Top Post Ad

त्या 27 पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना जेलमध्ये घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही

 "शहिद सोमनाथ सूर्यवंशीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट सभागृहात खोटं बोलले. राज्य सरकार सोमनाथ सूर्यवंशी यांची केस दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. पण, आम्ही ही केस दाबू देणार नाही. यातील 27 आरोपी पोलिसांना शिक्षा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही", असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राहुरी येथे प्रचार सभेत बोलताना सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खोटारडेपणा उघडकीस आणतानाच अन्य पक्षाच्या आमदारांनीही याबाबत सभागृहात आवाज उठविला नाही, याकडे लक्ष वेधले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, " फडणवीस यांनी सभागृहात खोटी माहिती दिल्यावर महाराष्ट्रातील एकही आमदार मला दिसला नाही की, त्याने मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलतोय, म्हणून त्यावर सभागृहात आवाज उचलला. त्याविरोधात बोलण्याचे धाडस एकाही आमदारात नव्हते. उलट मला सगळेच म्हणत होते, "प्रकाशराव जाऊ द्या ना, ते मुख्यमंत्री आहेत". त्यावर मी त्यांना म्हटलं, मुख्यमंत्री आहेत मान्य आहे. पण त्यांनी सभागृहात खोटं बोलूच नये. किंवा सभागृहात त्यांना चुकीची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असेल हेही मला मान्य आहे.

मग नव्याने माहिती आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून त्यांच्या माहितीत दुरुस्ती करायला हवी होती. तशी फडणवीस यांनी हिंमत दाखवायला पाहिजे होती. कारण, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात 'सोमनाथ सूर्यवंशी यांचे निधन हृदयविकाराने झाले' असे म्हटले होते आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये 'सूर्यवंशी यांचा मृत्यू शरीराचे अनेक भाग व नसा आणि नसा तुटल्यामुळे झाला', असे म्हटले आहे. कोर्टानेही हे मान्य केले आहे. आता औरंगाबाद हायकोर्टातही ही केस पूर्णपणे दाबून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे. पण आम्ही पण चंग बांधला आहे. ही केस दाबली जाणार नाही. शहीद सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या त्या 27 पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना जेलमध्ये घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com