Top Post Ad

पुरोगामी मतांची स्पेस इतर कोणाकडे सरकू नयेत, म्हणून ही नाटकं....

शरद पवार  ........नावाच्या मृगजळामागे जे लोकं धावत होते, त्यांचे आज डोळे उघडले! आम्ही सुरवातीपासून सांगत होतो! पुरोगामी मतांची स्पेस इतर कोणाकडे सरकू नयेत, म्हणून साहेब ही नाटकं करीत आलेले आहेत! अजित पवारांनी पहाटेंचा शपथविधी केला, तेंव्हाही साहेब भाजपासोबत जाण्याच्याच मुड मध्ये होते! पक्षांतर दबावामुळे तेंव्हा त्यांना ते शक्य झालेलं नव्हतं! कारण त्यामुळे पक्षाला मोठं भगदाड पडलं असतं! ... तेंव्हा निर्माण झालेलं वैचारिक छिद्र हळूहळू मोठं होऊ देणं, आणि त्यानंतर अजित पवारांना अख्खा पक्ष (राष्ट्रवादी पक्ष) घड्याळ चिन्हासकट पळवू देणं, आणि त्यानंतर काही पुरोगामी लोकं सोबत घेऊन "तुतारी" फुंकत बसणं, हळूहळू सुप्रियाताईंनी माझे दादा - माझे दादा करायला लावणं, हा सगळा त्या स्क्रिप्टेड आचारसंहितेचाच भाग होता! 

बिच्चारे पुरोगामी!....अख्खं आयुष्य साहेबांच्या मागे घालवित फिरणाऱ्या जितेंद्र आव्हाड सारख्यांना आता पुढचे दिवस कठीण आहे! बाकी अनेकांना आता विचारांची लढाई प्रिय असतील तर इकडं तिकडं उड्या मारण्या शिवाय पर्याय उरलेला नाही! ....महाराष्ट्रातील "पुरोगामी मतांची स्पेस" साहेबांनी अशा प्रकारे कुजविली! आणि संघ - भाजपाच्या सनातनी राजकारणाला बळ दिले! ... कांग्रेस पक्षाच्या धुरंधर नेतृत्वालाही हे ओळखता आले नाही, हे एक मोठं कोडं आहे! आपण, पुरोगामी बुरखा पांघरलेला एक सनातनी पोसत आहोंत, हे त्यांना फुले, शाहू ,आंबेडकरी वाद्यांना केंव्हा कळेल?

शरद पवारांचे स्वार्थी राजकारण आणि राजकारणासाठी नैतीकतेची केलेली हत्या..- गेल्या अनेक दशकात राजकारणात स्वत:चा दबदबा ठेवून असलेल्या पवारांची राजकारणावरची पकड ढिल्ली झाली असे समजायचे का..?प्रधानमंत्री पदाची असलेली पवारांची आकांक्षा तथा महत्वकांक्षा त्यांना अस्थीर तर करत नाही ना ?कुठल्याही प्रकारे केंद्रात कुठलेतरी महत्वाचे स्थान शेवटच्याक्षणी पदरात पाडून घ्यायचे असा केविलाणा प्रयत्न बहूतेक पवार करत असावेत. स्वत:च्या इच्छा आकांक्षा पुर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करायच्या भुमिकेत सध्या पवार आहेत का..? असा प्रश्न सामान्य नागरीकांना पडल्यावाचून राहत नाही.राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जाणारे पवार सध्या मात्र बॅक फुटवर आलेले पहायला मिळत आहेत.परिणामी पवारांनी ज्यांना भरभरून दिलं ते सर्वचजण पवारांची साथ सोडून निघून गेले.इतर पक्षातलीही कार्यकर्ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंड करून सोडून गेली.त्यांच्या मते बंड किंवा उठाव जरी असला तरी ती पक्षाशी केलेली गद्दारीच होती असे राज्यातल्या जनतेने शिकामोर्तब केले आहे,कारणही तसेच होते जे की,ज्या पक्षाने शुन्यातल्या कार्यकर्त्यांना भरभरून दिले,त्या पक्षा सोबत तथा पक्षातल्या निर्णयासोबत राहणे हे क्रमप्राप्त असते.परंतू स्वार्थासाठी पक्षाला सोडून तथा हिंदुत्वासाठी बंड तथा उठाव (गद्दारी) करून पक्षाला सोडणे हे निष्ठावंताच्या व्याख्येत बसते का ? हे ज्याचे त्यांनी ठरवावे.तसेच काहीसे पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाबरोबर झाल्याचे बघायला मिळत आहे.

