Top Post Ad

मेल व एक्सप्रेस गाड्याऐवजी मुंबईमध्ये लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी

मुंबईमध्ये मेल व एक्सप्रेस गाड्या वाढवण्याऐवजी लोकल गाड्यांची संख्या वाढवावी. मुंबई CSMT व चर्चगेट (मुंबई सेंट्रल) येथून सुटणाऱ्या मेल व एक्सप्रेस गाड्या ठाणे, कल्याण, पनवेल, बोरिवली, वाशी येथून चालवाव्यात. मुंबई लोकलच्या वेळेत मेल-एक्सप्रेस वाढवण्याचा निर्णय निषेधार्ह, नवीन गाड्या CSMT/चर्चगेटऐवजी कल्याण व पनवेल येथून चालवण्याची ठोस मागणी मुंबई रेल प्रवासी संघाच्या वतीने रेल्वे बोर्ड व मध्य रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. 
 मध्य रेल्वेच्या 20 जानेवारी 2026 रोजीच्या (PR No. 2026/01/20) प्रसिद्धीपत्रकाचा मुंबई रेल प्रवासी संघ, मुंबईकर प्रवाशांच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला.  ज्यामध्ये CSMT येथून नवीन लांब पल्ल्याच्या विशेष मेल व एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई रेल प्रवासी संघाने यापूर्वीच CSMT व चर्चगेट येथून लांब पल्ल्याच्या गाड्या LTT, ठाणे, कल्याण, पनवेल, वसई, बोरिवली, वाशी येथे स्थलांतरित करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र, त्याच वेळी CSMT वर पुन्हा नवीन मेल-एक्सप्रेस गाड्या वाढवणे हे पूर्णपणे विसंगत, धोकादायक आणि मुंबई लोकल प्रवाशांच्या जीवावर बेतणारे आहे.

मध्य रेल्वेने खालील विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे:
CSMT–कोल्हापूर–CSMT विशेष (01039/01040)
LTT–नांदेड–LTT विशेष (01041/01042)
पनवेल–अमरावती–पनवेल अनारक्षित विशेष (01415/01416)
यापैकी CSMT–कोल्हापूर विशेष गाड्या थेट CSMT वरून चालवणे अत्यंत चुकीचे आहे.
या गाड्या CSMT ऐवजी कल्याण किंवा पनवेल येथून चालवणे पूर्णपणे शक्य व आवश्यक आहे.

लोकल गाड्यांचा प्रचंड उशीर, त्यामुळे वाढणारी बेकाबू गर्दी, ट्रॅकची अनुपलब्धता या सर्व बाबी लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्या लोकल ट्रॅकवरून चालवल्यामुळे मुंबई लोकलच्या अपघातांत वाढ होत आहे.  Tracks 1 ते 4 : लोकल ट्रेनसाठी, Tracks 5 व 6 : मेल/एक्सप्रेससाठी असे असतानाही, रात्री अपरात्री ५-६ ट्रॅक रिकामे असतानाही ३-४ ट्रॅकवरून एक्सप्रेस चालवल्या जातात, यामुळे ट्रॅक मेंटेनन्स होत नाही. सकाळी लोकल गाड्या खोळंबतात, प्रवाशांचे मृत्यू होतात.  हे वास्तव स्वीकारणे गरजेचे असून त्यावर ठोस उपाययोजना करण्यापेक्षा रेल्वे प्रशासन जाणिवपूर्वक याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप प्रवाशी संघाने केला आहे. आज CSMT / चर्चगेट परिसरात राहणारा मध्यम व उच्च मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाला आहे, कारण: घरांचे दर 1.5 ते 2 कोटींपेक्षा अधिक स्वतःची वाहने (Cars) उपलब्ध,  खरे लांब पल्ल्याचे रेल्वे प्रवासी आज ठाणे, कल्याण, पनवेल, वाशी, वसई परिसरात राहतात. म्हणूनच सर्व मेल-एक्सप्रेस गाड्या CSMT व चर्चगेट येथे आणणे अन्यायकारक व धोकादायक असल्याचे प्रवाशी संघाचे म्हणणे आहे. 

1. मुंबईमध्ये मेल-एक्सप्रेस गाड्या वाढवण्याऐवजी लोकल गाड्यांच्या फेऱ्या तात्काळ वाढवाव्यात
2. CSMT व चर्चगेट येथून कोणत्याही नवीन मेल-एक्सप्रेस गाड्या सुरू करू नयेत
3. CSMT–कोल्हापूर विशेष गाड्या तात्काळ कल्याण किंवा पनवेल येथून चालवाव्यात
4. Tracks 1 ते 4 कायमस्वरूपी फक्त लोकल ट्रेनसाठी राखीव ठेवावेत
5. गरज असल्यास दक्षिण भारताकडे जाणाऱ्या काही मेल-एक्सप्रेस रद्द/कमी करून त्या क्षमतेत मुंबई लोकल वाढवाव्यात
6. किती नवीन लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत, याची स्पष्ट व लेखी माहिती सार्वजनिक करावी
जर हा निर्णय महाराष्ट्राबाहेरील खासदारांच्या दबावाखाली परत घेतला गेला, तर मुंबई लोकल पुन्हा कोलमडेल, गर्दी वाढेल, मुंबईकरांचे मृत्यू वाढतील. ही बाब राजकीय नसून मुंबईकरांच्या जीवन-मरणाची आहे.   मुंबई लोकल, मुंबईची लाईफलाईन आहे. तिच्याशी कोणतीही तडजोड करू नका असे आवाहन  मुंबई रेल प्रवासी संघाने मुंबई रेल प्रवासी संघ रेल्वे बोर्ड, मध्य रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधी व सर्व नागरिकांना केले आहे. . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com