लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक आणि परिसीमन घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपने देशभरात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. काँग्रेसविरोधात भाजपकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहे. अशातच मुंबईतील वरळी भागात भाजपकडून मोर्चा काढण्यात आला होता. स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी भाजपने वरळीत रस्ता अडवून आंदोलन पुकारलं. शेकडो गाड्या ट्रॅफिकमध्ये अडकल्या, रुग्णवाहिका अडकल्या आणि कामावर जाणाऱ्या लोकांचे हाल झाले. बाजूला मैदान मोकळं असताना रस्ता अडवून नाटकं का करताय? भाजपच्या 'इव्हेंट'बाजीला महिलेने दाखवला आरसा! भर रस्त्यात ट्रॅफिक जाम करून सामान्य मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या भाजप नेत्यांची एका रणरागिणीने चांगलीच 'उतरवली'!
राजकारण असावं पण ते जनतेच्या जीवावर उठणारं नसावं! मुंबईच्या वरळीत भाजपच्या 'राजकीय स्टंट'मुळे सामान्य जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. बाजूला मैदान मोकळं असताना रस्ता अडवून नाटकं का करताय? तुमच्या राजकारणासाठी जनतेला वेठीस धरण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?" जा, मैदानात जाऊन आंदोलन करा, लोकांचा रस्ता अडवू नका! गिरीश महाजन यांच्यासारख्या बड्या नेत्यांना या महिलेने ज्या पद्धतीने झापलं, त्यानंतर त्यांची बोलतीच बंद झाली. सामान्यांचा रोष काय असतो, हे भाजपला नक्कीच समजलं असेल. जनता आता जागी झाली आहे! अशा ढोंगी आंदोलनांना आता सामान्य माणूस घाबरणार नाही. स्वतःला 'जनसेवक' म्हणवणाऱ्यांनी आधी जनतेच्या वेळेची आणि श्रमाची किंमत करायला शिकावी. कारण आता सामान्य जनतेचा संयम सुटत चाललाय. मोर्चामध्ये एका महिलेनं वाहतूक कोंडी झाली म्हणून मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. या घटनेमुळे हा मोर्चा चांगलाच गाजला. मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली होती.पण नियमांचे उल्लंघन झाल्याचं पोलिसांचं मत आहे. परवानगी देताना काही अटीशर्ती देण्यात आल्या होत्या. या अटीशर्तीचं उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता आयोजकांवर कारवाई होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काही लोकांकडून PoojamishraBiggBoss हा इन्स्टाग्रामव प्रोफाईल फॉरवर्ड करून भाजपच्या आंदोलनात जाब विचारणारी महिला ही किती 'वाईट' आहे असा अपप्रचार सुरू करण्यात आला.विरोधकांचे चारित्र्यहनन करणे IT Cell साठी हे काही नवीन नाही. विलास बडे यांनी आपल्या कार्यक्रमात संहितल्याप्रमाणे "सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर फिरून आलेलं असतं." एका पत्रकाराने त्या जाब विचारणाऱ्या महिलेच्या मर्सिडीज कारच्या रजिस्ट्रेशन डिटेल्सवरून तिचे नाव, गाव जगासमोर आणले
महाजन खरे बोलत आहेत काय? गिरीश महाजनांनी बोलताना सांगितले कि मोर्चाला परवानगी दिली गेली होती.
खरे पाहता दक्षिण मुंबईमध्ये मोर्चा काढण्याची परवानगी मागितली की पोलिस सांगतात की दक्षिण मुंबईमध्ये मोर्चा काढायला परवानगी मिळणार नाही.तशी कोर्टाची ऑर्डर आहे.तुम्ही आझाद मैदानावर जा.कोर्टाची ऑर्डर भाजपला लागू होत नाही काय?
