Top Post Ad

अखेर ठाणे महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी महेश आहेर अटकेत

भोंदूबुवा उर्फ ​​अशोक खरात यांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात अनेक बड्या बड्या हस्तींची नावे उघडकीस आली. मात्र अनेकजण राजकीय आश्रयाखाली असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्यापही झाली नाही. मात्र नुकतेच खरातसाठी दलाल म्हणून काम करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेचे माजी अधिकारी महेश आहेर यांना कोल्हापूरहून पोलिसांनी अटक केल्याने पुन्हा एकदा हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.   महेश आहेरवर  खरातसाठी महिलांना आमिष दाखवून बोलावण्याचा आणि त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करण्याचा आरोप आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर, ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी महेश आहेर याला कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने हॉटेल अनपूर्णा येथून अटक केली आहे.

ठाणे महानगरपालिकेचे माजी कर्मचारी महेश आहेर यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते,  महेश आहेर यांच्यावर नाव बदलून अनेक महिलांशी लग्न करणे, बनावट कागदपत्रे बनवणे आणि ठाणे महानगरपालिकेची मालमत्ता तसेच हाऊसिंग स्किममधून अनेक लोकांना पैशासाठी बेकायदेशीरपणे घरे देणे, असे अनेक आरोप झाले होते, परंतु ठाणे महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला महेश आहेर यांची चौकशी करून यावर कोणतीही कारवाई करण्याचे धाडस झाले नाही.   किंवा ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. या मागे  एका मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याची चर्चा ठाणेकरांमध्ये होती.   मात्र  महिलांचा पुरवठा करणे आणि एका महिलेवर बलात्कार केल्याबद्दल दाखल करण्यात आलेला गुन्हा आणि या आरोपाखाली फरार असलेल्या महेश आहेरला अखेर कोल्हापूर गुन्हे शाखेने अटक केली. आता या प्रकरणात ठाणे पोलीस पुढे तपास करून किती रहस्ये उघड करतात, की काही राजकीय दबावामुळे बलात्काराचा आरोपी असलेल्या महेश आहेरला वाचवण्याचा प्रयत्न करतात याबाबत ठाणेकरांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. 

👉... महेश आहेर दिवसाला ४० लाख रुपयांचे कलेक्शन कुणाकडून आणि कोणासाठी करतात

👉...  घरांचे आणि गाळ्यांचे वाटपात मोठा गैरव्यवहार ? "त्या" अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी

👉...  पदोन्नतीकरिता खोटे दस्तावेज सादर केेले. लिपिकपदावरून सहा. आयुक्तपदी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com