Top Post Ad

नीट परीक्षेची पेपर फुटी आणि प्रदीप जोशी

 सध्या देशभरात NEET अर्थात नीट परीक्षेच्या पेपर फुटीची देशभर चर्चा आहे.  NEET -नीट चे चेअरमन -अध्यक्ष प्रदीप जोशी आहेत. ते RSS ची विद्यार्थी शाखा अभाविपचे पदाधिकारी होते. त्यांना २००६मधे मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC)चे अध्यक्ष म्हणुन भाजपच्या सरकारने RSS च्या शिफारशी नुसार नेमले होते. मध्य प्रदेश मधील लोकसेवा आयोगाने केलेल्या भरती घोटाळ्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता .हा घोटाळा व्यापम घोटाळा म्हणुन देशभर गाजला होता.त्याचा तपास CBI कडे दिला होता.ह्या भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यामुळे ४२ जणांचा म्रुत्यु झाला होता. या व्यापम नौकरी घोटाळ्यामधे अजुन कोणालाही शिक्षा झाली नाही.

२०११मधे ते  छत्तिसगड लोकसेवा आयोगाचे म्हणजे नौकर्या देणार्या संस्थेचे अध्यक्ष झाले. छत्तिसगड मधे सुध्दा भाजपचेच सरकार होते. नंतर केंद्रातील भाजप सरकारने त्यांना UPSC चे सदस्य म्हणुन ५ वर्षे नेमले व नंतर २०२०मधे UPSC चेअरमन बनवले (२वर्षे).  UPSC देशातिल सर्वोच्च अधिकारी जसे की IAS,IPS,IFS,IRS ......सारख्या पदांकरिता अधिकार्यांची निवड करते ईतकी अत्यंत महत्वाची UPSC आहे. २०२२मधे हे प्रदीप जोशी NEET चे अध्यक्ष झाले. NEET मार्फत देशभरातील डाॅक्टर्स ,लेक्चरर्स, प्रोफेसर्सच्या भरतीच्या परिक्षा घेतल्या जातात. सध्या ह्याच नीट परिक्षांमधील पेपर फुटी प्रकरण गाजत आहे.

सध्याचे NEET पेपर फुटी प्रकरणाची व्याप्ती गुजरात,हरियाना ,बिहार ,झारखंड,महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधे वाढली आहे .या मधे करोडोंचा भ्रष्टाचार झाला. NEET चे अध्यक्ष असलेले प्रदीप जोशी हेच या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करतात .म्हणजे स्वतः आरोपीनेच तपास करण्यासारखे आहे. खरेतर या प्रदीप जोशी याला NEET च्या अध्यक्षपदावरुन दूर करुन मग CBI ने चौकशी करायला हवी.तरच सत्य बाहेर येईल. याच प्रदीप जोशीने नीट परिक्षेत १५००विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देवुन मेरीट मधे आणले. 

 सरकाने देशातील सर्व अत्यंत महत्वाच्या संस्थांमधे, विविध परिक्षांमधे मेरीट ऐवजी मनुवादी विचारांच्या लोकांना, तरुणांना/विद्यार्थ्यांना प्राधान्य देवुन संपुर्ण  यंत्रणा खिळखिळी केली आहे.  म्हणून रस्त्यावर उतरून लढाई करावीच लागेल. अन्यथा भावी पिढ्यांची बरबादी होईलच.

चोभे पाटील .अ.नगर .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com