Top Post Ad

News प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांच्या पुस्तकाला ‘आशीर्वाद पुरस्कार

मुंबई : वंदना प्रकाशन, मुंबईतर्फे उत्कृष्ट हिंदी वाङ्मय निर्मितीसाठी दिला जाणारा २७ वा ‘आशीर्वाद पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सन २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या ‘संकीर्ण ऐतिहासिक अनुवाद’ या श्रेणीत प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांच्या मूळ मराठी पुस्तकाच्या हिंदी अनुवादाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. प्रा. सामंत यांच्या ऐतिहासिक विषयावरील मूळ मराठी पुस्तकाचा डॉ. मीना श्रीवास्तव यांनी ‘भारतीय स्वतंत्रता आंदोलन की अनकही कहानियां’ या नावाने हिंदी अनुवाद केला आहे. या अनुवादित पुस्तकाला २०२४ या वर्षासाठीचा ‘आशीर्वाद पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

वंदना प्रकाशन, मुंबईचे संस्थापक आणि ‘आशीर्वाद पुरस्कार’चे प्रवर्तक डॉ. सुनील सावंत यांनी पुरस्कारांची घोषणा केली. हिंदी साहित्य निवड समितीचे अध्यक्ष डॉ. बीरेन्द्र प्रताप सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समितीने पुरस्कार विजेत्या पुस्तकांची निवड केली. साहित्य क्षेत्रातून प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल  तसेच अनुवादक डॉ. मीना श्रीवास्तव यांचे अभिनंदन होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com