Top Post Ad

भांडुप मधली ४ एकर जमीन, केवळ ८९ लाखात

 गडकरींच्या मागे उभा असलेला माणूस नीट पहा. हा माणूस म्हणजे अतुल शिरोडकर, हा गडकरींचा व्यवसिक मित्र. सगळेच्या सगळे कायदे धाब्यावर बसवून, ACS वळसा नायर व ACS असीम गुप्ता ह्यांना गडकरींनी थेट फोन करून, मित्राला ४ एकर भांडुप मधली जमीन, केवळ ८९ लाखात मिळवून दिली. ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना आहे की आपण जे करतोय ते चुकीचे आहे, पण त्यांच्यात हिंमत नाही कायद्याने काम करायची. ८९ लाखात भांडुप मधे आता 2BHK चे घर पण येत नाही. पण गडकरींच्या मित्राला १००० कोटीचा प्रोजेक्ट मिळाला.

आता SRA हा आता फक्त राजकारण्यांचा अड्डा कसा झाला आहे ते ऐका. साईनगर भांडुप ही ६६० घरांची वस्ती. अतिशय स्वच्छ चाळी. १९९१-९२ मधे ह्या २०० ते २५० फुटाची घरं एका जमीन मालकाने बांधली आणि, घर व त्या खालची जमीन ही ६६० कुटुंबांना विकली. तुम्ही सोसाइटी झाली की मी conveyance करेन असे मालकाने सांगितले. सुखाने ही माणसे राहत होती. २००७ मधे ह्याच मालकाने हीच जमीन अतुल शिरोडकर या इसमाला २ कोटी रुपयाला विकली. २ कोटी पैकी फक्त ८९ लाख त्या शिरोडकरने दिले. पण पैसे मिळतीलच असे समजून त्या मालकाने conveyance शिरोडकरच्या नावाने केले. २००९ मधे ह्या लोकांना कळले तेव्हा त्यांनी कोर्टात धाव घेतली. पण गडकरी ह्या शिरोडकर चे मित्र, त्यात आमदार सुनील राऊत मित्र मग काय विचारा.
सर्व्हे ला ६६० पैकी ३०० घरं बंद दाखवली, खोटी consent दाखवली, खोटे कागदपत्र केले. Annexure I, Annexure II आणि Annexure III, तिन्ही बनावट. ना plan धड ना शिरोडकरांची आर्थिक स्थिती धड. सुनावणी घेणारे AGRC खरतर ५ लोकांचे असते. न्याय व्हावा म्हणून. आमच्या केस मधे ५ पैकी ३ जण नव्हते, असीम गुप्तांनी आमच्या विरोधात निर्णय दिला, पण अश्विनी जोशी ह्यांनी डिस्सेंट ऑर्डर दिली. पण तरीही ४ जणांचा निर्णय एकतर्फी आहे असे खोटे दाखवून, ३३/३८ ची नोटिस काढली
मी ह्यात कधी आले ……
एप्रिल २०२४ पासून मी ह्या लढ्याला सुरुवात केली. ह्यांना न्याय मिळावा म्हणून, माझा स्वाभिमान बाजूला ठेऊन, ह्याच वर्षी एप्रिलमध्ये, मी दिल्ली ला जाऊन गडकरींचे भेट घेतली , तेव्हा योगायोगाने संजय दिना पाटील पण भेटले. ते देखील माझ्या बरोबर आले. पण काहीही झालं नाही. मुंबईत मी सुनील राऊतांशी दोनदा बोलले, संजय राऊतांची सामन्याच्या ऑफिस मधे जाऊन भेट घेतली. सगळ्यांकडे न्यायाची भीक मागितली. पण काही झाले नाही. १०० वेळा फडणवीसांना विनंती केली… एकनाथ शिंदेंना भेटेल. तेही वळसा नायर ह्यांच्याशी बोलले. आशिष शेलार ह्यांना भेटलो. त्यांनी असीम गुप्ता यांना फोन केला.
AGRC मधे स्वतः appear होऊन, जीव तोडून लढले. पण….. ११ सप्टेंबर ला गडकरी जिंकले, सगळे राजकारणी जिंकले आणि सामान्य माणूस हरला. ही माणसे अतिक्रमण करून घुसखोरी करणारी नव्हती, ही घरं त्यांची स्वतःची होती. त्यांनी SRA च्या कडीपेट्यांच्या घरात का रहावं? आता ३ ऑक्टोबर ला ह्याच्या घराचे फोर्स्फुल demolition केले जाणार आहे. आम्ही आज न्यायासाठी हाई कोर्टात पेटिशन दाखल केले आहे. आता कोर्ट न्याय करेल नाहीतर परमेश्वर न्याय करेल. ह्यांच्या कर्मांची फळं ह्यांना ह्याच जन्मी भोगावी लागतील.
अंजली दमानिया

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com