Top Post Ad

महाड चवदार तळे सत्याग्रहा " वरील ऐतिहासिक दस्तावेजाचे पुस्तक! ज.वि.पवार -

  " महाड चवदार तळे सत्याग्रहाचे प्रमुख संघटक,कॉ आर बी मोरे लिखित, " सत्याग्रह महाड चवदार तळ्याचा " पुस्तक हे महाड सत्याग्रह चळवळीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे.या पुस्तकामुळे या चळवळीचा खरा इतिहास लोकांपर्यंत जाईल."असे  उद्गार काढून  मा.ज. वि.पवार यांनी सदर पुस्तकाचे प्रकाशन झाले असं शिवाजी मंदिर नाट्यगृहातील प्रकाशन समारंभात घोषित केले.


या प्रकाशन समारंभात बोलताना दुसरे प्रमुख वक्ते आंबेडकरी चळवळीतील, जेष्ठ कार्यकर्ते व संविधान अभ्यासक सुरेश सावंत यांनी ," हे पुस्तक त्या सत्याग्रह आयोजनात ज्यांची महत्त्वाची भुमिका होती त्या,कॉ आर बी मोरे यांनी लिहिले असल्याने,त्याचे महत्त्व अधिक आहे व हे पुस्तक सामान्य कार्यकर्त्यां पर्यंत जायला हवे असे मत व्यक्त केले.

या प्रकाशन कार्यक्रमात जेष्ठ स्त्रीवादी अभ्यासक डॉ छाया दातार यानीही हे पुस्तक महाडचा खरा इतिहास समजून घेण्यासाठी प्रत्येकाने वाचावे असे आवाहन केले. या प्रसंगी बोधी रंगभूमी चळवळीचे , तसेच मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रेमानंद गज्वी , नाटककार संदेश गायकवाड व प्रतिशब्द प्रकाशनाचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरेही मंचावर उपस्थित होते.

 महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाला मार्च महिन्यात " शताब्दी वर्षा " चां प्रारंभ झाला. त्यानिमित्ताने मुंबईच्या " प्रतिशब्द" प्रकाशनातर्फे , शिवाजी मंदिर नाट्यगृहात कार्यक्रम आयोजित केला होता.    या प्रसंगी संदेश गायकवाड लिखित, दिग्दर्शित व संध्या पानसकर अभिनित " संघर्षमय सावित्री" या दिर्घांकाचाही नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.ज्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com