Top Post Ad

TSSIA चा सुवर्ण महोत्सव दिमाखात.... ‘व्हिजन 2030’ आराखड्याचे प्रकाशन

ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (TSSIA) ने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त MSME क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी, शाश्वत विकासासाठी आणि बाजारपेठ विस्तारासाठी महत्त्वाकांक्षी ‘व्हिजन 2030’ आराखडा जाहीर केला. शनिवारी पार पडलेल्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात वार्षिक अंकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. या प्रसंगी TSSIA व चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स (COSIA) चे अध्यक्ष, संदीप परीख यांनी दोन्ही संस्थांच्या परस्परपूरक भूमिकांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, ‘व्हिजन 2030’ अंतर्गत TSSIA पुढील दशकात आपल्या सदस्यांसाठी डिजिटल परिवर्तन, शाश्वतता, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास यांवर विशेष भर देणार आहे. तांत्रिक महाविद्यालयांच्या सहकार्याने कौशल्य विकास कार्यक्रम अधिक सक्षम करणे, तसेच उद्योग व शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य वाढवून नाविन्यतेला चालना देणे हे या आराखड्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात संस्थेच्या सदस्य असलेल्या चार लघु उद्योजकांना त्यांच्या व्यवसायातील उल्लेखनीय कामगिरी, उद्योग विकास व रोजगार निर्मितीबाबत “Pride of TSSIA” या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार विजेते:
1. व्हिजन विद्युत प्रायव्हेट लिमिटेड – ट्रान्सफॉर्मर उत्पादन
2. क्युबीडी रिसर्च अँड डेव्हलोपमेंट लॅब प्रायव्हेट लिमिटेड – फार्मा अॅनालिटिकल लॅबोरेटरी
3. पीसीआय एनलिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड – लॅब्ससाठी आवश्यक उपकरणे
4. मथुरे मेटल्स वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड – ब्रेझिंग व फ्लक्सेस उत्पादक

या पुरस्कारांद्वारे MSME क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उत्पादन, संशोधन, गुणवत्ता आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्याचा TSSIA चा उद्देश अधोरेखित करण्यात आला. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्षपद संस्थेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुजाता सोपारकर यांनी भूषविले. सांस्कृतिक व ज्ञानवर्धक कार्यक्रम तसेच  फॅमिली बिझनेसमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे या उद्देशाने  संदेश मेस्त्री यांचा टॉक शो तसेच पुर्णिमा टोपरानी यांचा स्टँड-अप कॉमेडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष आशिष सिरसाट यांनी केली. संस्थेच्या आजवरच्या कार्याचा सविस्तर आढावा संस्थेचे मानद महासचिव भावेश मारू यांनी उपस्थितांसमोर मांडला. 

या सोहळ्यास उद्योग विभागाच्या सह संचालिका विजू सिरसाट, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे, MSME फॅसिलिटेशन सेंटरच्या सदस्य सचिव सीमा पवार, महावितरणचे मुख्य अभियंता संजय पाटील, MIDC चे विभागीय व्यवस्थापक सुदेश जाधव, विशेष नियोजन अधिकारी चंद्रशेखर तारे, कर्मचारी भविष्य निर्वाह आयुक्त घनश्याम मीना व मिलिंद देऊरकर, Rijhwani Associates च्या संगीता रिझवाणी, State Bank of India उप महाव्यवस्थापक  सुरजित त्रिपाठी, TJSB चे उपाध्यक्ष वैभव सिंघवी, तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत भारतीय रबर संशोधन संस्थेचे संचालक डॉ. राजकुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सदस्य  रोहित मिल्स व अंजुम काझी यांनी उत्तमरित्या केले. तसेच संस्थेचे समिती सदस्य  निखिल सुळे यांनी  आभार प्रदर्शन केले. या भव्य सोहळ्यास चारशेहून अधिक उद्योजक व विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com