Top Post Ad

केंद्र, राज्य शासनाच्या आरोग्य योजनांच्या माध्यमातून नि:शुल्क वैद्यकीय सेवा मिळणार

इंटिग्रेटेड पेशंट्स हेल्थकेअर स्किम असिस्टन्स प्रणाली (IPHSA) च्या माध्यमातून महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये येणाऱया रूग्णांना मिळणार निःशुल्क सेवा

मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख तसेच उपनगरीय रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अखत्यारितील रुग्णालये व दवाखाने यांच्या माध्यमातून विविध वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतात. सद्यस्थितीत प्रामुख्याने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (ABPMJAY) आणि महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना (MJPJY) या योजनांचा फायदा महानगरपालिकेच्या रुग्णालयात देण्यात येतो. या सेवांसोबतच विविध आजारांशी संबंधित उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या शस्त्रक्रिया तसेच उपचारांसाठी केंद्र तसेच राज्य सरकारच्या आरोग्य योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक रूग्णांना वैद्यकीय सेवा नि:शुल्क (Cashless) पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा मानस आहे.  इंटिग्रेटेड पेशंट्स हेल्थकेअर स्किम असिस्टन्स प्रणाली (IPHSA) च्या माध्यमातून महानगरपालिकेच्या रूग्णालयामध्ये येणाऱ्या रूग्णांना निःशुल्क सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रणालीशी संबंधित निविदा प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे.     

केंद्र शासनाच्या, आयुषमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (ABPMJAY) राष्ट्रीय आरोग्य निधी (RAN), हेल्थ मिनिस्टर डिस्क्रिनिशरी ग्रॅंट (HMDG), कामगार कर्मचारी विमा योजना (ESIC),  तसेच राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना (MJPJY) अशा प्रकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. त्यासाठी IPHSA या प्रणालीच्या माध्यमातून रूग्णालय प्रशासनाला आणि रूग्णांमध्ये मदत आणि समन्वयाचे काम करण्यात येईल. तसेच अधिकाधिक रूग्णांना निःशुल्क पद्धतीने आरोग्य उपचार होतील, रूग्णांचा आरोग्य सेवेसाठी होणारा स्वखर्च (Out Of Pocket expenditure) कमी करणे हेदेखील प्रणाली वापराचे उद्दिष्ट आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही MJPJY या योजनेअंतर्गत आरोग्य सेवेशी संबंधित उपचार खर्चाची कमाल मर्यादा वाढवण्याची आणि अतिरिक्त आरोग्य सेवा पॅकेजेसचा अंतर्भाव करण्याची घोषणा केली आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयातही IPHSA  प्रणालीच्या माध्यमातून देण्यात येणारी सेवा राज्य सरकारच्या धोरणाशी सुसंगत असल्यामुळे रूग्णांना भविष्यात याचा फायदा होईल. या प्रणालीमुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रूग्णालयांचे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सर्व आरोग्य योजना प्रभावीपणे राबविणे शक्य होईल. तसेच याद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील उपलब्ध होईल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com