Top Post Ad

शहीद हेमंत करकरेंचे मारेकरी कोण? ... काही प्रश्न अनुत्तरीत

हेमंत करकरे साहेबांचा मृत्यू मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात झाला ही वस्तुस्थिती आहे.परंतु अमेरिकन गुप्तहेर संस्थेने रॉ ला दिलेली अत्यंत संवेदनशील व पक्की गुप्त माहिती आयबीने व  नौदलाच्या गुप्तचर संचालनालयाने दाबून का टाकली. याच्यावर कधीही चर्चा घडवून दिल्या गेली नाही.गुप्तचर विभागाचे महासंचालक प्रभाकर आलोक यांनी ही माहिती नौदल गुप्तचर विभागाच्या मुख्य संचालकाद्वारे नौदल मुख्यालयाला व सागरी तटरक्षक दलाला दिनांक 20 नोव्हेंबरला पाठवली. परंतु आश्चर्य म्हणजे हल्ल्याची प्रत्यक्ष संबंधित असलेल्या मुंबई पोलीस अथवा महाराष्ट्र शासनास ही माहिती दिली नाही.( दि इंडियन एक्सप्रेस मुंबई 15 व 26 डिसेंबर 2008) राॅ" अथवा कॅबिनेट सचिवलयाने अथवा अशाच उच्चतम सूत्राकडून गुप्तचर विभागास (आय बी स) लष्करे तोयबाकडून वापरल्या जाणाऱ्या 35 भ्रमणध्वनी( मोबाईल)फोनच्या नंबरची यादी पुरवण्यात आली होती व ते निग्रणी खाली ठेवण्यास सांगण्यात आले होते.

गुप्तचर खात्यास ही माहिती 21 नोव्हेंबर रोजी म्हणजे हल्ल्यापूर्वी पाच दिवस आधी मिळाली होती. पण गुप्तचर खात्याने त्यावर पाळत ठेवली नाही हा हलगर्जीपणा निश्चित अक्षम्य होता. कारण या गुप्त माहितीतील 35 मोबाईल पैकी तीन मोबाईल हे दहशतवाद्याकडून त्यांच्या पाकिस्तानातील नियंत्रकाशी संपर्कात राहण्यासाठी वापरले गेले होते असे निष्पन्न झाले आहे. (हिंदुस्तान टाइम्स 10 जानेवारी 2009) जेव्हा प्रत्यक्षात मुंबई वर दहशतवादी हल्ला झाला आणि एटीएस प्रमुख हेमंत करकरे व इतर दोन अधिकारी गोळीबारात मारले गेले तेव्हा कुठे गुप्तचर खात्याने कारवाई सुरुवात केली. 35 पैकी बारा मोबाईल फोनची सिम कार्ड जिथून कधी खरेदी केल्याचे म्हटले होते. त्या कलकत्त्याची संपर्क करून मुंबई पोलिसांना सावध करण्यात आले व फोनवरील संभाषण रेकॉर्ड करण्यास सुरुवात झाली. (हिंदुस्तान टाइम्स 10 जानेवारी 2009)

दिनांक 31 मे 2009 च्या इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार प्रधान समितीचे दुसरे सदस्य आणि रॉ चे माजी अधिकारी व्ही बालचंद्रन यांनी त्यांचे माजी सहकारी व चेन्नई येथील सुरक्षा तज्ञ बी रमन्ना यांना एक ईमेल पाठवला होता. यात श्री रमण यांनी प्रधान समितीच्या अहवालाच्या खरेपणा बाबत ज्या शंका उपस्थित केल्या होत्या त्याची निरसन केले होते. वास्तविक रॉ ने त्यांचे कर्तव्य बजावले होते व त्यामुळे त्यांना माहिती देण्याचे टाळण्याचे कारण नव्हते ;पण आय बी तील ब्राह्मण्यवादी अधिकाऱ्यांनी प्रधान समितीला माहिती न देण्याबद्दल वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांच्यावर दबाव आणला असण्याची शक्यता आहे. मुंबई हल्ल्यातील मुख्य लाईनवरील 16 सीसीटीव्ही ज्या भागात अतिरेक्यांनी आतंकवादाचे तांडव केले तेच 16 कॅमेरे नादुरुस्त असल्याने त्यात चित्रीकरणही झाले नाही अशी सांगण्यात आले.

कोणत्याही परिस्थितीत हे दृष्टकृत्ये करणाऱ्याची क्षणचित्रे लोकापर्यंत पोहोचू नयेत एवढी दक्षता घेतलेली असावी कारण गुप्तचर विभागात आय बी मध्ये  ब्राह्मणवाद्यांचा सहभाग असल्याचा संशय असल्याने वरील प्रकरण झालेले असावे.(मनुवादी) हिंदू दहशतवादी यांच्या देशविरोधी दहशतवादी कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडणारे अत्यंत प्रामाणिक अधिकारी हेमंत करकरे यांचा खून करण्यात आला यांना ठार मारण्यात आले. शहीद हेमंत करकरे साहेबांचे खरे मारेकरी कोण ?याची कसून चौकशी व्हायला पाहिजे होती परंतु ती झालेली नाही. म्हणून काही प्रश्न अनुत्तरीत आहेत, मात्र त्यावर शंका उपस्थित केल्या जाणार.

  • हरिभाऊ सोळंके  
  • सादोळा ता माजलगाव जि बीड 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com