श्रीगणेशोत्सव सोहळा मुंबई महानगरीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या माध्यमातून नागरी सेवा-सुविधा तसेच जनहितविषयक संदेश नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावेत, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दरवर्षी श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या स्पर्धेचे ३७ वे वर्ष असून या स्पर्धेत ५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता. प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेरींमध्ये ही स्पर्धा पार पडली. सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळाने देखाव्यासाठी निवडलेला विषय, पर्यावरणपूरक मूर्ती, विषयाची मांडणी, मंडळाने केलेली सामाजिक व विधायक कार्ये, परिसर स्वच्छता, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध मोहिमांमध्ये–कार्यांमध्ये नोंदविलेला सहभाग, पर्यावरणपूरकता, जनहित संदेशांचा वापर आदी बाबींचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. महानगरपालिका मुख्यालयात आज २३ सप्टेंबर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, यांनी या स्पर्धेच्या निकालाची घोषणा केली.
अंधेरी (पश्चिम) येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव प्रथम पुरस्कार (रुपये ७५,००० आणि सन्मानचिन्ह) पटकावला आहे. तर, घाटकोपर (पश्चिम) येथील अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ भटवाडीचा राजा मंडळाने द्वितीय पुरस्कार (रुपये ५०,००० आणि सन्मानचिन्ह) आणि करीरोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने तृतीय पुरस्कारावर (रुपये ३५,००० आणि सन्मानचिन्ह) मोहोर उमटवली आहे. यंदा शाडू मातीच्या सर्वोत्कृष्ट श्रीगणेशमूर्तीचा पुरस्कार कांजूरमार्ग येथील शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास, तर सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचे पारितोषिक मयेकर यांना विलेपार्ले येथील बाळ गोपाळ मित्र मंडळ मुंबईचा पेशवाच्या श्रीगणेश मूर्तीसाठी, तसेच सर्वोत्कृष्ट नेपथ्यकाराचे (सजावटकाराचे) पारितोषिक बोरिवली पूर्व येथील विघ्नहर्ता रहिवाशी मित्र मंडळ (चंपाभुवनचा विघ्नहर्ता) सजावटीसाठी रेश्मा शिंदे यांना जाहीर करण्यात आले आहे. अवयवदान जागृतीसाठी विक्रोळी पश्चिम येथील बालमित्र कला मंडळाला, तर पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी कोकणीपाडा, दहिसर पूर्व येथील श्रीश्रद्धा मित्र मंडळ आणि दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. गोरेगाव (पश्चिम) येथील बेस्ट नगर गणेशात्सव मंडळ आणि मालवणी मालाड येथील युवक उत्कर्ष मंडळ मंडळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिके घोषित झाली आहेत. याव्यतिरिक्त १४ मंडळांना विशेष प्रशस्तिपत्रकेही जाहीर करण्यात आली आहेत.या स्पर्धेचे परिक्षण प्राची संसारे (जे. के. अकादमी, वडाळा), प्रशांत इप्ते (सर जे जे कॉलेज ऑफ आर्ट्स), शिबानी जोशी (अखिल सार्वजनिक गणेशोत्स व महासंघ), प्रसाद मोहिते (बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघ), दीपक कार्डिले (बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सह समन्वय समिती, परेश कारेकर (बृहन्मुंबई वक्रतुंड मूर्तिकार संघ), रवींद्र काळे (बृहन्मुंबई महानगरपालिका निवृत्त अधिकारी), मारुती मोरे (बृहन्मुंबई वार्ताहर संघ), दीपक चौधरी (संगीत व कला अकादमी बृहन्मुं बई महानगरपालिका) यांनी केले. या ९ परिक्षकांनी दिनांक १७ आणि १८ सप्टेंबर २०२६ रोजी प्राथमिक फेरी आणि दिनांक १९ व २० सप्टेंबर २०२६ रोजी अंतीम फेरी पार पडली. त्यानंतर परिक्षकांकडून अंतीम निकाल लिफाफ्यात बंद करण्यात आला.
*‘श्रीगणेश गौरव स्पर्धा – २०२६’ चा सविस्तर निकाल*
१. प्रथम पारितोषिक (रु.७५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)- स्वप्नाक्षय मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव अंधेरी (पश्चिम)
२. द्वितीय पारितोषिक (रु.५०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)- अखिल भटवाडी सार्जनिक उत्सव मंडळ, भटवाडीचा राजा, घाटकोपर पश्चिम
३. तृतीय पारितोषिक (रु.३५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)- पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, करीरोड
४. सर्वोत्कृष्ट मूर्तिकार (रु.२५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)- श्री. मयेकर, बाळगोपाळ मित्रमंडळ मुंबईचा पेशवा, विलेपार्ले पूर्व
५. सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (सजावटकार) (रु.२०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)- रेश्मा शिंदे, विघ्नहर्ता रहिवासी मित्रमंडळ (चंपाभुवनचा विघ्नहर्ता), बोरिवली पूर्व
६. उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेः (प्रत्येकी रुपये १०,०००/-)
१) बेस्ट नगर श्रीगणेशोत्सव मंडळ, गोरेगाव पश्चिम
२) युवक उत्कर्ष मंडळ, मालवणी मालाड पश्चिम
७.प्लास्टिक बंदी / थर्माकोल बंदी / पर्यावरणविषयक जनजागृती उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेः (प्रत्येकी रुपये १०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)
१. श्रीश्रद्धा मित्र मंडळ ट्रस्ट, कोकणीपाडा, दहिसर पूर्व
२. शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता) दादर
८. शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती पारितोषिक (रु.२५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) - शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांजूरमार्ग पूर्व
९. सामाजिक कार्य / समाजकार्य / अवयवदान जागृती- पारितोषिक (रु.१५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) – बालमित्र कला मंडळ, विक्रोळी पश्चिम
*प्रशस्तीपत्र प्राप्त गणेशोत्सव मंडळे*
१. स्री शक्ती – गोकुळ नगर सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळ, दहिसर पूर्व
२. कागदी मूर्ती- मराठा मित्र मंडळ, जमील नगर, भांडूप पश्चिम
३. विषयाची योग्य मांडणी- बालविकास मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव, कांजूर पूर्व
४. अन्नधान्य भेसळ जनजागृती- इलेव्हन इव्हिल्स क्रिकेट क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, धारावी
५. सामाजिक कार्य- श्री हनुमान सेवा मंडळ, काळा किल्ला, धारावी
६. कृत्रिम बुद्धिमत्ता- महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, महादेवाची वाडी परळ
७. सामाजिक जाणीव- पारशीवाडी मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, चिंचपोकळी पश्चिम
८. पर्यावरणपूरक- बालसाथी मित्र मंडळ, करीरोड
९. सुबक मूर्ती- धसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाकूरद्वार
१०. सामाजिक कार्य- श्रीक्ष्मी नारायण बाल गणेश मित्र मंडळ, घाटकोपरचा राजा, घाटकोपर पूर्व
११. उंच कागदी मूर्ती- ओम श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ (मुंबईचा महाराजाधिराज) परेरावाडी, साकीनाका
१२. सामाजिक विषय- श्री साईदर्शन मित्रमंडळ, म्हात्रेवाडी बोरिवली पश्चिम
१३. उत्कृष्ट रंगसंगती- श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कस्तुरपार्क, बोरिवली पश्चिम
१४. सामाजिक कार्य- हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळ, दादर

0 टिप्पण्या