Top Post Ad

पथविक्रेत्यांनावरील अन्यायकारक कारवाई विरोधात RMBPFSच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन

 पथविक्रेत्यांना सन्मानाने व्यवसाय करू द्या; अन्यायकारक मनमानी कारवाई तातडीने थांबवा, पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम, 2014 व महाराष्ट्र पथविक्रेता नियम, 2016 यांची प्रभावी अंमलबजावणी करा व स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा या मागणीकरीता कोकण विभाग : महाराष्ट्रातील पथविक्रेते, फेरीवाले, भाजीपाला व फळविक्रेते, हातगाडीधारक, छोटे व्यावसायिक, महिला विक्रेते तसेच स्वयंरोजगार करणाऱ्या नागरिकांनी बहुजन मुक्ती पार्टी (BMP) तथा RMBPFS — राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन पथविक्रेता फेरीवाले संघ यांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाचे दुसरे चरण म्हणून “एक दिवसीय धरणे आंदोलन” करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व. सुमित्र अहिरे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,  प्रतापदादा पाटील, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. निलेशदादा येलवे. महाराष्ट्र कार्याध्यक्ष, तसेच प्रेमकुमार गुप्ता, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता, यांनी केले.


या अगोदर पहिल्या टप्प्यात वरील पक्ष संघटनांच्या वतीने दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये मा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करून निवेदन दिले होते व “दुसरा टप्पा” एक दिवसीय धरण आंदोलन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मा जिल्हाधिकारी कार्यालय समोर तर  कोकण विभागात मा आयुक्त तथा संचालक नगर परिषद संचालनालय मुख्य कार्यालय बेलापूर भवन येथे आयोजित करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील अनेक पथविक्रेत्यांवर अतिक्रमण विभाग व स्थानिक प्रशासनामार्फत वारंवार कारवाई केली जाते. माल जप्त करणे, व्यवसायापासून वंचित करणे आणि उपजीविकेचे साधन हिरावून घेणे यामुळे पथविक्रेत्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम, 2014 व महाराष्ट्र पथविक्रेता नियम, 2016 यांची प्रभावी अंमलबजावणी करून पथविक्रेत्यांच्या कायदेशीर व घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. 

महाराष्ट्रभर अशा अन्यायकारक चालू आहे तसेच गेल्या २ महिन्यांपासून कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या माध्यमातून कारवाई चे आदेश देण्यात आले आहेत या कारवाई ला कंटाळून बदलापूर जिल्हा ठाणे येथील एका पथ विक्रेता मयत विशाल दाते याने दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली यासाठी कुटुंबाच्या वतीने विशाल दाते याचे प्रेत कुळगाव बदलापूर नगर परिषद कार्यालयावर न्हेऊन न्याय मागण्यात आला होता परंतु त्यानंतरही KBMC च्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून सतत अन्यायकारक कारवाई करून पथ विक्रेत्यांवर अन्याय केला जात आहे असा आरोप बहुजन मुक्ती पार्टी चे निलेश येलवे यांनी केला आहे तर दाते कुटुंबाने व पक्षाने या कारवाईमुळे आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारे भाजप च्या नगर अध्यक्षा रुचिता घोरपडे, मुख्याधिकारी मारुती गायकवाड, भाजपाचे नगरसेवक संभाजी शिंदे,  भाजपाच्या नगरसेविका रती पातकर, अतिक्रमण विभाग अधिकारी संदीप कांबळे व विनोद वाल्मिकी जबाबदार असून या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे 

आणि दाते कुटुंबाला रुपये ५० लाखाची भरपाई व कुटुंबातील एका व्यक्तीला नगर परिषदेमध्ये सरकारी नोकरीची मागणी केली आहे तसे ठाणे जिल्हा अधिकारी यांनी नगरपरिषद आयुक्त तथा संचालक बेलापूर यांना पत्र दिले आहे यामुळे संबंधितांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी बहुजन मुक्ती पार्टी ने उच्चस्तरीय चौकशीची मागणीचा जोर धरला आहे. यासोबतच नागरिकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, प्रत्यक्ष वीज वापराच्या आधारेच वीजबिले आकारावीत आणि ग्राहकांच्या तक्रारींचे योग्य निराकरण करावे, या मागणीसाठीही आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या
1. पथविक्रेता अधिनियम, 2014 व महाराष्ट्र पथविक्रेता नियमांची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करावी.
2. ज्या पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण झालेले नाही, त्यांचे तात्काळ सर्वेक्षण करावे.
3. पात्र पथविक्रेत्यांना Certificate of Vending / व्यवसायाचे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात यावे.
4. पथविक्रेत्यांच्या घटनात्मक व्यवसाय व उपजीविकेच्या अधिकाराचे संरक्षण करावे.
5. कारवाईदरम्यान जप्त केलेला पथविक्रेत्यांचा माल नियमानुसार तात्काळ परत करावा.
6. पथविक्रेत्यांसाठी कायद्यानुसार Vending Zone व पर्यायी व्यवसायाची जागा उपलब्ध करून द्यावी.
7. ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये.
8. स्मार्ट मीटर व विद्यमान डिजिटल मीटर यांची किमान सहा महिने समांतर मोजणी करून पारदर्शकता ठेवावी.
9. प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता अंदाजे वीजबिले देणे थांबवावे.
10. दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी व घरगुती ग्राहकांना नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी.
11. ⁠मयत विशाल दाते आत्महत्या व ३० जून रोजी पथ विक्रेत्यांवर झालेली कारवाई ची उच्च स्तरीय चौकशी व्हावी दाते कुटुंबाला रुपये ५० लाखाची भरपाई व कुटुंबातील एका व्यक्तीला नगर परिषदेमध्ये सरकारी नोकरी मिळावी 
12. ⁠दोषी आढळ्यास संबंधित भाजप नेते व अधिकाऱ्यांचे निलंबन करून प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.

वरील मागण्यांबाबत शासन व संबंधित प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पथविक्रेते व वीज ग्राहकांच्या समस्या सोडवाव्यात.मागण्या मान्य करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली नाही, तर बहुजन मुक्ती पार्टी (BMP), RMBPFS — राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन पथविक्रेता फेरीवाले संघ तसेच महाराष्ट्रातील सर्व पथविक्रेता संघटना, सामाजिक संघटना व समविचारी संघटनांच्या वतीने महाराष्ट्र मंत्रालयावर भव्य “आक्रोश मोर्चा” आयोजित करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.आंदोलनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित भाजपा नेते यांची राहील, याची शासन व प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन आंदोलनाच्या आयोजकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com