दुपारी अचानक पोलिस पुण्यात राहणाऱ्या 3 मुलींच्या घरी धाड टाकतात, त्यांना पकडून नेतात, त्यांना जातीवाचक शिवीगाळ करतात, लैंगिक छळ करतात, त्यांना कारणाशिवाय
कितीतरी तास डांबून ठेवतात. आणि पुण्याचे पोलिस आयुक्त या पोलिसांविरोधात तक्रार घ्यायलाही तयार होत नाहीत.
सकाळपासून पीडित मुली, त्यांना सहाय्य करणारे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, असे अनेक जण पुणे पोलीस आयुक्तालयाला ठिय्या मांडून बसले आहेत, मात्र पोलिस अजूनही तक्रार लिहून घ्यायला तयार नाहीत. पोलिस जनतेसाठी असतात की आपापले आणि सत्तेत असलेल्यांचे इंटरेस्ट जपण्यासाठी असतात याचं उत्तर बऱ्याचदा आणि आजही मिळालेलं आहे, नाही का श्वेता,
चार दिवसांपासून आणि विशेषतः काल सकाळपासून मी सगळ्या घडामोडी फाँलो करतोय.आम्हालाही रात्रीची झोप लागली नाहीये. रात्री 2:30 ते 3:00 वाजेपर्यंत तुझा एकेक शब्द ऐकून मन सुन्न झालं होतं…मैत्री दिनाच्या दिवशी, मैत्रिणीसाठी तू दाखवलेली जिद्द आणि धैर्य बघून डोळ्यात पाणी आलं.तु दिवसभर नव्हे, तर दिवसरात्र न थकता लढत होतीस. हे आम्ही कधीच विसरणार नाही.
सकाळपासून एसपी ऑफिससमोर दिवसभर बसणं,
आणि रात्री एसपीसमोर मैत्रिणीसोबतचा प्रसंग सांगताना अक्षरश: रडायला येणं. पण त्यातही तुझा आवाज खंबीर होता, लढवय्या होता. तुझ्या शब्दांत न्यायासाठीचा आक्रोश होता. हा लढा लढण्यासाठी बळ देणारा ठरेलं.
जेव्हा पोलीसांसमोर ते पण एसपी पुणे यांच्या समोर त्यांच्याचं आँफीसमध्ये त्यांचा बिनकामी कागद फाडलास तेव्हा अंगात एक असामान्य ऊर्जा भरली. अभिमान वाटला, की ही लढाई कुणाच्याही दबावाला झुकणारी नाही. आणि या लढाईची सुरवात करणारी मैत्रीण आमच्या पिंपळगाव हरेश्वर पंचक्रोशीची आहे याचा अजुन जास्त अभिमान वाटला.
श्वेता, ही केवळ तुझ्या मैत्रिणीसाठीची लढाई नव्हती…
तू लढलीस प्रत्येक मुलीसाठी...
जिला कधी ना कधी, कुणीतरी "तू गप्प राहा" असं म्हणालं असणारं.
पोलिसांनीच जेव्हा अन्याय केला, तेव्हा लढणं सोपं नव्हतं. सोप नसणार आहे.
महाराष्ट्रात अशा कितीतरी केसेस दाबल्या गेल्या. हे प्रकरण सुद्धा असचं दाबल गेलं असतं.
जर तू आवाज उठवला नसता…!
पण तू बोललीस.
फेसबुकवरून सांगितलं.
लोक जोडले गेले, जमायला लागले. कार्यकर्ते आले, संघटना उभ्या राहिल्या, मोठमोठे नेते आले. आंदोलनाचा आवाज वाढला…
पण पोलीस यंत्रणा मात्र ढिम्म राहिली…
शेवटी पुढे काय होईल ते होईलं पण तू जे केलंस, ते इतिहासात कोरलं गेलंय.
ही ताकद कधीच कमी होऊ देऊ नकोस. तुझ्यामुळे अनेक मुलींना आज हिंमत मिळाली असणार...
श्वेता आणि तिच्या सर्व सहकारी मैत्रीणीला सलाम...
तुमचं साहस लाखोंना प्रेरणा देतंय...
तुमच्या पाठीशी एकजूटीनं उभं राहणं हे आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे....
आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
फक्त लढ म्हणा..
Sanjeev Chandorkar
--------------------------------------------------
कोथरूड प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात; सात गंभीर प्रश्न अनुत्तरित पण असे का?
