Top Post Ad

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोणावळा येथील विश्रामधामाच्या विस्तारित कक्षाचे उद्घाटन

 जलतरण तलावासह फाईव्हस्टार दर्जाच्या सुविधांनी युक्त मुंबई मराठी पत्रकार संघाचे लोणावळा येथील कै. दी. गो. तेंडुलकर स्मृती विश्रामधामाचे उद्घाटन शनिवारी जल्लोषात करण्यात आले. या कार्यक्रमाला  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी, तसेच लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी अशोक साबळे, अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के , उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, खजिनदार जगदीश भोवड विश्वस्त राही भिडे, अजय वैद्य यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 नूतनीकरणाचे काम विक्रमी वेळात पूर्ण करणे हे अशक्य असे काम संघाच्या कार्यकारिणीने शक्य करून दाखविले, त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. हे विश्रामधाम पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी पर्यटनाचा उत्तम पर्याय ठरेल, असा विश्वास या वेळी रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. तर  मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांना फाईव्हस्टार दर्जाच्या सुविधा देताना कै. दी. गो. तेंडुलकर विश्रामधामाचे सांस्कृतिक मूल्य जपण्याचे शिवधनुष्य आमच्या कार्यकारिणीने यशस्वीपणे पेलले. अत्याधुनिक सेवासुविधांनी सुसज्ज असे हे विश्रामधाम सुवर्णमहोत्सवी वर्षात पूर्ण होण्याचा योग आम्ही साधला असे संदीप चव्हाण यावेळी म्हणाले.

पत्रकारांच्या हितासाठी उभारण्यात आलेले हे विश्रामधाम विक्रमी वेळेत पूर्ण केले गेले याबद्दल कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी कार्यकारिणीचे कौतुक केले. तर पत्रकारांच्या परिवारासाठी लोणावळ्यातील ही वास्तू उत्तम पर्यटन पर्याय असेल असा विश्वास लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी व्यक्त केला. तर या विश्रामधामासाठी लोणावळा नगर परिषदेकडून संपूर्ण सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल असा शब्द माजी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी दिला.

मुंबई मराठी पत्रकार संघाने ५० वर्षांपूर्वी उभारलेले हे विश्रामधाम काळाच्या ओघात जीर्ण झाले होते. पत्रकारांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन विस्तारित चार अतिरक्त बेडरूम आणि स्विमिंग पूल तयार करण्यात आला. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना अल्प दरात या सुविधांचा लाभ घेता येईल, असे कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे यांनी तर प्रास्ताविक कार्यवाह शैलेंद्र शिर्के  यांनी केले.  उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर यांनी  सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com