संतोष पंडित रस्त्यावर जे काही बोलले ते करोडो लोकांनी ऐकले.ते एका महिलेने मोबाईल वर ऐकले.प्रत्यक्ष नाही.तिला वाईट वाटले.चुकीचे वाटले.म्हणून तिने एफ आय आर नोंदवली.रात्री.रात्रीच संतोष पंडित यांना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये टाकले.सकाळी कोर्टात हजर केले.पोलिसांनी कोणता तपास करण्यासाठी पोलिस कस्टडी मागितली?न्यायधिशांनी कोणते कायदे पुस्तक वाचून पोलिस कस्टडी दिली?ते नंतर उघड होणारच.आता पोलिस तत्परतेने आरोपपत्र दाखल करतील.तेंव्हा फिर्यादी ,आरोपी,दोघांचे वकील कोर्टात हजर होतीलच.तेंव्हा आधी फिर्यादीचे कथन ऐकले जाईल.त्यानंतर तिची सर तपासणी,उलट तपासणी होईल.फेर तपासणी सुद्धा होऊ शकते.अर्थात हे काम न्यायाधीश करू शकतात.पण ते आरोपीचे वकील करतात.फिर्यादीला कोठडीत उभे केले जाईल.आरोपीचे वकील प्रश्न करतील.उत्तरे देण्याची तयारी फिर्यादीने करून घ्यावी.या लेखामुळे मदत होईल.
१) संतोष पंडित बोलले तेंव्हा तुम्ही तेथे हजर राहून ऐकले का?
२) संतोष पंडित तुम्हाला उद्देशून किंवा तुमच्या कडे पाहून असे वाक्य बोलले का?
३) संतोष पंडित बोलले तेंव्हा ते कोणाला उद्देशून बोलले?
४) ज्यांना उद्देशून बोलले ते तेथे ऐकायला हजर होते का?
५) ज्यांना उद्देशून बोलले,असा तुमचा आरोप आहे,त्यांचे आणि तुमचे काय संबंध आहेत?
आई, बहिण, पत्नी,मुलगी किंवा मालक नोकर किंवा मुख्त्यार पत्र वगैरे?
६) त्यांना बोलले म्हणून तुम्ही फिर्याद नोंदवा,असे आधिकार पत्र त्यांनी दिले आहे का?
७) ज्यांना उद्देशून संतोष पंडित बोलले ते तेंव्हा आणि आता हयात आहेत का? त्यांना कोर्टात हजर करू शकता का?
८)तर मग त्यांना का वाईट वाटले नाही?त्यांना का राग आला नाही?तुम्हालाच का राग आला?
९)कोणी कोणाला असे अभद्र बोलले किंवा शिवीगाळ केली तर बचाव करणारी तुमची स्वतंत्र संघटना किंवा मोहिम वगैरे आहे का?या आधी तुम्ही याचकारणे किंवा अशा कारणे फिर्याद नोंदवली आहे का?
१०)या आधी कोणी संतोष पंडित सारखे अनेक आमदार खासदार मंत्री बोललेले आहेत.तर मग तुम्ही त्यांच्या विरोधात अशी फिर्याद नोंदवली आहे का?जसे आमदार गायकवाड कोणी संपादक आंबी यांना तर सरळ सरळ फोन वर वन टू वन बोलते आहेत.यापेक्षा भयंकर चुकीचे बोलले आहेत.
११) संतोष पंडित नेमके काय बोलले ते तुम्ही कोर्टात स्पष्ट सांगणार का?
१२)या बोलण्यातून तुम्हाला नेमका कोणता शब्द अभद्र वाटला?किंवा शिवी वाटली?
१३)भोक या शब्दाचा अर्थ म्हणजे योनी असे कुठे शब्दकोशात लिहिले असेल, तुम्ही वाचले असेल ते न्यायाधीश महोदयांना दाखवा.
१४) यापुर्वी तुम्ही भोक शब्द किती वेळा ऐकला आहे?कि आता प्रथमच ऐकला आहे?
१५)भोक नावाचा कोणता अवयव आहे ,असे शरीरशास्रात उल्लेख असेल तर दाखवू शकता का?मराठी,हिंदी, गुजराती किंवा इंग्रजी वगैरे भाषेत तसे लिहीले आहे का?
१६)भोक म्हणजे योनी किंवा तत्सम अवयव गृहीत धरावा कोणत्याही कायद्यात लिहीले आहे का?
१७)भोक म्हणजे योनी असे हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांनी आदेशात लिहिले आहे का?
१८)जर डॉक्टरांनी उपचार करतांना, शस्त्रक्रिया करतांना प्रिस्क्रीशन वर योनी ऐवजी भोक शब्द वापरला तर चालेल का?
१९)मी ज्या शक्यता सांगितल्या त्या व्यतिरिक्त भोक म्हणजे योनी आणि योनी म्हणजे भोक असे तुम्ही कोणतेही संदर्भ ग्रंथ दाखवू शकता.