असो, शेवटी या देशात काय घडत आहे काय बिघडत आहे यांचे मोजमाप मायबाप जनता करत आहे.आणि करत राहील. परंतू एक गोष्ट मात्र नक्की की,जे काही घडत बिघडत आहे ते काही नैतीक दृष्ट्या देशाला व राज्यालाही परवडणारे नाही.एक जुनी म्हण आहे,'करावे तसे भरावे' जे आपण करतो त्याची परतफेड याच जन्मी याच देही याच डोळा बघायला मिळते हे मात्र नक्की. तेच भारतीय राजकारणात आज आपण सर्वजण बघत आहोत. देशातली राजकारणाची स्थिती बघता तेवढी फारशी चांगली दिसत नाही.राजकारणातली नैतीकता कुठेच दिसत नाही.विचारधारेला पायदळी तुडवून स्वार्थासाठी कोण कुठे जाईल कुणालाही सांगता येत नाही.कधी नव्हे ती संविधानिक यंत्रणेवरची विश्वासार्हता संपली आहे.निवडणुक आयोगावरचाही संशय संपता संपत नाही.

हे सगळं राजकारण पहाता सत्तेसाठी अन् सत्तेतला मलीदा लाटण्यासाठी काहीही होऊ शकतं. हे सांगायला आता कुण्या कथीत जोतीष्याची गरज वाटत नाही. अशाच घडामोडींमध्ये शरद पवारांचे स्वार्थासाठीचे राजकारणही घातकी वाटत आहे. आरएसएस प्रणित भाजपाचे धर्मांध राजकारण जेवढे घातकी आहे तेवढेच घातकी पवारांचे राजकारण घातकी वाटत आहे. सत्तेची चटक लागलेल्या तथा सत्तेशिवाय राहू न शकणा-या शरद पवारांना शेवटच्या क्षणातही राजकीय अस्तीत्वाची महत्वकांक्षा खुप काही सांगून जात आहे. शरद पवार हे त्यांची असलेली महत्वकांक्षा उघडपणे बोलून जरी दाखवत नसले तरी ती लपूनही राहत नाही.राजकारणतल्या त्यांच्या नेहमीच्या उचापती तथा राजकारणातली त्यांची प्रत्येकवेळची बदलती भुमीका ही सगळं काही दाखवून देते.

हल्लीच्या अलिकडच्या काळातच त्यांनीच घडवलेले अन् मढवलेले त्यांचेच पुतणे अर्थात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही जसे शिंदे सेनेनी ठाकरेंशी बेईमानी केली अर्थात त्यांच्या मते उठाव तशीच बेईमानी अर्थात यांच्याही मते उठाव अजित पवारांनी केला. इथे कुठेही विचारधारा जुळविण्याचा प्रयत्न झाला नाही तर फक्त आणि फक्त सत्ता अन् सत्तेचा मलीदा लाटणे हाच आहे. राजकीय घडामोडीत प्रस्थापीत राजकारणी हे उघड जरी शत्रू असले तरी ते शत्रू नसतात तर सत्तेचा मलीदा लाटण्यासाठी कुठल्याही थराला जावून एकमेकांचे हातात हात घेऊन जनतेला वेड्यात काढू शकतात.तसेच सध्याच्या घडामोडींवरून दिसत आहे.पवारांना त्यांच्या महत्वकांक्षेपर्यंत पोहचण्यासाठी काय शक्कल लढवता येईल तशी ते लढविण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतू या घडामोडीत प्रत्येकालाच जुळवून घेता येईल असे नाही.म्हणुनच कार्यकर्ते मात्र गोंधळून जातात अन् मग जिथे स्वत:ला सुरक्षित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात.

'निष्ठा गई भाड मे' आणि मग जनतेतून म्हणा किंवा पत्रकारांकडून याबाबत एखादा प्रश्न विचारल्या गेला की,पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेंकडून मग 'रोज नई सुबह होती है' अशी केविलवाणी उत्तरे ऐकायला मिळतात. प्रत्येकवेळेला काय उत्तरे द्यायची हाही प्रश्न असेलच ना..! सरड्यासारखी रंग बदलणा-या भुमिका असतील तर काय ? परंतू यात मात्र नक्की भाजपासारख्या धर्मांध पक्षाने संविधानिक संस्थाना हाताशी धरून इथल्या राजकीय संस्था आणि त्यांच्या चालक मालकांना मात्र चांगलेच कोंडीत पकडले आहे. आणि यामुळेच की काय शरद पवार तथा इतरही राजकीय लोकप्रतिनिधी हतबल झाले असल्याचे आपण सर्वजण बघत आहोत.

