Top Post Ad

मुंबईकर गुदमरतोय अवैध फेरीवाल्यांच्या गर्दीत

रेल्वे आणि महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई कोण करणार ? या प्रश्नाच्या होणाऱ्या टोलवाटोलवीमुळे अधिकारी आपली जबाबदारी झटकत असले तरी यात भरडल्या जाणाऱ्या निष्पाप मुंबईकरांना मात्र आपला जीव गमवावा लागत आहे.हि मोठी शोकांतिका आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते मानखुर्द या हार्बर लाईन,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते मुलुंड आणि चर्चगेट ते दहिसर या सर्व रेलवे स्थानका बाहेर आजही काही अधिकृत तर मोठ्या संख्येने अनधिकृत फेरीवाले हे आपले बस्तान बसवून असल्याचे दिसून येते.रेल्वेचे अधिकारी आणि पालिकेचे काही अधिकारी यांचे या फेरिवाल्यांशी तसेच त्यांच्यास्थानिक प्रमुख व्यक्तिशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधा मुळे फेरिवाल्यांवर अंगदी दिखाऊ आणि थातुर मातुर करवाई केली जाऊन पुन्हा जैसे थे चेच फेरिवाल्यांचे अटूट साम्राज्य पाहायला मिळते.

पूर्वीचे एलफिस्टन आणि आताचे प्रभादेवी रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगरा चेंगरीत निष्पाप 23 प्रवाश्यांच्या मृत्युस कारणीभूत ठरली ती अफवा.त्याचे झाले असे की 29 सप्टेंबर 2017 या दिवशी सकाळच्या 10.30 च्या सुमारास प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांमध्ये एकाच वेळी चार उपनगरी गाड्यांनी प्रवेश केला.येथील प्रभादेवी (एलफीस्टन) आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या अरुंद अशा पादचारी पुलावर अनेक प्रवासी एकाच वेळी आले त्यातच मोठा पाऊस पडत असताना पूल पडत आहे अशी अचानक अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी अधिक गर्दी करीत पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि अघटित प्रकार घडला,प्रत्येकाने पुढे जाण्याच्या चढ़ाओढ़ीत पाय घसरून काही जन पडले आणि झालेल्या चेंगराचेंगरीत 23 लोकांचा हकनाक जीवबळी गेला तर 39 लोक जखमी झाले.यात अधिकाधिक लोक अतिरक्तस्राव व गुदमरून मृत्यू झाल्याचे नंतर समोर आले.रेल्वे,पोलिस आणि पालिका प्रशासनाच्या निर्बुद्ध आणि अक्षम्य दुर्लक्षपणामुळे या लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

यानंतर रेल्वे प्रशासन आणि महानगर पालिकेच्या आदेशानुसार रेल्वे स्थानक व रेल्वे परिसरात 150 मीटर परिसरात सुरक्षिततेच्या कारणास्तव फेरीचा व्यवसाय करणाऱ्या सर्व प्रकारच्या फेरिवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रतिबंध घातला गेला. त्यानंतर काही दिवस रेल्वे पोलीस व मुंबई पोलीस तसेच महानगरपालिका अनुज्ञापन विभागाकडून रेल्वेचा आदेश काटेकोरपणे पाळला गेला.नंतर मानवी प्रवुत्तिनुसार हम करे सो कायदा या उक्ति प्रमाणे काही काळ पुढे सरकताच रेल्वेच्या या आदेशाची पायमल्ली करीत पुन्हा रेल्वे स्थानक परिसर,रेल्वे पुल व स्काय वॉकवर फेरिवाल्यांची गजबज सुरु झाली.यात प्रामुख्याने मुंबईतील गर्दीचे स्थानक असलेल्या मालाड, गोरेगांव,चेंबुर, कुर्ला,दादर,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,चर्चगेट रेल्वे स्थानक या स्थानकाच्या लगतच आजही मोठ्या संख्येने फेरीवाले आपले बस्तान बसवून व्यवसाय करत आहेत.

पालिकेने केलेली कारवाई :सन 2022 मध्ये 10 हजार 816 रेल्वे पोलीस प्रशासन व महानगर पालिकेच्या त्या त्या वार्ड अधिकाऱ्यांनी कारवाई केली.यात फेरिवाल्यावर दंडात्मक कारवाई करुन पालिकेने 54 लाख 11 हजार 400 रुपये दंड वसूली केली आहे.सदय स्थितीत मुंबईतील काही महत्वाच्या रेल्वे स्थानक व भुयारी मार्गात मोठ्याप्रमाणावर अनधिकृत फेरीवाले आपला फेरी व्यवसाय करत आहेत.याकडे रेल्वे प्रशासन,व स्थानिक पालिका प्रशासन आणि रेल्वे पोलीस यांच्या अर्थपुर्ण संबंधामुळे चेंबुर,कुर्ला,कुर्ला भुयारी मार्ग,दादर रेल्वे प्रवासी पुल,भायखळा स्थानक परिसर,छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग,भुयारी मार्ग प्रवेशद्वार,जीपीओ फुटपाथ,बोरा बाजार,चर्चगेट रेल्वे स्थानक, भुयारी मार्ग या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर अनधिकृत फेरीवाले बिन दिक्कत आपला फेरिचा व्यवसाय करीत असल्याचे दिसत आहे.याची सर्व माहिती पोलिस, पालिका आणि रेल्वे पोलिसांना नसावी यह बात कुछ हजम नही होती.

