Top Post Ad

हा आहे पारंपारिक दहशतवाद

पारंपारिक दहशतवाद मान्य करावाच लागेल !  दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे...भगवान बुद्धाला छळणारे हे पारंपारिक दहशतवादीच होते. बौद्ध भिक्खूंना मारणारे तत्कालीन  दहशतवादीच होते. चार्वाकाला मारणारे  दहशतवादीच होते. बसवेश्वरांना मारणारे  दहशतवादीच होते. संत ज्ञानेश्वरांना छळणारे  दहशतवादीच होते. संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे  दहशतवादीच होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, तुम्हाला राजे म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असे म्हणत त्यांची हेटाळणी करणारे  दहशतवादीच होते. शत्रूशी हातमिळवणी करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा कट रचणारे  दहशतवादीच होते.त्यांना शत्रूच्या हातात पकडून देणारेही  दहशतवादीच होते. 

महात्मा फुलेंवर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांच्या खुनाची सुपारी देऊन मारेकरी घालणारे  दहशतवादीच होते. स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आद्यशिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्यावर शेणगोटे मारणारे  दहशतवादीच होते. छत्रपती शाहू महाराजांना बदनाम करणारे , त्यांच्या खुनाचा प्रयत्न करणारे  दहशतवादीच होते. एका वर्गाला शूद्र ठरवून त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणारे  दहशतवादीच होते. माणसाला माणूस म्हणून जगूच द्यायचे नाही; शूद्रांना पाण्यापासून वंचित ठेवणारे दहशतवादीच होते. आगरकर हे केवळ पारंपारिक प्रवृत्तीविरोधात होते म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे  दहशतवादीच होते.

 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसवणारे आणि ते शिक्षणापासून वंचित कसे राहतील, याचा प्रयत्न करणारे  दहशतवादीच होते. महात्मा गांधी यांच्यावर अनेकदा हल्ले करणारे आणि प्रार्थनेला जाणाऱ्या निशस्र महात्म्यावर गोळ्या झाडणारे  दहशतवादीच होते.  अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी झगडणारे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे दहशतवादीच होते.  सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या गोविंद पानसरे यांचा खून करणारे  दहशतवादीच होते. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या समाजसुधारणेच्या कार्याला संपविण्यासाठी त्यांना ठार मारणारे दहशतवादीच होते.

स्त्रियांना या समाजात स्थानच नाही. त्या केवळ उपभोगाच्या वस्तू आहेत, असे मानणारे  दहशतवादीच होते. आपली आई उपभोगण्याची वस्तू आहे, असे मानणारे  दहशतवादीच होते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान ज्या पारंपारिक दहशतवादाविरोधात होते, त्या मनुस्मृतीला आपले संविधान मानणारे दहशतवादीच होते. या पारंपारिक दहशतवादानेच भारताला जातीव्यवस्थेत ढकलले अन्  देशात विषमतावादी वर्णव्यवस्था लादली.  अशांना  दहशतवादी म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? 'पारंपारिक दहशतवाद' हा मागील हजारो वर्ष अस्तित्वात होता अन् पुढील हजारो वर्ष अस्तित्वात राहिल. जोपर्यंत जातीव्यवस्था - वर्णव्यवस्था आहे, तोपर्यंत पारंपारिक दहशतवाद विसरताच येणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com