Top Post Ad

देवेशचंद्र ठाकूर या बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे १० वर्षीय प्रतिभा शिनगारेचा मृत्यू...

मुंबईतील पंचशील नगर, चेंबूर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये दिनांक १८/११/२०१९ रोजी बिल्डरांच्या हेतुपुस्सर हलगर्जीपणामुळे, पुनर्वसन इमारतीचे बांधकाम सुरु असताना संरक्षण जाळी न लावल्यामुळे एका १० वर्षाची प्रतिभा शिनगारे या निष्पाप मुलीच्या डोक्यात सिमेंटचा दगड पडून मृत्यू झाला. बिल्डरच्या दबावामुळे, सुरुवातीला अज्ञात इसमाच्या नावाने टिळक नगर पोलीस ठाण्यात FIR क्र. ४४९ / २०१९ दाखल झाला, परंतु रहिवाशांच्या जनरेट्यामुळे व आंदोलनामुळे सदर गुन्ह्यात या योजनेचे विकासक मे. अरिहंत रिलेटर्स चे भागीदार म्हणून ३ आरोपीची नावे नमूद केली त्यामध्ये १. जतीन अरविंद मेहता, (गुजरातचे व्यापारी) २. चेतन भानुशाली, (भाजपचे गुजरातचे नेते) ३. देवेश चंद्र ठाकूर, (बिहारचे विद्यमान खासदार व जनता दल (युनायटेड) पक्षाचे नेते) यांची नावे आहेत, 

पोलिसांनी दिनांक ०३/१२/२०२० रोजी मा. विक्रोळी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. (PS/880/2020) ज्यामध्ये केवळ आरोपी क्र. १ वरच दोषारोप पत्र ठेवले व आरोपी क्र. २ व ३ यांच्या विरोधात दोषारोप पत्र ठेवण्यास हेतुपुरस्सर टाळले. आरोपी क्र. २ यांची विकासक म्हणून केलेली नेमणूक रद्द केली असून, आरोपी क्र. ३  देवेश चंद्र ठाकूर हे आजही सदर योजनेत बिल्डर म्हणून काम बघतायेत. आरोपी क्र. ३ हे मागील ६ वर्षांपासून जामीन न घेता फरार असून, पोलिसांनी यांना आजतागायत अटक तर केली नाहीच शिवाय यांच्याविरोधात कुठलीच कार्यवाही सुद्धा केली नाही.

सदर बाब हि अत्यंत संवेदनशील असताना, गुन्हा घडून ७ वर्षांचा कालावधी संपला तरी पोलिसांनी आजतागायत आरोपी क्र. २ व ३ च्या विरोधात दोषारोप पत्र सादर केले नाही, त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांना चौकशीसाठी बोलाविले नाही, त्यांचा जामीन घेतला नाही, त्यांना अटक केली नाही, किंवा त्यांना /फरार सुद्धा घोषित केले नाही, हा पोलिसांचा निष्काळजीपणा आहे कि विकासकाला वाचविण्याचा केवीळवाणापणा आहे, हे समजायला मार्ग नाही.पोलीस उपायुक्त परी-६ चे श्री. समीर शेख यांच्या सांगण्यावरून टिळक नगर येथील पोलिसांनी पंचशील नगर मधील रहिवाशांवर, सोसायटीच्या पदाधिकाऱयांवर, व त्यांच्या वकिलांवर याच बिल्डरांच्या राजकीय दबावाखाली, खोटे गुन्हे दाखल केले आहे. 

परंतु रहिवाशांनी, किंवा सोसायटीने केलेल्या तक्रारीवर, बिल्डरांविरोधात आजतागायत गुन्हे दाखल केले नाही, हि खूप लाजिरवाणी बाब आहे. भारतीय संविधानाचे कलम १४ हे सर्व नागरिकांना समान न्यायाची हमी देते, परंतु टिळक नगर पोलीस ठाणे हे केवळ बिल्डरांच्या संरक्षणाचीच हमी देत असून कलम १४ चे उल्लंघन करत आहे. टिळक नगर पोलीस ठाणे व पोलीस उपायुक्त परी-६ चे  समीर शेख हे बिल्डरांच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे, सदर प्रकरणात ते बिल्डरांना दोषमुक्त करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, म्हणून बिल्डरच्या हेतुपुरस्सर हलगर्जीपणामुळे, पुनर्वसन इमारतीचे बांधकाम सुरु असताना संरक्षण जाळी न लावल्यामुळे, मृत्यू झालेल्या १० वर्षीय प्रतिभा शिनगारे या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी अॅड. संतोष सांजकर, भगवान हिवाळे, श्रीमती पार्वती सोनावणे दिनांक २३ मार्च २०२६ पासून आझाद मैदान येथे आंदोलन  करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com