अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगढी यांनी उल्हासनगरचे डॉ. प्रशांत इंगळे यांची 'पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटी'च्या अल्पसंख्याक विभागाच्या सहप्रभारीपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आणि इम्रान प्रतापगढी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. इंगळे यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
उल्हासनगरचे डॉ. प्रशांत इंगळे यांनी बिहार, पॉंडेचरीच्या निवडणुकीत सहप्रभारी पद यशस्वीपणे हाताळली आहे. यांचे संघटन कौशल्य बघून पक्ष नेतृत्वाने, पंजाबच्या अल्पसंख्याक विभागाच्या सहप्रभारीपदी नियुक्ती केली. संघटन पातळीवर प्रभावी काम करून काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचा संकल्प डॉ. इंगळे यांनी व्यक्त केला. तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून अल्पसंख्याक विभागाचे संघटन सक्षम आणि व्यापक करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, नवनिर्वाचित प्रभारी महबूब छोकर यांचे अभिनंदन करत, त्यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या