Top Post Ad

RPI महाड चवदार तळे शताब्दी महोत्सव निमित्त आयोजित रिपब्लिकन पक्षाचा समता क्रांती मार्च रद्द

यंदाचे वर्ष हे महाड चवदार तळे सामाजिक क्रांतीचे शताब्दी वर्ष आणि महात्मा ज्योतिबा फुले जयंती ‌द्विशताब्दी वर्ष. या यर्षी भारत देशात सर्वत्र विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. मात्र रिपब्लिकन पक्षाने पक्षाध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेला  राज्यव्यापी समता क्रांती मार्च रद्द केला असल्याची माहिती आज मुंबईत पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी दिली. 


राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे हा समता क्रांती मार्च रद्द करण्यात येत असल्याचे सोनवणे म्हणाले. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर,  काकासाहेब खांबाळकर : एम एस नंदा सुरेश बारशिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यात भीषण दुष्काळ पडलेला आहे. राज्य सरकारने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. शेतकरी शेतमजूर हे मोठ्या संकटात आहेत. राज्य सरकार च्या वतीने लवकर मदत पोहोचविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले लवकरच राज्यात दुष्काळी भागाचा दौरा करणार असून त्यासोबत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जमेल ती मदत दुष्काळग्रस्तांना देण्याचा रिपब्लिकन पक्षाचा प्रयत्न असल्याच  सोनवणे म्हणाले.

रिपब्लिकन पक्षाचा यंदा ३ ऑक्टोबर रोजी ६९ वा वर्धापन दिन आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची स्थापना दिनांक ३ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे करण्यात आली होती. रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आम्ही दरवर्षी साजरा करतो. यंदा दिनांक ३ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत विष्णू दास भावे नाट्यगृहात रिपब्लिकन पक्षाचा ६९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे अशी माहितीही गौतम सोनवणे यांनी यावेळी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com