Top Post Ad

उपवर्गीकरण... ११ मे रोजी सर्वपक्षीय संघटनांची मुंबईत राज्यव्यापी बैठक

महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अनुसूचित जाती वर्गीकरणावरून वाद प्रतिवाद निर्माण झाल्याने राज्य सरकारने हरकती नोंदविण्यास सुरुवात केली आहे, यासंदर्भात रिपब्लिकन नेत्यांची  11 मे रोजी मुंबईत राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात येणार असून या बैठकीत राज्यव्यापी दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.  अनुसूचित जाती उपवर्गीय संदर्भात मुंबईतील रिपब्लिकन पक्ष खोरीप कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला  तानसेनभाई ननावरे,  भाऊ निरभवणे,  दिलीपदादा जगताप,  अच्युत भोईटे,  नितीनभाऊ मोरे, भागवत कांबळे ,विश्वनाथ कांबळे, आनंद कांबळे,  शाम वाडकर,   विक्रम कांबळे,  संजय कांबळे आदी उपस्थित होते.


उपजातीय वर्गीयकरणामुळे जाती आणि सामाजिक तेढ निर्माण झाले असून सामाजिक सलोखा निर्माण होऊन कोणत्याही एका जातीचे नुकसान होऊ नये, त्यासाठी एक राज्यव्यापी दौरा आयोजित करण्यात आला आहे, या दौऱ्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याकरिता 11 मे रोजी मुंबईतील रिपब्लिकन-
 खोब्रागडे पक्षाच्या सीएसटी मुख्य कार्यालयात सर्वपक्षीय संघटना सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक होणार आहे. यावेळी पुढील व्यापक आंदोलनाचा निर्णय घेण्याबाबत ठरवण्यात आल्याचे  भाऊ निर्भवणे यांनी सांगितले. 11 मे च्या मुंबईतील बैठकीसाठी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी सामाजिक संघटना यांना निमंत्रित करण्यात यावे, असा सर्वानुमते ठरवण्यात आले असल्याची माहिती पत्रकार महादू पवार यांनी दिली आहे. उपजातीय वर्गीकरणा संदर्भात या बैठकीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com