Top Post Ad

मुंबई ते विजयदुर्ग M2M रो रो सेवा.... चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला

मुंबई ते विजयदुर्ग M2M रो रो सेवा नुकतीच सुरू झाली.
Economic ticket - 2500/-
Premium economic ticket - 4000/-
Two Wheeler - 1000/-
Cycle - 600/-
Four wheeler - 6000/-
कार ने 10kmpl Millage दिला तरीही 4500/- ₹ Fuel चे आणि टोल फार फार तर 1000/- जरी पकडला तरी 5500/- होतात ( ह्यात चार जणं बसून जातील ).
कार Ferry ने नेली तर 6000/- + ( 2500/-*4) = 16000/-.

आता कोकणातील मंत्री महोदयांनी काय विचार करून ही भाडे ठरवले ते त्यांनाच ठाऊक ? कसे काय मुंबईतील सर्वसामान्य कोकणी माणसांना परवडणार हे भाडे ?          कोकणातील कोकण वासियांची परवड कधीच थांबणार नाही....विजयदुर्गला पोहोचल्यावर पुढे घरापर्यंत आणि मुंबईला घरून भाऊच्या धक्क्यापर्यंत प्रवास खर्चही जोडला तर बजेट अजून वाढणार...यालाच म्हणतात "  चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला "

त्यापेक्षा रात्री दहा वाजता वसई वरून सावंतवाडी करता पॅसेंजर गाडी सोडली तर सावंतवाडी पर्यंत कोकणातील सर्व प्रवासी सव्वा दोनशे रुपयात सावंतवाडी पर्यंत सकाळी पोहोचतील तेथून एसटीने आपापल्या घरी जातील. या गाडीला भिवंडी आणि कोपर रोड सह कोकणातील प्रमुख स्थानके घेता येतील व सकाळी तिथून परतीच्या प्रवासाला निघालेली पॅसेंजर रात्री पुन्हा वसईला दहा वाजता पोहोचेल. यावर कोकणातील लोकांनी विचार करावा .

  • सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर... 940 41 356 19 
  • संस्थापक सदस्य कोकण रेल्वे 
  • सल्लागार : महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com