ठाणे:अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाच्या तयारी करीता भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ठाण्यात मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयु. मुजमुलेताई होत्या, बुधवार दि.२३/९/२०२६ रोजी सायंकाळी ठाणे वागळे इस्टेट येथील रामनगर लुंबिनी बुद्ध विहार येथे संपन्न झालेल्या या बैठकीत ठाणे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते,
यावेळी महामोर्चा कृती समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड यांनी १० आक्टोबर रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या या महामोर्चाची संपूर्ण माहिती दिली, सरसेनानी मा आनंदराज आंबेडकर आणि डॉ भिमराव य. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हा महामोर्चा एक लाखाचे ध्येय गाठणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले,
अनेक कामगार संघटना सामाजिक संस्था, युनियन, समविचारी पक्षांच्या एससी प्रवर्गाच्या पदाधिकाऱ्यांनी या महामोर्चातील सहभागाची ग्वाही दिली आहे, बैठकीचे सुत्रसंचलन भारतीय बौद्ध महासभेचे महानगर सरचिटणीस जे के जाधव गुरुजी यांनी केले, यावेळी आबासाहेब चासकर, ज्येष्ठ बौद्धाचार्य वसंत मोरे,आसाराम चव्हाण, शैलेंद्र पवार, विनायक कांबळे, समता सैनिक दल लेफ्टनंट कर्नल एल आर मोरे, बबनराव जोंधळे, बाबुभाई वानखेडे, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, महिला भगिनी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

0 टिप्पण्या