भारतीय जनगणना २०२६ मध्ये भारतीय बौद्धांची संख्या दाखवणे आवश्यक आहे. या विषयावर सर्वांचे एकमत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेने कतम ३४९ नुसार माननीय राष्ट्रपती यांना अनुसूचित जाती निश्चित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार माननीय राष्ट्रपती महोदयांनी राज्यघटना (अनुसूचित जाती) बाबतीत आदेश १९५० (दि. १०/०१/१९५०) मध्ये जाहीर केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन प्रधानमंत्री मा. व्ही.पी. सिंह यांना काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर उत्तरप्रदेश मधून जिंकून आणण्याच्या बदल्यात त्यांचे सरकार स्थापन झाल्यावर बौद्धाना केंद्रातील सर्व प्रकारच्या आरक्षणाचा लाभमिळण्याबाबतच्या हमीनुसार मा. व्ही. पी. सिंह सरकारने संविधान (अनुसूचित जाती) आदेश १९५० (सुधारित) १९९० (दिनांक ०४/०६/१९९०) अनुसार सवैधानिक बदल करून अनुसूचित जातींची यादी बौद्ध धर्मियांना लागू केली, या नंतर अनुसूचित जाती अंतर्गत मिळणाऱ्या सर्व सवलती बौद्ध समाजाला लागू करण्यात आल्या.
जनगणना मुळे लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्या जनतेच्या विकासाकरिता केंद्र आणि राज्य शासनाचे समाजकल्याण विभागाद्वारे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक योजनांकरिता फंड निश्चित करत असतात. आणि राजनीतिक जसे लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद्ध, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुकासाठी आरक्षण ठेवले जाते. जर अनुसूचित जातीची लोकसंख्या कभी झाली तर समाज कल्याण खात्याचा फंड त्याप्रमाणे कमी होवून बौद्ध समाजाच्या विकासाकरिता असलेल्या योजनांवर प्रभाव पडून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास आणि राजनीतिक आरक्षण यामधून आपला समाज वंचित राहू शकतो. बहुताश सरकारे आणि शासन व्यवस्था आपल्या समाजाच्या विरोधात आहेत त्याकरिता जर आपण या जनगणनेनुसार फॉर्म पूर्ण नाही भरता तर त्यानुसार अनेक अडचणीचे प्रश्न निर्माण होवू शकतात. या सर्व बाबींचा विचार विमर्श करून बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून आपणांस खालीलप्रमाणे आवाहन करीत आहोत.1) जनगणना फॉर्म मध्ये धर्माच्या रकान्यात "बौद्ध" असे लिहिणे आणि जातीच्या रकान्यात आपली पुर्वाश्रामाची जात (उदा. महार, मांग, चांभार, ढोर) असे लिहिणे,
2) बौद्धांची प्राचीन भाषा "पाली" भाषेस भारत सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आपण सर्वजण वंदना, सुत्तपठण आणि विधी संस्कार पाली गाथेत करतो, म्हणजे आपल्या बौद्ध समाजाला पाली भाषा ज्ञात आहे त्याकरिता पाली भाषेच्या संवर्धनाकरिता आपल्या येत असलेल्या भाषेच्या रकान्यात आपल्याला येत असलेली भाषा म्हणून "पाली" चा उल्लेख अवश्य करावा.
सर्व समाजाला बौद्धजन पंचायत समितीच्या आणि माझ्या माध्यमातून सूचित करतो कि आपण कोणत्याही गैरप्रचाराला बळी न पड़ेता योग्यप्रकारे फॉर्म भरावा. आपला स्वाभिमान आणि आंबेडकरी अस्मिता टिकेल आणि त्याबरोबर घटनात्मक भागीदारी, सामाजिक विकास, सर्व प्रकारच्या सवलती आणि आरक्षणाचा लाभ आपल्याला मिळेल आणि आपल्या बौद्ध समाजाचा सर्वांगीण विकास होईल अशा प्रकारे सदविवेक बुद्धीने विचार करून धर्माच्या रकान्यात "बौद्ध' आणि जातीच्या रकान्यात धर्मांतराच्या पूर्वीची जात लिहिणे आणि येत असलेल्या भाषेत इतर भाषेबरोबर "पाली" भाषेचा उल्लेख करण्याचे आवाहन बौद्धजन पंचायत समितीचा सभापती या नात्याने करीत आहे.
- आनंदराज यशवंतराव आंबेडकर
- (सभापती - बौद्धजन पंचायत समिती)

0 टिप्पण्या