डाव्या पक्षांना, कामगार संघटनांना परवानगी दिली जात नाही. मग भाजपच्या मोर्चाला परवानगी कशी दिली गेली.सत्ताधारी पक्षांना,भाजपला कायदा पोलिसांतर्फे लागू केला जात नाही काय? कायद्यापुढे सर्व समान आहेत काय ? परवानगी दिली तरीही परवानगी सशर्त असते.ट्रॅफिक ब्लॉक केला जाणार नाही अशी अट असतेच. भाजपच्या मोर्च्यानी ट्रॅफिक अडवला.लोकांना त्रास दिला.त्याची पर्वा त्यांनी केली नाही.सत्तेचा माज त्यांना चढला आहे. पोलिसांनी जनतेला स्पष्टिकरण दिले पाहिजे. पोलिसांनी त्यांना परवानगी दिली होती काय ? " दिली होती तर ईतरांना का दिली जात नाही. परवानगी दिली असली तरी त्यांनी ट्रॅफिक अडवला यामुळे महाजन व भाजपच्या पुढाऱ्यांवर पोलिस गुन्हा का नोंदवत नाहीत ? ऊत्तर द्या- Prakash Reddy
आपल्या लेकराकडे जायला रस्त्यावरील भाजपाईंच्या झुंडीमूळे तासंतास उशीर होतोय, कोणी रस्ता मोकळा करायला तयार नाही हें पाहून आक्रोश करणाऱ्या महिलेला भाजपाचा पुरुष कार्यकर्ता पाठीमागून ओरडून पोलिसांना सांगतोय, ‘घेवून जा तीला, नाहीतर मार खाईल ती...‘ हें यांचे खरे स्वरूप. या मानसिकतेतुनच बिलकीस बानोच्या बलात्कार्यांचा सत्कार होतो, हाथरस, कठुवा येथील मुलींवर अत्याचार होतात त्या मारून टाकल्या जातात. यातूनच मनिपूरमध्ये आदिवाशी महिलेची नग्न धिंड काढली जाते, यातूनच कुस्तीपटू महिलांवर बलात्कार करणाऱ्यांना संसदेत प्रतिष्ठा मिळते.... बलात्कारी आसाराम, बलात्कारी रामरहीम, विकृत खरात जन्मतात. ‘ढोर गवार नारी, सब ताडण के अधिकारी’ सांगणाऱ्या मानसिकतेचाच झेंडाफडकवणारा भाजपा नारीशक्ती वंदनचा मुखवटा धारण करून प्रत्यक्षात महिलांचा अपमानच करतो, हें पुन्हा एकदा सिद्ध झाले. - हनुमंत पवार, प्रवक्ता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
सत्तेचा माजेचा हा परिणाम आहे, आमचीच सत्ता आहे. या सत्तेचा या पद्धतीने दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो. त्याचा सर्वात मोठे उदाहरण देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्राने पाहिलं. सामान्य लोकांनी कसं ट्रोल केलं. महिला आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चात महिला कश्या शिवा देत होती. या पद्धतीची ही पहिली घटना असेल ज्यात महिलेने एका महिला मोर्च्यात इतक्या शिवा खाव्या लागल्या, - काँग्रेस नेते नाना पटोले
नौटंकी करणाऱ्या भाजपाला एकट्या महिलेने भर रस्त्यात उघडं करुन खऱ्या अर्थाने ‘हजारोंसे भारी… एक नारी’ हे सिद्ध केलं. ही नारी शक्ती खऱ्या अर्थाने वंदनीय आहे. आता त्या भगिनीला पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तसं झालं तर सत्यासाठी भिडणाऱ्या अशा शेकडो नारी शक्ती पुढं येऊन भाजपचा मुखवटा पुन्हा टराटराsssफाडतील, - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार
थोडं उशीरा का होईना मात्र काल वरळीत एक महिलेने इंग्रजीत जाब विचारतांना "You Get Out" असा सणसणीत अपमान केल्यावर चाळीस पैसेवाली टोळी आज सोशल मिडीयावर दबकत दबकत सक्रिय होण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे मात्र त्याच्या शंभर पट ताकदीने सर्व सामान्य नेटकरी अक्षरशः या प्रोफाईल लॉक करत टाकणाऱ्या अभद्र कमेंट वर तुटून पडत आहे....
हा मंत्री इतका बावळट असावा की इतका अपमान होऊन देखील यांची सत्तेची मग्रुरी एक अंश देखील कमी झालेली नाही , उलट पत्रकार परिषद घेत सदर महिलेचे कसे चुकले असा खोटा भ्रम निर्माण करण्याचा लाजिरवाणा प्रयत्न आज करत आहेत.... "My sincere apology for inconvenience" या एक शब्दात सर्व रोष थंड झाला असता मात्र सत्तेचा माज असा काही टाळक्यात भिनल्याने बुद्धी मंद पडलीय... त्रास होतोय तर पोलिसात तक्रार करा असा अत्यंत उर्मट युक्तिवाद करतांना यांना जरा देखील लाज वाटत नसावी . .? पोलिसांचे कामकाज कसे चालते हे यांना माहीत नसावे ... एक रिकामी प्लास्टिक बाटली फेकली आणि बाटली फेकून मारली यात प्रचंड फरक आहे हे सुद्धा जर यांना कळत नसेल तर मंत्री होण्याच्या हे लायकीचे नाहीच... सर्वात दयनीय अवस्था पोलिस खात्याची झालेली आहे , एक संतापलेल्या व्यक्तीस कसे हाताळावे याची जरा देखील अक्कल जर नसेल तर यांना खरोखर civic sense प्रशिक्षणाची गरज आहे.. प्रत्येक वेळी कोणी तक्रार करायला पोलिसात गेल्यास त्यालाच भरपूर उलटे पालटे प्रश्न विचारून गोंधळून टाकण्याची जुनी पद्धत आता चालणार नाही ... बाकी संपूर्ण दिवस वरळी वाल्या ताईंनी सोशल मिडियावर गाजवून टाकतांना common man ला त्याच्या ताकदीची ओळख करून देण्याची झलक दाखविणारा ठरला आणि कालच्या प्रकाराचा राजकारणी नेत्यांनी नक्कीच धास्ती घेतली असणार .. Adv Yogesh Pande
0 टिप्पण्या