Top Post Ad

Post महाराष्ट्र टपाल सर्कल मासिक अदालत दिवस

टपाल सेवा ही देशाच्या सामाजिक व आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग असून, समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांच्या जीवनाशी निगडित आहे. टपाल विभाग आपल्या ग्राहकांना, कर्मचाऱ्यांना आणि इतर संबंधित घटकांना कार्यक्षम, विश्वासार्ह व ग्राहकाभिमुख सेवा प्रदान करण्यासाठी तसेच त्यांच्या तक्रारींचे वेळेत निवारण सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे. तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आणि तक्रारींच्या निवारणासाठी सर्वांना सहज उपलब्ध होणारे एक समान व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, टपाल विभागाने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘मासिक अदालती दिवस’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी लागू असलेल्या कार्यक्षेत्रानुसार, सर्कल, रिजनल  आणि डिव्हिजनल स्तरावर स्टाफ अदालत, ग्रामीण डाक सेवक (GDS) अदालत, पेन्शन  अदालत आणि डाक अदालत या चारही अदालती एकाच वेळी आयोजित करण्यात येतील. या उपक्रमाचा उद्देश टपाल सेवा, कर्मचारी, ग्रामीण डाक सेवक (GDS) आणि निवृत्तीवेतनधारक यांच्याशी संबंधित तक्रारींचे प्रभावी व वेळेत निवारण करणे हा आहे.

या अनुषंगाने, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई – 400001 यांच्यामार्फत पहिला मासिक अदालती दिवस शुक्रवार, दिनांक 06.11.2026 रोजी सकाळी 11.45 वाजता, मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ इमारत, दुसरा मजला, जीपीओ संकुल, मुंबई – 400001 येथे आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा या कार्यक्षेत्राचा समावेश असलेल्या महाराष्ट्र सर्कलमधील कर्मचारी विषयक बाबी, ग्रामीण डाक सेवक (GDS), निवृत्तीवेतन विषयक बाबी आणि टपाल सेवा यांच्याशी संबंधित तक्रारी, लागू असलेल्या संबंधित अदालतीमध्ये विचारार्थ घेण्यासाठी, संबंधित गट अधिकाऱ्यांकडे पुरेसा वेळ आधी, दिनांक 04.11.2026 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करता येतील. अर्जामध्ये तक्रारीचा संपूर्ण तपशील, संबंधित पूरक कागदपत्रे तसेच यापूर्वी सदर प्रकरण ज्या कार्यालयाकडे किंवा प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले असेल, त्या कार्यालयाचा किंवा प्राधिकरणाचा तपशील, लागू असल्यास, नमूद करणे आवश्यक आहे.

इच्छुक व्यक्तींनी मासिक अदालती दिवसादरम्यान विचारार्थ घेण्यासाठी आपल्या तक्रारी विहित प्रक्रियेनुसार संबंधित अदालतीचे कामकाज पाहणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर कराव्यात.या उपक्रमामुळे तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होईल. तसेच, नागरिकाभिमुख आणि तत्पर सेवा प्रदान करण्याच्या टपाल विभागाच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा महाराष्ट्र सर्कल, मुंबईचे मुख्य पोस्टमास्टर जनरल यांनी व्यक्त केली आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com