Top Post Ad

४ काळ्या 'कामगार-संहितां'विरोधात कामगार-दिनी ठाण्यात आक्रोश-मोर्चा

१ मे या आंतरराष्ट्रीय कामगार-दिनी / महाराष्ट्र-दिनी, 'धर्मराज्य पक्षा'तर्फे "४ काळ्या 'कामगार-संहितां'विरोधात (4 Black Labour-Codes) 'राष्ट्रीय-संपत्ती निर्मात्या' कामगारांचा 'आक्रोश-मोर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे.  ठाण्यातील पं. जवाहरलाल नेहरु पुतळ्याजवळ जमल्यावर तिथूनच,  मोर्चाला सायंकाळी  ४.३० वाजल्यापासून  प्रारंभ होईल...पुढे कॅसलमिल — माँ साहेब चौक — विकास काॅप्लेक्स —डावीकडे आदर्शनगर — उजवीकडे सिलिचिली हाॅटेल --अँन्थनी बेकरी — अमृता हाॅटेल — उजवीकडे जलाराम ट्रेडर्स — टेंभीनाका — डावीकडून शासकीय विश्रामगृह — खारकर आळी — उजवीकडे पेढ्या मारुती -- डावीकडे मुख्य बाजारपेठेतून सरळ ते ठाणे स्टेशन  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या मोर्चाची समाप्ती होईल.  


कामगारांनी प्रदीर्घ संघर्षातून मिळवलेले 44 कामगार कायदे रद्द करून केंद्र सरकारने  4 श्रम संहिता लागू केले. ह्या श्रमसंहिता कामगारांचा अधिकारांना डावलणारे असल्याने  तसेच कामगार संघटनांशी कुठलीही चर्चा न करता लागू केल्याने देशातील सर्वच कामगार संघटना ह्याचा विरोध करीत आहेत.  कामगार विरोधी ४ नवीन श्रम संहिता रद्द करा, बांधकाम नाका कामगार फेरीवाले कंत्राटी कामगार यांना सुरक्षा द्या खागीकारण बंद करा. किमान वेतन 30 हजार रुपये दिले पाहिजे. आशांना कर्मचारी म्हणून दर्जा देऊन त्यांना मानधन न देता वेतन द्या, आशां सेविकांना दरमहा ५ तारखेला मानधन द्या, त्यांना वेतन चिठ्ठी द्या, त्यांची सेवानिवृत्ती ६० ऐवजी ६५ वयोमर्यादा करा, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा, शेतमालाचा हमी भावाचा कायदा करा, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करताना आदिवासी व गैर आदिवासी यांचे   वन जमीन अतिक्रमण धारकाचे कोणत्याही दोन पुराव्याचा आधारावर  दावे मंजूर करा, आदी व अन्य मागण्यां साठी  
आंतरराष्ट्रीय कामगार-दिनी हा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. तरी यामध्ये सर्व कामगार  वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी लढा द्यावा असे आवाहन धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com