Top Post Ad

अशा त्यागी समर्पित नेतृत्वाला समाजाने पाठिंबा जाहीर केला पाहिजे.

गेल्या 195 दिवसांपासून पालिच्या अस्तित्वासाठी संवर्धनासाठी भंन्ते विमान्सा हे संघर्ष करत आहेत. तो संघर्ष आता पराकोटीच्या अवस्थेला पोहचलेला आहे... एका सर्व साधारण मागण्यांनसाठी आपलं संपूर्ण करियर पणाला लावून स्वतःला उध्वस्त करून घेणं हा सामाजिक उत्तरदायीत्वाने झपाटलेलाच अवलिया करु शकतो...आज जिकडे तिकडे स्वार्थाने बरबटलेली माणसं पाहतो स्वतःला सिध्द करण्यासाठी स्वतःचा लिलाव करणारी माणसं पाहतो... समाजाची दलाली करता करता गडगंज संपत्ती कमावलेली माणसं पाहतो.एखादा मोठा कार्यक्रम दाखवून समाजाचा लाखो करोडो रुपयांनवर डल्ला मारलेली माणसं पाहतो.भिक्खु पाहतो.तेव्हा या सर्व स्वार्थी लबाड दलालांन पेक्षा वेगळे

भंन्ते विमान्सा यांच्या मध्ये मला खरा बुध्दपुत्र दिसतो... हे मला एक आंदोलक म्हणून प्रकर्षाने जाणवते...
भन्ते विमान्सा व्यतिरिक्त कुठल्याही भिक्खुने वर्तमान काळात धम्माच्या अस्तित्वासाठी सामाजिक प्रश्नासाठी शैक्षणिक प्रश्नांसाठी अशा पध्दतीने जिवन मरणाचा संघर्ष करणारा भिक्खु मी पाहिलेला नाही.किंबहुना भिक्खु वेशात मठाधिपती आणि RSS च्या कार्याला पाठिंबा देणारी भिक्खु मंडळी आम्ही पाहतोय... काही भिक्खु मंडळी राजकीय वरदहस्ता शिवाय कुठल्याच सामाजिक आंदोलनात सहभागी होत नाहीत. अस असताना आपलं स्व:ताच करियर पणाला लावून केवळ धम्मभाषेच अस्तित्व आणि गोर गरीब आदिवासी शेत मजुरांच्या पोरांना विद्यापीठात हॉस्टेल मिळावं म्हणून आपला जीव धोक्यात घालणारे भंन्ते विमान्सा आमच्यासाठी आणि एकंदरीत मानवतेसाठी पुजनीयचं आहेत...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील भिक्खू जो केवळ आध्यात्मिक नाही तर तो सामाजिक असला पाहिजे, असं मत जे बाबासाहेबांनी व्यक्त केलं होतं त्या मताला भंन्ते विमान्सा हे पुरेपूर उतरले आहेत... आम्ही केवळ त्यांची बाजू घेत नाही किंवा त्यांची व्यक्ती पूजा ही करत नाही. गेल्या सहा महिन्या पासून भंन्ते विमान्सा यांच शीलाचरण आम्ही पाहिलेलं आहे. त्यांची समाजाप्रती धम्मा प्रति श्रद्धा आम्ही पाहिलेली आहे... कुठलाही इव्हेंट न करता आणि प्रदर्शन न करता कुठल्याही प्रकारचा नावाचा प्रतिष्ठेचा फोटोचा प्रसिद्धीचा अंश मनात न आणता,समर्पित भावनेतून त्यांनी धम्माला वाहून घेतलेलं आहे. अशा त्यागी समर्पित नेतृत्वाला समाजाने पाठिंबा जाहीर केला पाहिजे...त्यांच्या सत्याग्रहा मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे.
नमो बुध्दाय... जय भीम
वैभव सोनवणे
समन्वयक - पालि भाषा समन्वय समि

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com