मुंबई विद्यापीठामध्ये पाली भाषा भवन झालं पाहिजे. मुंबई विद्यापीठातील वीस वर्ष पासून अनुदानित नसणार पाली विभाग हे अनुदानित व्हावं. मुंबई विद्यापीठात तीनशे किंवा पाचशे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती व्हावी. तसेच आपल्या न्याय्य मागण्यांकरिता आंदोलन करीत असलेले पीएचडीचे विद्यार्थी भंते विमांसा यांच्यावरती केलेल्या एफ आय आर मागे घेण्याच यावा. विद्यापीठ प्रशासनाच्या जातीवादी मानसिकतेविरोधामध्ये भंते विमांसा यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ. येत्या 16 तारखेला आझाद मैदान येथे एक वाजता जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे प्रसिद्ध गोल्डमॅन म्हणून ओळखले जाणारे Rohit Popat Pisal यांनी भंते विमांसा यांच्या शांततापूर्ण सत्याग्रहाला आणि 16 मार्च रोजी होणाऱ्या जन आक्रोश मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला आहे. भंते विमांसा यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवत त्यांनी समाजातील सर्व संविधानप्रेमी, धम्मप्रेमी आणि न्यायप्रिय नागरिकांना आवाहन केले आहे की 16 मार्च रोजी मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि अन्यायाविरोधात तीव्र निषेध नोंदवा.

0 टिप्पण्या