Top Post Ad

कांजूर गावातील वृक्ष प्रस्तावाबाबत Mumbai महापालिकेची भूमिका उदासीन

कांजूर गाव, एल.बी.एस. मार्ग येथील प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पासंदर्भातील वृक्ष प्राधिकरणाच्या प्रस्तावात एकूण ३९ बाधित झाडांपैकी २४ झाडे तोडण्याचे आणि १५ झाडांचे पुनर्रोपण करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर ७०७ भरपाईपरक झाडे लावण्याचा प्रस्ताव नोंदवण्यात आला आहे. या विषयावरील भूमिका विकासविरोधाची नसून, वृक्षसंवर्धनासंदर्भातील कायदेशीर, तांत्रिक आणि पर्यावरणीय प्रक्रियेची पूर्ण पारदर्शकता आणि अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची आहे. ७०७ भरपाईपरक झाडांबाबत: प्रस्तावात सुमारे ५,१८१.९३ चौ.मी. क्षेत्र उपलब्ध असल्याचे तसेच Miyawaki आणि पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण करण्याचा उल्लेख आहे.  मात्र, ही सर्व ७०७ झाडे प्रत्यक्षात नेमकी कुठे लावली जाणार आहेत, याचा सविस्तर जिओ-रेफरन्स्ड वृक्षारोपण आराखडा सादर करणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रत्येक झाडाचे स्थान, प्रजाती, अंतर आणि उपलब्ध जमीन स्पष्ट असावी.

झाडांच्या वयाच्या निर्धारणाबाबत: प्रस्तावातील तक्त्यात मोठ्या झाडांचे अंदाजे वय नोंदवले आहे. उदाहरणार्थ, झाड क्र. ७८ हे पिंपळ असून त्याची उंची सुमारे ४० फूट, घेर ११ फूट ६ इंच आणि अंदाजे वय ४० वर्षे असे नमूद आहे. झाड क्र. ७९ ची उंची ४० फूट, घेर १३ फूट आणि अंदाजे वय ४५ वर्षे नोंदवले आहे. प्रत्येक झाडाचे वय कोणत्या वैज्ञानिक पद्धतीने निश्चित करण्यात आले, कोणत्या अधिकाऱ्याने किंवा तज्ज्ञाने त्याची पडताळणी केली आणि त्याची गणना कशी करण्यात आली, याची माहिती बीएमसीने सार्वजनिक करावी.  ७०७ झाडांच्या संख्येची गणनाही स्पष्ट झाली पाहिजे. प्रस्तावात २४ तोडण्यात येणाऱ्या झाडांसाठी ४३० आणि १५ पुनर्रोपण करण्यात येणाऱ्या झाडांसाठी २७७, अशी एकूण ७०७ भरपाईपरक झाडांची संख्या नमूद आहे. म्हणून सर्व ३९ बाधित झाडांची झाडनिहाय गणना सार्वजनिक करण्यात यावी.

१५ झाडांच्या पुनर्रोपणाबाबत, प्रत्येक झाडासाठी प्रस्तावित नवीन ठिकाण, पुनर्रोपणाची तांत्रिक पद्धत, तज्ज्ञांचे मत, देखरेखीची व्यवस्था तसेच झाड जगले नाही तर त्याच्या जागी नवीन झाड लावण्याची जबाबदारी स्पष्ट करावी. प्रस्तावात उर्वरित ५९ झाडे कायम ठेवण्याचे नमूद आहे. 17-sep-26 (tree ajinda).pdf बांधकाम आणि खोल उत्खननादरम्यान या झाडांच्या मुळांचे संरक्षण कसे केले जाणार आहे, याचा स्वतंत्र आराखडा द्यावा.  तसेच, पूर्वीच्या वृक्षारोपणाची पूर्तता, जिओ-टॅगिंग, पुनर्रोपित झाडांचे अस्तित्व आणि मागील परवानग्यांचे अनुपालन यासंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांना बिंदूनिहाय आणि कारणासहित उत्तर देण्यात यावे. 

आमच्या प्रमुख मागण्या
१. सर्व बाधित झाडांच्या वयाची स्वतंत्र वैज्ञानिक पडताळणी करावी.
२. ७०७ भरपाईपरक झाडांची झाडनिहाय गणना जाहीर करावी.
३. ७०७ झाडांसाठी जिओ-टॅग्ड वृक्षारोपण आराखडा जाहीर करावा.
४. १५ पुनर्रोपित झाडांची ठिकाणे आणि देखरेख योजना सार्वजनिक करावी.
५. कायम ठेवण्यात येणाऱ्या झाडांसाठी मुळांचे संरक्षण व उत्खनन सुरक्षा आराखडा द्यावा.
६. झाडे वाचवण्यासाठी विचारात घेतलेले पर्यायी बांधकाम/लेआउट आराखडे सार्वजनिक करावेत.
७. प्राप्त सर्व आक्षेपांना बिंदूनिहाय उत्तर द्यावे.
८. कोणतीही अंतिम कार्यवाही करण्यापूर्वी प्रत्यक्ष स्थळ पाहणी पुन्हा करावी.

“आमचा मुद्दा विकास थांबवण्याचा नाही. आमचा मुद्दा असा आहे की वृक्षसंवर्धनाची प्रक्रिया केवळ कागदोपत्री न राहता तिची प्रत्यक्ष आणि पारदर्शक अंमलबजावणी झाली पाहिजे-अशरफ आझमी, गटनेता, इंडियन नॅशनल काँग्रेस, बीएमसी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com