हल्लीचे राजकारण लोकशाहीचे नव्हे तर हुकूमशाहीचे राजकारण होत आहे. असे असले तरी, राहत इंदुरीकरांच्या शब्दात सांगायचे झाल्यास,  "लगेगी आग तो आएंगे घर कई ज़द में,यहाँ पे सिर्फ़ हमारा मकान थोड़ी है.." याच पध्दतीने सध्या घडत आहे.. परंतू या घडामोडींचा परीणाम सर्वसामान्य जनतेवर होतो हे मात्र नक्की.  परंतू स्वत:च्या महत्वकांक्षेंपोटी या राजकारण्यांना त्याचे काहीच वाटत नाही. हेच शरद पवारांच्या बाबतीत घडत आले आहे.  अजूनही गौतम अदानीच्या माध्यमातून पवार भाजपाशी संधान साधून आहेत.उघडपणे भाजपाशी हातमिळवणी करता येईना म्हणून वेगवेगळे प्रयोग करून जनतेची दिशाभुल करायची आणि आपला स्वार्थ साधून घ्यायचा आणि याच माध्यमातून स्वत:ची महत्वकांक्षा पुर्ण करण्याकडे पवारांचा कल झुकलेला दिसत आहे.व त्या महत्वकांक्षेपोटी चाललेली धडपड त्यातलाच एक भाग म्हणजे अजित पवारांनी भाजपासोबत केलेली हात मिळवणी,

पुरोगामी विचारधारा सांगणारे अजित पवार धर्मांध विचारधारेशी कसे काय जुळवून घेऊ शकतात..? हा प्रश्न पडतो. एवढे सारे घडूनही अजित पवार व शरद पवार स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने युतीच्या माध्यमातून पुन्हा एकत्र येतात. हे सगळं अवघड आहे. परंतू माझ्यासारख्यांना हे समजत नाही असं मुळीच नाही. आणि दुसरा भाग म्हणजे शरद पवारांनी हल्ली भाजपविरोधात उघडपणे तथा कठोर टिपण्णी टाळणे याचा अर्थ स्पष्ट आहे की,स्वत:चे स्थान राजकारणात मजबूत करणे,स्वत:चे अर्थात लाडक्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळेंना केंद्रातील सत्तेत स्थान मिळवून देणे,आणि मग देशाच्या राजकारणात सुप्रिया सुळे अन् राज्याच्या राजकारणात अजित पवार.. 

"आहे की नाही राजकीय सारीपाटावरच्या बुध्दीबळाचा अनैतीक खेळ" हेच गलीच्छ राजकारण पवारांनी केले.आणि आजमितीला भाजपा करत आहे.  एका टोकाला पुरोगामीत्व व दुस-या टोकाला धर्माध,  परंतू दोन्हीही मुखवटे घातलेलेच चेहरे,  मी पुरोगामीत्वाच्या नावावर राजकारण करून राजकारण करतो आणि तुम्ही धर्मांधाच्या नावावर राजकारण करा,  बाकी या दोन्ही विचारधारेच्या आड येणारांना आडवे करा, हे यांचे ठरलेले राजकारण. म्हणुन देशाचा झालेला सत्यानाश आणि जनतेची होत असलेली कुचंबना हे फारच विदारक आहे. याला कारणीभुत शरद पवारांसारख्या प्रवृत्ती. पवारांनी वसंतराव नाईकांशी गद्दारी करून नैतीकतेची हत्या केली आणि आता शरद पवारांच्या बोटाला धरून राजकारण शिकलेले मोदी काय, आणि आता मोदींचे गुणगाण गात मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस काय ? हे सर्वचजण राजकारणासाठी नैतीकतेची हत्याच करत आहेत.. धर्मांध भाजपा उघडपणे करत आहे तर पुरोगामीत्वाचा मुखवटा चढवलेले पक्ष संघटना पुरोगामीत्वाच्या आडून करत आहे. या हत्येमुळे रक्तबंबाळ झालेला देश आणि देशातली हतबल झालेले स्वार्थी ढोंगी नेते मंडळी लोकशाहीवर बलात्कार करत आहेत, सयंमी जनता मात्र उघड्या डोळ्याने बघत आहे आणि मुकाट्याने सहन करत आहे.. परंत हेही तितकेच खरे, सयंमाचा अंत झाला की त्याचा परीपाक फक्त उद्रेकच..

  • विकास साळवे... पुणे
  • 9822559924..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com