पुणे कोथरूड पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. तीन युवतींना जातीवाचक शिवीगाळ झाल्याचा आरोप असताना आणि यासंदर्भात जनतेत प्रचंड संताप असताना देखील पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदवलेला नाही. या प्रकरणात पोलिसांच्या निष्क्रियतेवर, कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या पाठीमागील राजकीय दबावावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
हा प्रकार केवळ एका गुन्ह्याचा प्रश्न नाही, तर पोलिस प्रशासनावर जनतेचा विश्वास डळमळीत करणारा मुद्दा ठरत आहे. या प्रकरणात पुढील सात प्रश्न विशेष महत्त्वाचे असून, त्यांची स्पष्ट, पारदर्शक आणि अधिकृत उत्तरं देणं गरजेचं आहे.१. एवढा प्रचंड रोष असतानाही एफआयआर का नोंदवला नाही?
युवतींनी स्पष्टपणे जातीवाचक अपमान झाल्याचा आरोप केला असूनही, कोथरूड पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ का केली? पोलिसांवर कोणाचा राजकीय किंवा प्रशासकीय दबाव होता का?
२. छत्रपती संभाजीनगर येथील पीडित युवती कोण आहे?
ती युवती कोणत्या पार्श्वभूमीतून येते? तिची भूमिका काय होती? तिच्यावर नेमका काय आरोप आहे, आणि हा संपूर्ण प्रकार नेमका कसा घडला?
३. या प्रकरणाशी संबंधित माजी पोलीस अधिकारी कोण आहेत?
या प्रकरणात एका माजी पोलीस अधिकाऱ्याचं नाव पुढे येतंय. त्या अधिकाऱ्याने आपल्या ओळखीच्या जोरावर पोलिसांवर दबाव आणला का? आणि या दबावासाठी कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याने पोलिसांना थेट फोन केला?
४. कायदेशीर परवानगी घेतली होती का?
ही चौकशी पुण्याच्या कोथरूड परिसरात पार पडत असताना, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कोथरूड पोलिसांकडून कायदेशीर पत्रव्यवहार केला होता का? स्थानिक पोलिसांची अधिकृत संमती घेतली होती का?
५. एका युवतीला कामाच्या ठिकाणावरून नेलं; सर्च वॉरंट होतं का?
या प्रकरणातील एका युवतीला तिच्या कामाच्या ठिकाणावरून थेट पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. पोलिसांकडे त्यासाठी वैध सर्च वॉरंट होतं का? की हे सगळं नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलं?
६. चौकशी दरम्यान पोलीस नसलेल्या व्यक्ती युवतींच्या घरी का गेल्या?
या चौकशी दरम्यान महिला पोलिसांसोबत काही माजी पोलीस अधिकारी आणि पोलिस दलात कार्यरत नसलेल्या व्यक्तीही युवतींच्या कोथरूड येथील घरी गेल्या. त्या कोण होत्या? त्यांचा पोलीस दलाशी, किंवा कोणत्यातरी राजकीय नेत्याशी, शासकीय अधिकाऱ्यांशी संबंध आहेत का?
७. युवतींना जीवे मारण्याच्या धमक्या का आणि कुणाकडून?
या प्रकरणात संबंधित युवतींना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचं समोर आलं आहे. या धमक्या कुणी दिल्या? त्या कोणाच्या सांगण्यावरून दिल्या? आणि पोलीस याबाबत काय कारवाई करत आहेत?
#राजकीय, प्रशासकीय दबाव स्पष्टपणे दिसतोय!
या संपूर्ण प्रकरणात कोथरूड पोलीस प्रशासनाने दाखवलेली निष्क्रियता, एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ, सर्च वॉरंटशिवाय युवतींना नेणं, आणि पोलीस नसलेल्या व्यक्तींना चौकशीसाठी घेऊन जाणं – या सगळ्यांमुळे पोलीस यंत्रणेविषयी जनतेमध्ये प्रचंड अविश्वास निर्माण झाला आहे. हा केवळ एक अपवाद नाही, तर पोलिसांच्या राजकीय दडपणाखालील कामकाजाचा प्रत्यक्ष पुरावा आहे.
हा मुद्दा आता केवळ स्थानिक गुन्ह्याचा राहिलेला नाही, तर एक सामाजिक आणि प्रशासकीय प्रश्न झाला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने पारदर्शकपणे या सात प्रश्नांची उत्तरं देणं आवश्यक आहे. अन्यथा, पोलीस दलावरील विश्वासाचे धागे पूर्णपणे तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
– रिपोर्ट: We Marathi News
संपर्क: wemarathi.official@gmail.com
0 टिप्पण्या