Top Post Ad

महाराष्ट्राला यामुळे 'उडता महाराष्ट्र' का म्हणू नये

 मुंबई पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील शेडवर छापा टाकत सुमारे 15 कोटीचे ड्रग्ज जप्त केले. या कारवाईत तेथील तीन कामगारांना  अटक करण्यात आली. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणातील आरोपींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या नावावर असणाऱ्या हॉटेल तेज यश मधून जेवण जात असल्याचा आरोप केला आहे. 

 सावरी ड्रग्ज प्रकरणाची सुरुवात मुंबईतील मुलुंड येथील विजयनगरच्या गणेश कृपा बिल्डिंगच्या समोरील फूटपाथवरुन झाल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांना 8 डिसेंबरला मुलुंडमधील विजय नगरमधील गणेश कृपा बिल्डिंगच्याच्या समोरील फूटपाथवर दोन इसम संशयास्पदरित्या वावरताना आढळले . पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांची नावं सलीम अब्दुल हमीद शेख  वय  32 आणि रईस शेख वय 37 असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यापैकी सलीम शेखकडे एक नायलॉनची पिशवी होती . त्या पिशवीत एक लिफाफा होता आणि लिफाफ्यात नोटबुक होती . त्या नोटबुकमध्ये आतील पानावर एक प्लॅस्टिकची पिशवी चिकटवण्यात आली होती . ती पिशवी उघडली असता त्यामध्ये 10 ग्रॅम मेफेड्रोन आढळून आलं . त्याचबरोबर त्याच्या पँटच्या उजव्या खिशात सापडलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत 64 ग्रॅम मेफेड्रोन सापडले . तर रईस शेखच्या पँटच्या उजव्या खिशात 62 ग्रॅम मेफेड्रोन सापडले.  मुंबई पोलिसांनी त्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी ते मेफेड्रोन पुण्यातील विशाल मोरेंकडून आणल्याचं सांगितलं. मुंबई पोलिसांनी विशाल मोरेला पकडण्यासाठी सापळा लावला. त्याला मेफेड्रोन खरेदी करायचे आहे असं सांगून 13 डिसेंबरला पुणे मुंबई हायवेला बोलावले आणि मेफेड्रोनसह अटक केली. विशाल मोरेने ते मेफेड्रोन सातारा जिल्ह्यातील सावरी गावात तयार होत असल्याचे सांगितले. 

मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापा टाकला असता गुरांच्या गोठयासाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये मेफेड्रोन तयार करण्यात येत असल्याचं आढळून आलं . पोलिसांनी तिथून अब्बास सय्यद उर्फ सद्दाम, वय 29  , राजिकूल रेहमान, वय 30 आणि हाबिजुल इस्लाम, वय 25 यांना अटक केली .    सावरी गावातील ज्या शेडवर धाड टाकून तिघांना अटक करण्यात आली त्या तीन कामगारांना ओंकार डिगे नावाचा स्थानिक युवक जेवण आणून देत होता . ते जेवण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे  भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या तेज यश या रिसॉर्टमधून दिले जात होते असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. मुंबई पोलिसांनी ज्याच्या सांगण्यावरून सावरी गावात धाड टाकली तो विशाल मोरे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पुणे विद्यार्थी आघाडीचा शहरप्रमुख आहे. 3 डिसेंबरलाच त्याची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

सातारा जिल्ह्यात ड्रग्ज तयार केले जात असल्याची बाब समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. सावरी हे गाव जावळी तालुक्यातील निसर्गरम्य बामणोली परिसरात आहे. पोलिसांनी कारवाई केलेली जागा उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाची आहे का? . शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत. महाराष्ट्राला यामुळे 'उडता महाराष्ट्र' का म्हणू नये. साताऱ्यातील कारखान्याचे मुंबई-पश्चिम बंगाल कनेक्शन हे सरकारमधील घटकांच्या पिल्लावळीपर्यंत आहे, हे सत्य आहे का? एक विशिष्ट पक्षाचे साताऱ्यावर वर्चस्व आहे, म्हणून या कारखान्याला अभय होते का? मुंबईतील पोलीस साताऱ्यात येऊन कारवाई करतात. सातारा पोलीस याबाबत गप्प कसे होते? म्हशीच्या गोठ्यात ड्रग्ज तयार करण्याची ही प्रक्रिया कधीपासून सुरू होती? याची उत्तरे फडणवीस यांनी जनतेला द्यावीत, अशी मागणी अँबादास दानवेंनी केली आहे.

साताऱ्यातील कारवाईनंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. जावळी तालुक्यातील सावरी गावात नक्की काय सुरू आहे? ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे की नातेवाईकांची? तिथे ड्रग्जची फॅक्टरी सुरु आहे का? बोगस नोटांचा कारखाना? जादूटोणा सुरु आहे की, आणखी काही अवैध धंदे? मुंबई क्राइम ब्रँच आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे का पोहोचले आहेत? सरकार काय झाकण्याचा प्रयत्न करत आहे? मुंबई क्राइम ब्रँचला इथे नेमके कोणते घबाड सापडले आहे? इथे नेमकं काय सुरु आहे? सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तिथे तातडीने का दाखल झालेत? पोलिसांनी कोणाला अटक केली? हे आरोपी, सावरी गावातील तेजस लॉज आणि ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांचा काय संबंध? या सर्व प्रश्नांवर गृह मंत्रालयानं स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्स पोस्टाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com