Top Post Ad

ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवकांना ओळखचिन्हाचे वाटप

 ठाणे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांना आज झालेल्या मा.सर्वसाधारण सभेत महापालिकेचे बोधचिन्ह असलेल्या ‘नगरसेवक ओळख’ चिन्हाचे वाटप महापौर शर्मिला पिंपळोलकर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याहस्ते करण्यात आले.महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे नगरसेवकांची गेल्या अनेक वर्षापासून असलेली मागणी पूर्ण झाली आहे.महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद सदस्य असलेले बोधचिन्ह वाटप करण्यात येते त्याप्रमाणे ठाणे महापालिका सदस्यांना ओळखपत्रासोबत नगरसेवक असे दर्शविणारे ओळख चिन्ह द्यावे अशी मागणी शिवसना गटनेते पवन कदम यांनी पत्रान्वये महापौरांकडे केली होती.महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी याबाबत ठाणे महापालिकेतील सर्व सदस्यांना महापालिकेचे बोधचिन्ह असलेले ओळख चिन्ह देण्याबाबत आयुक्त सौरभ राव यांना पत्र दिले होते.

त्यानुसार आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने दखल घेत महापालिकेतील नगरसेवकांना बोधचिन्ह देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते.त्यानुसार आज सोमवार दिनांक 20/04/2026 रोजी झालेल्या मा.सर्वसाधारण सभेत या ओळख चिन्हाचे वाटप सर्व नगरसेवकांना महापौर शर्मिला पिंपळोलकर,उपमहापौर कृष्णा पाटील,आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे,सर्वपक्षीय गटनेते उपस्थित होते.गेले साडेतीन वर्षे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट होती.

जानेवारी 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत ठाणे महानगरपालिकेत नवीन नगरसेवकांची संख्या जास्त आहे. नगरसेवक हे कामानिमित्त सतत महानगरपालिकेच्या मुख्यालयात तसेच प्रभाग समिती कार्यालयात जात असतात.शासकीय- निमशासकीय कार्यालयांमध्ये कामकाजाच्या निमित्ताने ये-जा करताना सदस्यांची ओळख सुलभ व्हावी तसेच प्रशासकीय समन्वय अधिक प्रभावी होण्यासाठी महापालिकेचे बोधचिन्ह असलेले नगरसेवक ओळखचिन्ह उपयुक्त ठरणार असल्याचे शिवसेना गटनेते पवन कदम यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद केले होते.दरम्यान नगरसेवक भरत चव्हाण यांनी देखील प्रस्तावाची सूचना महापौरांना दिली होती.आज मा. सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांना ओळख चिन्हाचे वाटप केल्याबद्दल सर्व पक्षीय नगरसेवकांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com