# ज्या फेरीवाल्यांना पालिकेच्या अनुज्ञापन विभागाने परवाने दिलेले आहेत.त्यांना 1 X 1 मीटर म्हणजेच 3 X 3 स्क्वेयर फुटची जागा देण्यात आलेली आहे. परंतु याला न जमानता फेरिवाले मात्र आपले बस्तान ऐसपैस करीत ठाण मांडूण बसले आहेत.

#पंतप्रधान स्वनिधी योजनेतुन आज दहा हजार पासून ते एक लाख रूपयांपर्यंत परताव्याच्या बोलीवर बिनव्याजी कर्ज बँकद्वारे वाटप करण्यात आले आहे.अशा फेरी वाल्यांची संख्या एक लाख आहे.

# आजही लोक फेरीवाला झोन आणि फेरीवाला झोन अशी व्यवस्था मुंबई महानगर पालिका प्रशासनाने केलेली आहे.

# मुंबई हि सात बेटांची बनलेली महानगरी असून मुंबईची कुळ तसेच ग्रामदेवता मुंबादेवी माता आपल्या प्रसन्न वदनाने मुंबईकरांवर कल्याणकारी आशीर्वादाची पखरण करीत असते.देशाची आर्थिक राजधानी असलेले ऐतिहासिक शहर आहे.नैसर्गिक बंदर आणि चित्रपट सृष्टि,स्वप्न नगरी यामुळे देश विदेशातील नागरिक आणि पर्यटकांचे आवडते शहर आहे.या शिवाय येथे आपली स्वप्ने,नशिब अजमावण्या साठी तसेच पोटाची खळगी भरण्यासाठी विविध राज्य आणि प्रांतातून रोज हजारोंच्या संख्येने लोक मुंबईत येत असतात.

मुंबईत परप्रांतीय फेरीवाल्यांची मोठी चलती असून अगदी महत्वाच्या रेल्वे जंक्शन असलेल्या रेल्वे स्थानकाशेजारी त्यांची फेरीच्या व्यवसायाची बस्ताने दिसून येतात. वाहतूक आणि राहदारी यांस मोठा अड्सर असूनही हे कारवाई पासून मात्र अलिप्त राहतात हे एक मोठे लोकांना न सुटणारे कोडे आहे. काही नोकरदार मंडळी आपल्याला घरी जाता जाता आवश्यक वस्तू अनधिकृत फेरीवाल्यांकडून खरेदी करून जाण्याची वाईट सवय आज त्यांना गर्दीतून मार्ग काढत जाताना त्रासदायक ठरतेय याकडे त्यांचे मुद्दामहुन दुर्लक्ष करण्यामागे एक कारण ठरतेय.

कुलाब्याच्या दांडी पासून ते दहिसर चेकनाका आणि मुलुंड सातरस्ता ते मानखुर्द गांव आणि माहुलची खाड़ी,शिवड़ी कोळीवाड़ा,पवई विहार तळे येथून उगम पावणारी मीठी नदी माहिम आणि बांद्रा येथे अरबी समुद्राला मिळते.अशा विस्तीर्ण परिघात मुंबईचा विस्तार झपाट्याने झाला.तस तसे येथे नागरी वस्त्यांमुळे पद पथावर फेरीवाल्यांच्या पथाऱ्या पसरत गेल्या.मुंबई महानगर पालिकेच्या अनुज्ञापन विभागातर्फे 2014 ते आजतगायत पदपथावरील फेरीवाल्यांना तात्पुरत्या स्वरुपात परवाने वितरीत करण्यात आले त्यांची संख्या अवघी 115 असून उर्वरित फेरीवाले सर्वे न झाल्याने सर्वेक्षणाच्या प्रतिक्षेत असलेले फेरिवाले यांची संख्या जवळपास 15 हजार असल्याचे सांगण्यात येते.

फेरीवाला माफिया : 2014 च्या फेरीवाला सर्वेक्षणानंतर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फेरिवाल्यांना रस्त्यावर आपला पसारा मांडून फेरिचा व्यवसाय सुरु केला त्याच्या बदल्यात या बेकायदेशीर फेरिवाल्यां कडून लाखों रुपये हे  फेरीवाला माफिया वसूल करीत आहेत हे सारे उघड़पणे सुरु असून यांना प्रशासनाकडून काहीच धाक उरला नसल्याने आता एक नवीन फेरीवाला माफिया निर्माण झाल्याचे चित्र संपूर्ण मुंबईत स्पष्टपणे दिसून येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com