Top Post Ad

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबईत विचारमंथन मेळावा संपन्न

सामाजिक कल्याणाच्या कार्याचे चिंतन आणि त्यासाठी कृतीशील उपक्रम राबविणे हेच खरे विचारमंथन असल्याचे प्रतिपादन मानस योग साधना प्रशिक्षक डॉ. हेमांगी भरत सोळंकी यांनी केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कोकण-मुंबई विभागाचा १२ वा विचारमंथन मेळावा तसेच ‘लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव’ राज्यस्तरीय महिला सन्मान पुरस्कार वितरण सोहळा दादर येथील विदर्भ वैभव मंदिर येथे उत्साहात पार पडला. अध्यक्षीय मनोगतात त्या बोलत होत्या.यावेळी लेखक-दिग्दर्शक नवीन अग्रवाल, प्रेरणा अग्रवाल, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख, प्रयास फाउंडेशनचे चंद्रकांत खेडगीकर (अंबरनाथ) आणि महाराष्ट्र संघटन प्रमुख अरविंदराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा आणि अन्य महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. तसेच दिवंगत गायिका आशा भोसले, शहीद जवान, आत्महत्याग्रस्त शेतकरी, महिला बळी, दिवंगत पत्रकार आणि विविध आपत्तीतील बळींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी ‘जय जय स्वामीसमर्थ’ मालिकेतील अभिनेत्री अपूर्वा देशमुख, लेखिका-दिग्दर्शक प्रेरणा अग्रवाल, पत्रकार सुषमा ढोले-ठाकूर आणि शेख जबीना यांना ‘लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव’ राज्यस्तरीय महिला सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच सहकलाकारांचे स्वागत करून ३० महिलांचा साडी-चोळी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

प्रेरणा अग्रवाल यांनी पत्रकारिता हा चौथा आणि नाट्यशास्त्र हा पाचवा स्तंभ असल्याचे सांगत नारी सन्मानावर हिंदी रचना सादर केली. पत्रकारिता आणि समाजकल्याणासोबत विविध क्षेत्रांना स्पर्श करणारे असे उपक्रम समाजात समतावादाची जाणीव वाढविणारे असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. तसेच प्रेरणा अग्रवाल यांनी ‘शबरी के राम’ या नाटकाचे व ‘माँ कहानी संग्रह’ ही पुस्तके संजय एम. देशमुख यांना भेट दिली.

या कार्यक्रमाला पंजाबराव देशमुख, मिनाक्षी देशमुख, डॉ. भरत सोळंकी (योग परिवार), रफिक मुलानी, सोमया मुलानी, जगदीशप्रसाद करोतिया, विजयावती करोतिया, संपत उजाला, विनोद चाळके, कमलेश कुबल, नुरूद्दीन सिद्दीकी, नितीन शर्मा, देव शर्मा, केशव भारद्वाज, इंद्रनिल अधिकारी, जय प्रताप सिंग, विकास भोसले, संतोष बामणे, मंगल शिंदे, प्रतिक्षा व तुषार तल्हार, गजानन वाघ, जबीना शेख, भानु जाधव, भप्पी जाधव, तक्षशिला व तेजराव तेलंग, सुहास मोरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन महिला आघाडी प्रमुख सुषमा ढोले-ठाकूर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com