छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त १३५ वा जयंती उत्सव विक्रोळी टागोर नगर येथील मातृछाया सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला .१३ एप्रिल सोमवार रोजी मोफत आरोग्य शिबीर तसेच १४एप्रिल रोजी महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयातील रूग्ण यांना फळे वाटप. रविवार, १२ एप्रिल रोजी विक्रोळीतील विकास काॅलेज समूह यांचे संचालक दिवंगत प.म.राऊत सर यांचे स्मृतिप्रित्यर्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार झाले. महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण, अभिवादन आणि बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आजच्या डिजिटल युगात पुस्तक वाचन कमी होत असल्याने त्यास चालना मिळावी या उद्देशाने वाचनालय हा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला. दिवंगत गुरूवर्य श्री. प. म. राऊत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन स्थानिक नगरसेविका. सुनिता जाधव यांच्या हस्ते, विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनय राऊत, विक्रोळीतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.सुरेंद्र तांबे ,विकास महाविद्यालयाचे ग्रंथपाल उदय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी डॉ. विनय राऊत यांनी पुस्तक वाचन आणि नवीन तंत्रज्ञान यांचा समतोल साधल्यासच प्रगती साध्य होऊ शकते, असे नमूद केले. भविष्यातील उन्नतीसाठी डिजिटल साधने आणि ग्रंथवाचन दोन्हीही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. विक्रोळी परिसरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.सुरेंद्र तांबे यांनी आजची तरूण पीढी मोबाईलच्या युगात शारीरिक, मानसिक दृष्टीकोनातून कसे भरकटतात आणि त्यांचे आरोग्यावर कसा परिमाण जाणवतो असे आपल्याकडे येणारे बालरूगण यांचे अनूभव कथन केले.
विकास महाविद्यालयाचे ग्रंथपाल उदय कुलकर्णी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाचन व्यासंगाचा उल्लेख करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर दररोज १८ तास ग्रंथालयात बसून अभ्यास करत असत. त्यामुळे आजच्या पिढीने निदान १८ मिनिटे तरी वाचनाचा संकल्प करावा.असा बहुमूल्य सल्ला दिला. स्थानिक नगरसेविका सुनिता जाधव यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून परिसरातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या सुपुत्र दर्शन जाधव यांनीही अशा उपक्रमांमुळे युवा पिढी महापुरुषांचे आदर्श घेऊन पुढे जाईल, असे मत व्यक्त केले आणि वाचनमंदिरे सर्वत्र उभारली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.वानालयाचा पुस्तक वाचनाचा शुभारंभ ईमारतीमधील डॉ.लाजवंती जाधव आणि विद्यार्थी पूर्वी बच्छाव यांनी मान पटकवला त्यांना नवनिर्वाचित नगरसेवविका सूनिताताई जाधव यांचे मार्फत पु.ल.देशपांडे यांचे पुस्तक वाचनास वाचनलया मार्फत देण्यात आले.
तसेच बालसंस्कार व मनोरंजन कार्यक्रमांतर्गत विविध खेळ, पेंटिंग आणि हस्तकला उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आकर्षक जादूचे प्रयोग (मॅजिक शो) सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईमारतीमधील संस्थेतील सहसचिव पत्रकार अनिल जाधव यांनी केले. सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे यांचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सोसायटीचे पदाधिकारी अध्यक्ष जीवन सोनावने, संस्थेचे अध्यक्ष सुशांत बच्छाव, उपाध्यक्ष पंकज म्हात्रे,खजिनदार भागेश तांबे,कमिटी सभासद आप्पा चेंदवनकर, शीतल माळी, महेंद्र अडसूळे स्वप्नील राणे, हर्षद जाधव, विजय कोकाटे, सूरेश बाविस्कर, अजय काळण, विकास दळवी, राजेश मुरूडकर, चेतन शेट्टी, सागर नर्सेकर आणि ईतर मान्यवर सभासद, विद्यार्थी मित्र,लहान मुले,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या