२०)जर तसे संदर्भ ग्रंथ आढळले नाहीत.तर किमान संतोष पंडित यांना तुम्ही विचारले का,भोक म्हणजे नेमका कोणता अवयव तुम्हाला अभिप्रेत आहे?
२१) भोक म्हणजे योनी असा अर्थ लावणारी तुमची स्वतंत्र डिक्शनरी उपलब्ध आहे का?
२२) तुम्ही शाळा कॉलेज चे शिक्षण घेतले असेल तर , कधीतरी शिक्षकांनी शिकवताना सांगितले का कि,भोक म्हणजे योनी आणि योनी म्हणजे भोक असा अर्थ मला अभिप्रेत आहे.तसा अर्थ तुम्ही सुद्धा लक्षात घ्यावा?
२३) महाराष्ट्राचे चाळीस आमदार गुवाहाटी ला पळून जाऊन कामाख्या देवीच्या योनीत कुंकू भरून पुजा केली.त्यातील उरलेला कुंकू कपाळावर लावला .या बद्दल तुमचे काय म्हणणे आहे?हे भद्र आहे कि अभद्र आहे?
या प्रश्नांची उत्तरे फिर्यादी ला द्यावी लागतील.त्या शिवाय संतोष पंडित यांनी वापरलेला शब्द शिवी आहे,हे सिद्ध होणार नाही.
संतोष पंडित यांचे बोलण्याचे स्थळ, वेळ किंवा कार्य यांचेशी फिर्यादीचा दखलपात्र संबंध असल्याचे सिद्ध होत नाही.
नंतर ,
१) रात्री का फिर्याद नोंदवली?
२)रात्रीच का अटक केली?
३) रात्री ची वेळ फिर्याद साठी आणि अटक साठी ठरवून निश्चित केली होती का?
४) संतोष पंडित यांचे बोलणे आणि अटक करणे या मधील काळात आमदार खासदार मंत्री यापैकी कोणी फिर्यादी आणि संबंधित पोलिस यांचेशी बोलले का?
(याचा सीडीआर काढला जाईल.)
असेही प्रश्न विचारले जातीलच.शिवाय गरज पडली तर ज्या मंत्री ला उद्देशून संतोष पंडित बोलले त्यांना सुद्धा साक्ष देण्यासाठी बोलवले जाईल.जे प्रश्न फिर्यादी ला विचारले जातील तसेच प्रश्न त्या मंत्री ला विचारले जातील.
आरोपीचे वकील हे संबंधित मंत्री ची संपत्ती ची पुर्ण चौकशी करू शकतात.त्यांचे पदसिद्ध कार्य आणि जबाबदारी बाबत उहापोह करू शकतात.त्यात
१ अपहार झाला असेल किंवा अपहार न करता रस्ता कंण्डेम कसा बनला?
२)हा खड्डा किती खोल आणि रूंद होता?तितकाच आकाराचा ढिग मंत्री च्या संपत्ती मधे झाला आहे का?
३) हा खड्डा संतोष पंडित यांना दिसला तर मग संबंधित मंत्री ला दिसला नसेल का?
४)जर मंत्री ला हा खड्डा दिसला नाही आणि कोणी दाखवला तर मंत्री ने काय कारवाई केली?
असे अनेक उप प्रश्न विचारले जातील.फिर्यादी आणि मंत्री ला एसी मधे घाम फुटू शकतो.नख कापायला घेतले आणि आख्खा हातच कापून काढला .असा अनुभव येऊ शकतो.
हा खटला संतोष पंडित यांना दोषमुक्त करण्यासाठी न चालवता संबंधित मंत्री, रस्ता कामात अपहार निश्चित करण्यासाठी चालवला गेला पाहिजे.जर भ्रष्टाचाराच्या तंबूत छेद सापडले आहे तर भ्रष्टाचाराचा तंबू फाडून मोकळा केला पाहिजे.या खटल्याचा निकाल लागेपर्यंत आम्ही भोक ऐवजी छेद या शब्दाचा वापर करीत आहोत.कारण भोक म्हणजे योनी असे कुठे आढळले किंवा सिद्ध झाले तर आम्ही अडचणीत येऊ नये.म्हणून दक्षता घेत आहोत.
आम्ही महाराष्ट्र राज्य भाषा मंडळांना विनंती करतो कि,भोक म्हणजे योनी असा अर्थ होतो किंवा नाही,यांची खात्री करून तसे श्वेत पत्र जाहीर करावे.श्वेत पत्र जाहीर करू शकत नाहीत तोपर्यंत तरी या भोक या शब्दाचा श्र्लेश अर्थ म्हणजे योनी असा कोणीही लावून घेऊ नये.
...शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगांव.
५/९/२०२६
0 टिप्पण्या