Top Post Ad

दीपावलीसाठी महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना ३३ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

  बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दीपावली - २०२६ प्रीत्यर्थ ३३ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक २८ ऑक्टोबर २०२६) केली. महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱयांना दीपावलीचा सण आनंदात साजरा करता यावा, या उद्देशाने नोव्हेंबर महिन्याच्या नियमित वेतनासोबत ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अदा करण्याचे निर्देश महापौर श्रीमती रितू तावडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले.

दीपावली - २०२६ करीता महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतची बैठक आज (दिनांक २८ ऑक्टोबर २०२६) महापौर दालनात झाली. उपमहापौर श्री. संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, सभागृहनेते   गणेश खणकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते  अशरफ आजमी, एआयएमआयएम गटनेते  विजय उबाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते  यशवंत किल्लेदार, समाजवादी पक्षाच्या गटनेत्या श्रीमती अमरीन अब्रहानी, स्थायी समिती अध्यक्ष   प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, सहआयुक्त (वित्त)   देविदास क्षिरसागर, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांच्यासह महानगरपालिका कामगार / कर्मचारी संघटनांच्‍या समन्वय समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महापौर   रितू तावडे म्हणाल्या की, राज्यात यंदा कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने निकषांनुसार राज्यातील ३०० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्यातील या परिस्थितीचा सारासार विचार करून महानगरपालिकेतील गटनेते, पदाधिकारी, महानगरपालिका प्रशासन आणि कामगार-कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने अधिकारी व कर्मचाऱयांना ३३ हजार रुपयांचे दीपावली सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. नियमित वेतनासोबत ३३ हजार रुपयांचे दीपावली सानुग्रह अनुदान एकत्रितपणे अदा करण्यात येणार आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com