Top Post Ad

मुंबई ठाण्यासह देशभरात ठिकठिकाणी कामगारांचे आंदोलन... देशव्यापी संपाला पाठिंबा

केंद्र सरकाने कामगारांनी प्रदीर्घ संघर्षातून मिळवलेले44 कामगार कायदे रद्द करून 4 श्रम संहिता लागू केले. ह्या श्रमसंहिता कामगारांचा अधिकारांना डावलणारे असल्याने  तसेच कामगार संघटनांशी कुठलीही चर्चा न करता लागू केल्याने देशातील सर्वच कामगार संघटना ह्याचा विरोध करीत काल  १२ फेब्रुवारीला  देशव्यापी संप केला. मुंबईत ही या संपला कामगार कर्मचारी यांनी जोरदार पाठिंबा देत मुंबईत आंदोलन केले.    कामगार विरोधी ४ नवीन श्रम संहिता रद्द करा,बांधकाम नाका कामगार फेरीवाले कंत्राटी कामगार यांना सुरक्षा द्या खागीकारण बंद करा.किमान वेतन 30 हजार रुपये दिले पाहिजे. आशांना कर्मचारी म्हणून दर्जा देऊन त्यांना मानधन न देता वेतन द्या, आशां सेविकांना दरमहा ५ तारखेला मानधन द्या, त्यांना वेतन चिठ्ठी द्या, त्यांची सेवानिवृत्ती ६० ऐवजी ६५ वयोमर्यादा करा, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा, शेतमालाचा हमी भावाचा कायदा करा, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करताना आदिवासी व गैर आदिवासी यांचे   वन जमीन अतिक्रमण धारकाचे कोणत्याही दोन पुराव्याचा आधारावर  दावे मंजूर करा, आदी व अन्य मागण्यां साठी कामगार यांनी मुंबईत आंदोलन केले.

मुंबईतील  फेरीवाला,नाका,  बांधकाम  कामगार, आशा आणि अंगणवाडी सेविका प्राध्यापक, मंत्रालय कर्मचार्‍यांनि दिला देशव्यापी संपला पाठिंबा.  सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन,आयटक,इंटक , कामगार संघटना संयुक्त कृती समिति, बृहन्मुंबई राज्यसरकारी कर्मचारी संघटना, प्रधाध्यपाकांची बुक्ट्टु,  बांधकाम आणि नाका कामगार संघटना ,जनवादी होकर्स सभा, बॅंक,एलाआयसी आशा कर्मचारी अंगणवाडी सेविका सह अनेक कामगार कर्मचारी संघटनांनी आझाद मैदानात सह मुंबईत ठीक ठिकाणी आंदोलन केले.मुंबईतील बिकेसी येथील कामगार आयुक्त भवनावर सुमारे 5 हजार कामगार कर्मचारी यांनी जोरदार आंदोलन केले. सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजे पर्यन्त फेरीवाले, नाका कामगार,क्रांत्राटी कामगार सह कर्मचारी यांनी ही या आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनाच्या वेळी  कामगार संघटना सयुक्त कृती समितिचे शिष्टमंडळाने कामगार आयुक्त यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले. 

मुंबईतील आंदोलनाचे नेतृत्व डॉक्टर विवेक मोंतेरो,डॉक्टर एस.के . रेगे, आमदार सचिन अहिर,गोविंद राव मोहिते, बजरंग चव्हाण कॉम्रेड सहिद अहमद,  कैलाश कदम ,एड. आरमाइटी इराणी,मिलिंद रानडे, विजय कुलकर्णी, प्राध्यापक मधु परांजपे, प्रा. स्वाति लावंड, कॉम्रेड शैलेन्द्र कांबळे, सीटू नेते के.नारायणन, संगीता कांबळे , डॉक्टर रविंद्र मदने, संगीता सोनवणे, शैलेन्द्र चव्हाण,कमल रावत, अँटोनी गेब्रियल आदि कामगार नेत्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. अशी माहिती कामगार संघटना संयुक्त कृती समितिचे विवेक मोन्तेरो यांनी दिली. तसे

तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ 'धर्मराज्य पक्षासह अनेक संघटनां'च्या वतीने,  जोरदार निदर्शने करण्यात आली, तीन शेतकरी काळ्या कायद्यांप्रमाणेच, केंद्र सरकारने या चार काळ्या कामगार कायद्यांच्या माध्यमातून श्रमिकवर्गाचं शोषण करण्याचा कट रचला असून, कामगारवर्ग व कामगार-चळवळ उध्वस्त करु पाहणाऱ्या मोदी-शहा सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठीच ही निदर्शने करण्यात आली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन धर्मराज्य पक्षाचे राजन राजे यांनी यावेळी केले. 

एकीकडे नव-अस्पृश्यता म्हणून ओळखली जाणारी कंत्राटी-कामगारपद्धत ही, कामगारांना गुलामगिरीत ढकलत असतानाच, या चार काळ्या कामगार कायद्यांमुळे अवघे कामगारजगत उध्वस्त होणार आहे. त्यामुळे काळ्या कामगार कायद्यांचा नायनाट, हीच कामगारांच्या स्वातंत्र्याची पहाट ठरणार असून, काँग्रेसचे नेते व इंडिया-आघाडीचे अध्वर्यू राहुल गांधी यांनीदेखील या चार काळ्या कामगार कायद्याला कडाडून विरोध केला आहे. काँग्रेस सत्तेवर येताच, हे काळे कायदे रद्द करु, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी नुकतेच लोकसभेत केले होते, त्याबद्दलही राजन राजे यांनी, आपल्या भाषणात राहुल गांधींचे जाहीर कौतुक करुन, त्यांचे आभार मानले. 

अहिल्यानगर येथील सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीत बोलताना त्यांनी, कारखानदारांची बाजू घेत, "उद्योगजकांना त्रास देणाऱ्यांना ठोकून काढू" अशी भाषा वापरली होती. दावोस परिषदेच्या माध्यमातून, महाराष्ट्रात कोट्यवधी डॉलर्सचे उद्योगधंदे आणण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच, मराठी कामगार देशोधडीला लागला, त्यांच्याच सरकारने कंत्राटीपद्धतीमुळे नोकऱ्या असुरक्षित केल्या, महाराष्ट्रातील उद्योग याच भाजपने राज्याबाहेर नेले आणि तेच मुख्यमंत्री, उद्योजकांची बाजू घेत, आपल्या न्याय्य-हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्यांना ठोकून काढण्याची भाषा करतात, हे संतापजनक असल्याचा हल्लाबोल राजन राजे यांनी यावेळी केला. 

याप्रसंगी डावे पक्ष आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी, 'धर्मराज्य पक्षा'च्या वतीने, ही जोरदार निदर्शने करण्यात आली होती. यावेळी कॉ. शिशिर ढवळे, कॉ. उदय चौधरी, समाजवादी नेते जगदीश खैरालिया, संजय मंगला गोपाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे, 'धर्मराज्य पक्षा'चे सचिव नरेंद्र पंडित, प्रवक्ते समीर चव्हाण, 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा'चे महासचिव महेशसिंग ठाकूर, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी आदी पदाधिकाऱ्यांसह, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्यासोबतच विविध क्षेत्रातील कंत्राटी व कायम कामगार तसेच, 'धर्मराज्य पक्ष' आणि 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा'चे कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com