Top Post Ad

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक नविन टॅक्सी अॅप

राज्यात बेकायदेशीररित्या चालवण्यात येणाऱ्या टॅक्सी आणि बाईकच्या विरोधात तसेच अँप आधारित काम कंपन्यांनी लागू केलेल्या मनमानी भाड्याच्या विरोधात शनिवारपासून ओला, उबेर मालकांनी संप पुराकला आहे. या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल झाले.   अशाप्रकारे संप करून नागरिकांना वेठीस धरणार असला तर योग्य ती कारवाई करावी लागेल, शासनाकडून काय मदत हवी आहे, नेमक्या तुमच्या अपेक्षा काय आहेत हे स्पष्टपणे सांगावे. राज्य शासन त्याचा विचार करेल, असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला आहे. सरनाईक म्हणाले, आम्ही ओला, उबेर मालकांच्या संपर्कात आहोत. मात्र अशा प्रकारे संपाचे हत्यार उपसून नागरिकांचे हाल करणे योग्य नाही. सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक हे फिरायला किंवा कामानिमित्त बाहेर पडत असतात, अशा संपामुळे नागरिकांचे हाल होत आहे. त्यांची शासनाकडून काय अपेक्षा आहे ती त्यांनी सांगावी, आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, मात्र जर नागरिकांना अशाप्रकारे वेठीस धरणार असाल तर मात्र कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

शहरात असो वा शहराबाहेर प्रवास करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक ओला किंवा उबर या अॅपचा वापर करत असतात. मात्र अनेकदा काही समस्यांमुळे नागरिकांना ही सेवा त्रासदायक ठरत आहेत. या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक नव टॅक्सी अॅप सुरु होणार आहे. सहकारी तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या भारत टॅक्सीच्या उद्घाटनानंतर अॅप आधारित कॅब सेवांच्या क्षेत्रात मोठी हालचाल सुरू झाली आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीला आव्हान देणारे आणखी एक शासकीय अॅप लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. छावा राइड या नावाने ही नवी अॅप आधारित कॅब सेवा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने आणि एसटी महामंडळामार्फत छावा राइड अॅप सुरु करण्यात येणार आहे. या उपक्रमातून एसटी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी टॅक्सी सेवा देण्याचा सरकारचा मानस आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com