मुंबई महानगर पालिकेच्या तिकिट वाटपात घराणेशाही होत असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांना तिकीट नाकारण्यात येत आहे. असाच प्रकार मुंबईतील वर्सोवा येथे झाला. याबाबत येथील कोळी बांधवांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. स्थानिक भूमिकन्या माजी नगरसेविका छाया चंद्रकांत भानजी यांना मुंबई महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता वार्ड क्र.59 येथून उमेदवारी नाकारून अन्य बाहेरच्या व्यक्तीस दिल्याने स्थानिक कोळी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. मला भाजपाने उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. मात्र तो नाकारून अन्य बाहेरच्या व्यक्तीस उमेदवारी दिली. हा माझा आणि माझ्या समाजाचा विश्वासघात असल्याचा आरोप छाया भानजी यांनी केला. तसेच भाजपामध्ये सुरू असलेल्या घराणेशाहीबाबतही त्यांनी निषेध व्यक्त केला.
मी आमच्या मुंबईतील कोळी समाजाची प्रतिनिधी असून मला तिकीट नाकारणे म्हणजेच सर्व कोळी समाजाला नाकारणे होय. आम्ही आमच्या कोळीवाड्याचा विकास, कोळी वाड्याचे सीमांकन करणे, मासेमारी उध्वस्त होऊ नये म्हणून पर्षीयन बोटीना विरोध करणे, झोपडपट्टी म्हणून कोळीवाडयाचा विकास नकोय तर सीमांकन करून आमच्या कोळीवाडयाचा विकास व्हायला हवाय. कोळीवाड़ा, कोळी समाजाची मासे मार्केट आणि कोळी भगिनी त्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत. त्यांना न्याय मिळविणे करीता आम्ही निवडणुक लढवीत होतो मात्र आम्हाला तिकीट मिळाले नसल्याने आम्ही प्रचंड नाराज आहोत.
0 टिप्पण्या