Top Post Ad

Congressला संस्कृती व संस्कार शिकवू नये, मोदी-शाहांची भाषा बघा मग बोला: हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाच्या नेत्यांनी आकांडतांडव सुरु केला आहे. भाजपाचे नेते व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेस नेत्यांबद्दल कोणती भाषा वापरतात, याची त्यांना आठवण नसावी. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे चारित्रहनन करण्यात मोदी-शाह पासून गल्लीतील नेतेही मागे नाहीत. दुसऱ्यांचे चारित्रहनन करणाऱ्यांनी काँग्रेसला संस्कृती व संस्कार याबद्दल अक्कल शिकवू नये, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी यांना काँग्रेसची विधवा म्हटले, राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरचे शब्द वापरले. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांना राज्यसभेत शूर्पणखा असे म्हटले. पचास करोड की गर्लफ्रेंड, ममता बॅनर्जी यांच्याबद्दल दीदी ओ दीदी असे अनेक शब्द पंतप्रधान मोदी यांनी वापरले. दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचे भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत चारित्र्यहनन केले. मल्लिकार्जून खरगे यांनी उत्तराखंड मध्ये एक जाहीर सभा घेतल्यानंतर त्या जागेचे कथित शुद्धीकरण करण्यात आले, त्यावेळी भाजपा मुग गिळून गप्प बसली होती. दुसऱ्याची संस्कृती काढण्याआधी स्वतःची संस्कृती पहावी. ज्या पक्षाचा सर्वोच्च नेताच अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा जाहीरपणे वापरतो, महिलांबद्दल अपमानकारक भाषा वापरतो त्यांनी काँग्रेसला शिकवू नये. खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाची इकोसिस्टिम जागी झाली आहे. त्यांचा हा प्रकार म्हणजे आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट, असा आहे.

भारतीय जनता पक्षाचे सरकार मागील १३ वर्षांपासून सत्तेत आहे. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जनतेला सांगण्यासारखे भाजपाकडे काहीही नाही म्हणून ते मुद्दा बनवू पहात आहे. मोदी सरकारच्या मंत्र्यांचे नाव अत्यंत अघोरी व अश्लाघ्य एपस्टिन फाईलमध्ये आलेले आहे, त्यांना तोंड दाखवायला जागा नाही. राहुल गांधी यांनी मोदी-शाह व भाजपाला सळो की पळो करून सोडले आहे. भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून ते कशाचेही भांडवल करू पहात आहे पण जनता सुज्ञ आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com