलीस अधिकाऱयांशी आपले संबंध असल्याचे सांगून धमकी दिल्याचा आरोपही महिलेने केला आहे.
या प्रकरणात ण्अ, मोबाईल टॉवर लोकेशन, ण्ण्ऊन्न् फुटेज, sंप्atsAज्ज् चॅट व कॉल रेकॉर्डिंग यांसह डिजिटल पुराव्यांची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे. 21 मे रोजी संबंधित व्यक्तींच्या हालचालींची तांत्रिक माध्यमातून पडताळणी होऊ शकते. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ. बिनू वर्गीस यांनी उपलब्ध sंप्atsAज्ज् रेकॉर्डिंग व क्रीनशॉट अस्सल असल्याचा दावा केला असून, मूळ डेटा पेनड्राइव्हमध्ये सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणातील आरोपांची अधिकृत तपास यंत्रणेकडून पडताळणी होणे बाकी असून, पुढील पोलीस कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तक्रारीनुसार, या पत्रकाराने विश्वास संपादन करण्यासाठी तिच्याशी आपुलकीने वागण्याचा प्रयत्न केला. तिच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या घराजवळील दुकानातून 2 किलो वजनाचा वाढदिवसाचा केक ऑनलाइन पेमेंट करून घेतल्याचेही तक्रारीत नमूद असल्याचे सांगण्यात येते. या वर्तनाबाबत संशय निर्माण झाल्यानंतर महिलेने एका मैत्रिणीशी चर्चा केली. त्यानंतर स्वतःच्या सुरक्षेसाठी तिने संभाषणांचे रेकॉर्डिंग तसेच WhatsApp कॉल्स आणि चॅट्स जतन केल्याचा दावा केला आहे. CDR आणि Tower Location तपासातून 21 मेच्या घटनाक्रमावर प्रकाश पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिरा-भाईंदर: 21 मे 2026 रोजी या पत्रकाराच्या हालचालींची पडताळणी करण्यासाठी CDR, टॉवर लोकेशन, CCTV फुटेज आणि इतर डिजिटल पुरावे महत्त्वाचे ठरू शकतात.
दुपारी 1.21 वाजता काशिमीरा पोलीस ठाण्याच्या समोर भेट, त्यानंतर रेस्टॉरंट आणि पुढे गोऱाई बीच परिसरातील लॉजिंगपर्यंतचा कथित प्रवास... या संपूर्ण घटनाक्रमाची डिजिटल पुराव्यांच्या आधारे पडताळणी होऊ शकते. FIR संदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत असून, पुढील कायदेशीर कारवाई तपासानंतर स्पष्ट होणार आहे. महिलेने दिलेल्या WhatsApp कॉल रेकॉर्डिंग्ज आणि स्क्रीनशॉट्सबाबत, हे साहित्य AI किंवा ChatGPTच्या माध्यमातून तयार केलेले नसून ते मूळ असल्याचा दावा करण्यात आला आहे. संपूर्ण मूळ डेटा आणि संबंधित पुरावे पेनड्राईव्हमध्ये सुरक्षित असून, तपास यंत्रणेला आवश्यकतेनुसार ते सादर करता येतील, असे Social Activist Dr. Binu Varghese यांनी सांगितले.
या प्रकरणी पत्रकार कोट्यातून घरे मिळवून देण्याचे अमिष देऊन किती जणांच्या बाबत असे अनैतिक कृत्य केले आहे. याची चौकशी व्हावी अशी चर्चा आता ठाण्यामध्ये होत आहे. श्रमिक पत्रकारांकरिता असलेल्या या पत्रकार घरकूल योजनेपासून खरे लाभार्थी अद्यापही दूर आहेत. केवळ त्यांच्याकडे एका ठराविक संघटनेचे सभासदत्व नसल्याने त्यांना घरे नाकारण्यात आली. यामध्ये तत्कालिन महापालिकेचे अधिकारीही सहभागी आहेत का याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ किती पत्रकारांना झाला याचा खुलासा ठाणे महानगरपालिकेने केला पाहिजे. त्यामुळे हे जाहीर होईल की ठाण्यातील किती श्रमिक पत्रकार यापासून वंचित राहिले. शासकीय योजनांचा लाभ स्वतःच्या फायद्यासाठी तर करतच आहेत मात्र अशा अनैतिक कामांसाठीही करत असल्याने ठाण्यामध्ये संताप व्यक्त होत आहे.
2016 आणि 2019 च्या सर्वेक्षणाचा आधार घेऊन. ठाणे महापालिका उपायुक्त - अतिक्रमण नियंत्रण विभाग यांनी ठाणे महापालिका क्षेत्रातील पात्र फेरीवाल्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये स्वत:ला ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणवून घेणाऱया संजय चंद्रकांत पितळे याचे नाव अ.क्र. 135 व अर्ज क्र.2892 वर होते. ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्राबाबत सामाजिक कार्यकर्ते सुभाष दिगंबर ठोंबरे यांनी आक्षेप घेतला. त्याअनुषंगाने सदर प्रकरणी तत्कालिन सहाय्यक आयुक्त, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती यांनी सादर केलेला अहवाल दि08/03/2023 रोजी झालेल्या ठाणे महानगरपालिका शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत निर्णयासाठी ठेवण्यात आले होते . याबाबत सखोल चौकशी होऊन अखेर पितळे याने ठाणे महानगरपालिकेकडे खोटी माहिती देऊन ठामपाची फसवणूक करून मिळविलेले फेरीवाला प्रमाणपत्र सुभाष ठोंबरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रद्द करण्यात आले होते.

0 टिप्पण्या