Top Post Ad

कर्मचारी सेवा निवृत्तीकडे झुकले, तरी बदल्या नाहीत! ..ठाणे महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार

  मुंबई- ठाणे महानगर पालिका सध्या गाजते आहे ती तिच्या ठायी वसलेला भ्रष्टाचार , अधिकाऱ्यांची मनमानी आणि भोंगळ कारभारामुळे!विशेष म्हणजे काही अधिकारी  गेली  वीस बावीस वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असून एका ठिकाणी ठाण मांडून बसले असून अशा मस्तवाल झालेल्या  हया भुजंगाना  हटवण्याची हिम्मत पालिका प्रशासन दाखवणार का ?असा संतप्त सवाल सामान्य ठाणेकरांना पडला आहे .एकंदरीतच ठाणे महानगर पालिकेच्या सर्वच खात्याची ही बोलकी स्थिती असून निर्धावलेल्या अधिकाऱ्यानां हटवण्याची जोरदार  मागणी  सुज्ञ ठाणेकर   करू लागलेत. यात सामान्य प्रशासन व पाणी खाते आघाडीवर आहे .


ठाणे महानगर पालिका अस्तित्वात येऊन बराच काळ लोटला तरी ठाणे  ठाणेकरांसाठी  पाणी उपलब्ध करू शकत नाही .ही ठाणे महानगर पालिकेची शोकांतिका असून पिण्यासाठी त्यांना मुंबई आणि कुळगाव बदलापूर यासारख्या  महानगरपालिकेवर अवलंबून  राहण्याशिवाय पर्याय नाही .ठाणे मनपाकडे पाण्याची स्वतःची अशी व्यवस्था नाही .

याच सर्वात ताजं टवटवीत आणि बोलकं उदाहरण म्हणजे वागळे इस्टेट प्रभाग समिती अंतर्गत येणारं पाणी खातं .याविभागात माधव जांगडे नामक उप जल अभियंता हे गेल्या दोन तपाहून अधिक काळ लोटला तरी याठिकाणी ठाण मांडून बसले आहेत .त्यांची खुर्ची हलविण्याची हिम्मत एका ही पालिका अधिकाऱ्याने दाखवलेली नाही.ठेकेदाराच्या संगनमताने  लाखो  रुपयांचा भ्रष्टराचार करणाऱ्या अधिकारी वर्गाला  कुणाचे अभय आहे .?   अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारा  गॉड फादर कोण आहे .?  ठाणे मनपा  कोणाच्या इशाऱ्यावर नाचते याचाही शोध घेण्याची वेळ आली आहे अशी चर्चा ठाण्यात ऐकावयास मिळते.सध्या उप जलअभियंता म्हणून कार्यरत असलेले माधव जांगडे  हे मजल दरमजल करीत यापदापर्यंत पोहोंचले आहेत . मात्र वर वर साळसूद आणि प्रामाणिक वाटणारे माधव जांगडे हे गेल्या  अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी असल्याने त्याचा परिणाम म्हणजे आज निर्माण झालेली स्थिती आहे.

शिवाजी नगर , रत्नाबाई   कंपाऊंड परिसर किसन नगर ,पडवळ नगर आणि महाराष्ट्र नगर हे प्रभाग ही वागळे इस्टेट प्राभग समिती अंतर्गत येतात . नवी जुनी  जल जोडणी  ,जलवाहिन्या टाकण्याचे  - बदलण्याचे काम  करण्यासाठी ठाणे महानगर पालिका स्वतःची अशी यंत्रणा नाही.सर्वच कामे ठेकेदार कंपन्यांमार्फत केली   जातात.अशी माहिती दस्तुरखुद्द पालिका  अधिकाऱ्यांनी दिली. पाणी खात्याची सर्व कामांचे कंत्राट वरद आणि गुरुदत्त इंटरप्राइझेस इंटरप्रायझीस  दोन  ठेकेदार कंपन्यांना  दिले  गेले आहे . तथापि  पाणी खात्याच्या  अधिकाऱ्यांनी वरद या कंपनीस झुकते माप देण्यामागे उप जल अभियंता कार्यालयातील कोणाचे  हीत संबंध जोपासले जात आहेत.?  अशी शंका चोखंदळ ठाणेकरांनी व्यक्त केली आहे.

      दरम्यान पालिका शहर जल  अभियंता विनोद पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले.पाणी  खाते हे अत्यावश्यक सेवा आहे . या खात्यात काम करण्यास लोक फारसे इच्छुक नसतात किंबहुना लोक पाणी खात्यात काम   करण्यास  नाक मुरडतात. परणामी कर्मचारी  टंचाई  वाढते आणि त्याचा ताण आहे त्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर  पडतो . या सत्य स्थितीबाबत पालिका प्रशसनाकडे वारंवार  आमचे म्हणणे मांडले .पण आम्हाला कुणीही दाद देत नाहीत .सामान्य प्रशासन विभागात ही याहून वेगळी  स्थिती नाही असे त्यांनी स्पष्ट केले . वागळे इस्टेट प्रभाग समिती कार्यालयाच्या जल विभागातील अनागोंदी कारभारावर अंकुश   ठेवण्या संदर्भात   परिमंडळ -२  उपायुक्त मिताली   संचेती  यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले ,अधिकाऱ्यांच्या बदल्या ,बढत्या आणि कारवाई करण्याची जबाबदारी आपली नसून ती जबाबदारी आस्थापना  विभागाची असल्याचे स्पष्ट केले. अधिक माहितीसाठी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या   कार्यालयाशी संपर्क साधला असता ते बाहेरगावी गेल्याचे  कार्यालयातून सांगण्यात आले.

तथापि   ठेकेदारी  तत्त्वावर नागरी सेवा सोयी - सुविधा पुरवण्यासाठी ठेकेदारीच्या निविदा काढण्याऐवजी पालिका प्रशासनाने बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी  रोजी रोटी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी समाजसेवक नरेंद्र सावंत यांनी केली असून यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com