Top Post Ad

खाजगी शिकवणी शिखर संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

स्टेट कॉन्सोरसीएम ऑफ कोचिंग टीचर्स अँड इन्स्टिट्यूट्स (SCCTI) या राज्यातील खाजगी कोचिंग क्लासेस च्या ९ संघटनाच्या शिखर संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे दिनांक २७ मे २०२६ रोजी नीट पेपर फुटी प्रकरणचा निषेध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. या  आंदोलनाबाबत अधिक माहिती देण्याकरिता तसेच खाजगी कोचिंग क्लासेसच्या विविध मागण्यांसदर्भात अधिक माहिती देण्याकरिता आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथेेे पत्रकार परिषद घेण्यात आले. यावेळी  राज्यातील प्रमुख नऊ संघटनांचे प्रतिनिधी, खाजगी कोचिंग क्लासेसमधील शिक्षकवर्गासह संतोष वासकर, दिलीप मेहेंदळे, सतीश देशमुख आदी शिखर संघटनांचे पदाधिकारी  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अनुदानित, विनाअनुदानित शाळा महाविद्यालयाच्या परिसरात फी आकारून चालू असलेल्या इंटिग्रेटेड क्लासेस वर विद्यमान कायद्याची कडक अंमलबजावणी करून उपाययोजना करणे. २) अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळा व महाविद्यालयांमध्ये पाच-दहा हजार रुपये येऊन विद्यार्थ्यांची फक्त नोंदणी करून त्यांना त्यांच्याच क्लासेस बरोबर टाय अप करून प्रचंड आर्थिक फायदा करून घेतला जातो. अशा शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याची व्यवस्था करणे.  ३) अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळा व महाविद्यालयातील शिक्षक हे खाजगी क्लासेस मध्ये काम करून दुहेरी इन्कम मिळवतात अशा दुहेरी शिक्षकांवर दंडात्मक कार्यवाही सह कडक बंदोबस्त करणे.

४) कोचिंग क्लासेस मध्ये सर्वसामान्य कोचिंग क्लास चालक व कंपनी व्यवस्थापना प्रमाणे चालणारे कोचिंग क्लासेस ज्यांची एकूण विद्यार्थी संख्या खूप असते, त्यांची एका बॅचमधील विद्यार्थ्यांची संख्या प्रमाणाबाहेर असते, त्यांचे महाविद्यालयाशी टाय अप असते, खोट्या, फसव्या तसेच विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करून विद्यार्थ्यांची व पालकांची फसवणूक करतात, असे क्लासेस गावापासून किंवा आईवडीलापासून खूप दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर तणाव निर्माण होतो, ही शैक्षणिक व्यवस्था सर्वसामान्य कोचिंग क्लास चालकांपेक्षा भिन्न असते. वरील अपप्रवृत्तींवर चाप बसेल असा कायदा आल्यास आम्हास तो कायदा मला मान्य असेल. असा कायदा किंवा नियमावली येण्याच्या अगोदर आम्हा शिखर संघटनेच्या सदस्यांना विश्वासात घ्यावे.  

५) NEET व JEE सारख्या परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत तरतूद नाही तर अशा परीक्षा रद करून पर्यायी व्यवस्था करावी. ६) पेपर फोडणाऱ्या बरोबरच त्याला जबाबदार असणाऱ्या बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या दुहेरी शिक्षक, इंटिग्रेटेड क्लासेस, टायअप क्लासेसवर व शिक्षकांवर दंडात्मक कार्यवाही सह कायदेशीर बंदी घालावी. ७) देशात एक देश, एक बोर्ड, एक अभ्यासक्रम व एक परीक्षा असे शैक्षणिक समानतेचे, श्रीमंताचे शिक्षण व गरीबाचे शिक्षण हा भेद नष्ट करून आर्थिक समानतेचे शैक्षणिक धोरण अवलंबावे. या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे कोचिंग क्लास वेलफेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या शिखर संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com